अनियमित फुटणाऱ्या संत्र्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान

श्री. मदनलाल चांदमल मुथा,
मु. पो. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे.
मोबा. ९८९०९२४९२९


आम्ही जून २००६ मध्ये स्थानिक जातीच्या संत्र्याची रोपे आणून १३' x १३' वर त्यांची हलक्या लालसर जमिनीत लागवड केली. २ एकरमध्ये ४०० झाडे आहेत. ही बाग ५ वर्षाची होईपर्यंत बागेचा बहार धरायचा नसल्याने बागेकडे फारसे लक्ष देऊ शकलो नाही. मात्र गेल्यावर्षी पहिला बहार धरला तर ७० - ८० झाडांनाच माल लागला. बाकीच्या झाडांना माल लागला नाही.

चालूवर्षी उन्हाळ्यात ताण देऊन जुनमध्ये चाळणी करून खते देऊन पाणी सोडले, तर गेल्यावर्षी न फुटलेल्या झाडांपैकी १०० झाडांना बहार लागला. मात्र बाकीच्या ३०० झाडांना (गेल्यावर्षी माल लागलेल्या देखील) माल लागला नाही. सध्या त्या १०० झाडांवर १ ते १.५ डझन माल आहे. लिंबाच्या आकाराची फळे आहेत. ५ - ६ दिवसांपुर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. आदमाने (मोबा. ७७०९४०७३२१) भेटले. त्यांनी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. त्यानंतर आज (१७/९/१२) सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे.

आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम संत्र बागेची चाळणी करून अनुपयोगी फांद्यांची छाटणी करून कल्पतरू सेंद्रिय खताचा डोस देणार आहे. नंतर वेळापत्रकाप्रमाणे सप्टेंबरपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून बाग यशस्वी करणार आहे.