डाळींबातील आंतरपीक ३० ते ३५ गुंठ्यात १४० पोती कांदा, भाव कमी (९ ते १३ रू.) तरी ७० हजार

श्री. अविनाश देवकर,
मु. पो. लोणी देवकर, ता. इंदापूर, जि. पुणे.
मोबा. ९९७० १४३९७४मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून डाळींबात कांदा या पिकाचे आंतरपीक घेतले आहे. शिवाजीनगरला भरलेल्या प्रदर्शनातून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर ही औष धे नेली. साधारणत: ३० - ३५ गुंठ्यातील कांद्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ५ फवारण्या केल्या असता त्याचा अत्यंत उत्तम असा रिझल्ट मिळाला. फवारण्या केल्यानंतर कांद्यावर कोणत्याही प्रकारचा रोग नव्हता. कांदा काढणीची वेळ आली तरी कांद्याची मान गळत नव्हती. अत्यंत हिरवीगार अशी पात होती. फवारणीनंतर एक महिना पाणी तोडले, तरी मानगळ झाली नाही. पात हिरवी असताना कांदा काढला. ४ महिन्याचे पीक असताना काढणी वेळेस १ कांदा २०० - २५० ग्रॅमचा मिळाला. लोक कांद्याकडे बघतच राहिले. सहसा हातात न बसणार असा मोठा कांदा डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून मिळाला. १४० पोती कांदा मिळाला. सोलापूर मार्केटला कांद्याला ९ - १३ रू. प्रमाणे भाव मिळाला. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून ३० - ३५ गुंठ्यात ७०,००० रू. उत्पादन मिळाले.

आज ८/८/१३ रोजी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी मार्केटयार्ड ऑफिसला भेट देऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा डाळींबालाही वापर करणार आहेत. त्यासाठी श्री. अडसूळ यांच्या सल्ल्याने जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि. डाळींबासाठी घेऊन जाता आहे.