डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कॉटन थ्राईवर ने १७५ क्विंटल कापूस

श्री. मुथ्थ्म रेड्डी, मु.पो. किणी, ता. भोकर, जि. नांदेड


माझेकडे किणी गाव शिवार येथे ४५ एकर मध्यम, हलकी व भारी स्वरूपाची जमीन आहे. त्यामध्ये मी जून २०१२ मध्ये ३५ एकर कापूस (वेगवेगळ्या सिडसची) लागवड केली होती. श्री. एस. आर. कुलकर्णी, बँक मॅनेजर, यांचे सांगणेवरून मी गेल्यावर्षी १५ लि. कॉटन थ्राईवर घेऊन गेलो होतो. त्याच्या बोंड लागल्यानंतर १००० लि. पाणी + ५ लि. कॉटनथ्राईवर याप्रमाणे दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने केल्या. बाकी रासायनिक किटकनाशके, रासायनिक खते वापरली होती. माझे अपेक्षेपेक्षा जास्त १७५ क्विंटल कापूस मिळाला. जमीन कोरडवाहू असल्यामुळे एकरी ५ क्विंटल चा उतारा पाऊस कमी असतानाही मिळाला होता. त्यावरून आज रोजी ७ लि. कॉटन थ्राईवर खरेदी करत आहे. आतापर्यंत कॉटनथ्राईवर स्वत:साठी १५ लि. व मित्रांसाठी ४५ लि. नेले आहे.