१ एकर केशर आंब्यातील २५० 'सिद्धीविनायक' मोरिंगा, पहिल्याच बहाराचा निव्वळ नफा ४५ हजार

श्री. निवृती भरतराव पाटील,
मु. पो. हणमंतवाडी, ता. निलंगा, जि. लातूर.
मोबा. ९४२१९८६२९७आमची हणमंतवाडी हालगाव येथे ८ एकर मध्यम व हलक्या अशा दोन्ही प्रकारची जमीन आहे. त्यापैकी १ एकर मध्यम मुरमाड जमिनीमध्ये ६ जुलै २०११ मध्ये २ x २ x २ फुटाचे खड्डे खोदून त्यामध्ये शेणखत व पालापाचोळो टाकून खड्डे भरून घेतले. याअगोदर मे २०११ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी पुणे ऑफिसवरून 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची ७ पाकिटे बी (७०० बी) आणि सप्तामृत प्रत्येकी १ लि. व कल्पतरू ५० किलो घेऊन गेलो होतो. बिजप्रक्रियेसाठी २ लि. पाण्यामध्ये ७० मिली जर्मिनेटरचे द्रावण तयार करून त्यामध्ये बी रात्रभर भिजवून नंतर सकाळी सावलीत सुकवून नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वरून अर्धा इंच खोल आडवे टोकून लागवड केली. आठवड्याभरात उगवण झाल्यानंतर सप्तामृताच्या २ फवारण्यावर १॥ महिन्यात रोपे लागवडीयोग्य तयार झाली. रोपांची लागवड केल्यानंतर वेळोवेळी पुणे ऑफिसवर फोनवरून संपर्कात राहून सल्ल्याप्रमाणे सप्तामृत औषधांचे प्रमाणात बदल करून ४ फवारण्या केल्या आणि ४ महिन्याचे पीक असताना कल्पतरू ५० किलो रिंग पद्धतीने दिले. पाणी पाटाने देत होतो. आठव्या महिन्यापासून शेंगाचे तोडे चांगल्याप्रकारे सुरू झाले. सर्व शेंगा लातूर मार्केटला विकल्या. शेंगाचा इर्जा उत्तम असल्याने २५ ते ३० - ४० रू. पर्यंत/किलो भाव मिळाला. २५० झाडांपासून पहिल्याच बहाराचे खर्च वजा जाता ४५ हजार रू. उत्पन्न मिळाले आहे. हा शेवगा केशर आंब्यामध्ये १० -१० फुटावर आहे.

पानझड झालेल्या 'सिद्धीविनायक' शेवग्यावर सप्तामृत फवारणी

झाडांची दाटी होत असल्याने जून २०१३ मध्ये २ फुटावर छाटणी केली आहे. त्यावर सप्तामृताची एक फवारणी केली तर भरपूर फुटवे निघाले. मात्र मध्यंतरी महिना - दिडमहिना सतत व जादा पाऊस झाल्याने पानगळ झाली. एकूण २५० झाडांपैकी ४० -५० झाडांची पाने गळाल्याने खराट्यासारख्या काड्या झाल्या आहेत. त्यावर सप्तामृताची अजून एक फवारणी करणार आहे. बाकीची २०० झाडे पुर्णत: व्यवस्थित असून त्यांना फुलकळी लागण्यास सुरुवात झाली आहे. याला सप्तामृताच्या फवारण्या सल्ल्यानुसार नियमित करणार आहे.