कोकणात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून दर्जेदार आंबा उत्पादन व यशस्वी व्यापार - एक आशेचा किरण !

श्री. माधव अनंत निजसुरे,
मु. पो. वेळास , ता. मंडणगड, जि. रत्नागिरी.
मोबा. ९४२०३७८५५५मी गेली २ वर्षापासून 'कृषी विज्ञान" मासिकाचा वर्गणीदार आहे. मासिकातील माहिती अतिशय प्रेरणादायक असल्याने आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भारावून गेलो आहे. आमच्या जुन्या आंबा, सुपारी, नारळ बागेला तसेच भात शेतीला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे आहे. तेव्हा प्रथम या संदर्भत सरांशी चर्चा करून मार्गदर्शन घेण्यास आज १३ सप्टेंबर २०१३ रोजी आलो आहे.

आमच्याकडे हापूस आंब्याची २० - २५ वर्षाची ४०० झाडे, नारळाची २०० झाडे आणि सुपारी २॥ एकरमध्ये आहे. हापूस आंब्याच्या १० हजार पेट्या माल निघतो. ३ ते ६ डझन आंब्याची पेटी असते. ३ डझन आंब्याचे वजन १२ किलो असते. ३ डझन आंब्याच्या पेटीला १ हजार ते १२०० रू. भाव गेल्या हंगामात वाशी मार्केटला मिळाला. १६० १६० आंब्याची झाडे ५ ते ६ वर्षाच्या कराराने निगा राखण्यास घेतली आहेत. पावसाच्या आधी बागेचा सौदा होतो. बागेची माहिती मालकाकडून घेतली जाते व नंतर खरेदी केली जाते. आंबा काढणीच्यावेळी प्रतवारी करून पुण्यातील मोदी गणपतीसमोर आमचा गाळा आहे तेथे १५०० पेट्या आंबा विकला. यातून चांगला फायदा झाला. या आंब्याला आम्ही नेहमीप्रमाणे रासायनिक खते व कल्टारचा वापर करतो. त्याबरोबर कुजलेला कचरा खत म्हणून वापरतो. आंब्याचे उत्पादन घेत असताना आंब्यावर करपा, चिकटा, बोकड्या काळी बुरशी, मोहोरगळ होणे इ. समस्या येतात. रासायनिक खते, औषधे वापरून लाखो रुपयाचा खर्च होऊनदेखील मनासारखे उत्पादन मिळत नाही. म्हणून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे. सरांनी सप्तामृत फवारणीचे प्रमाण व कल्पतरूचा वापर तसेच झाडांना पेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे वापर करणार आहे. आमची भात शेतीदेखील आहे. सह्याद्री वाणाच्या भाताची १ काडी लागवड आहे. जागा पाणथळ आहे. डिसेंबरपर्यंत शेतात पाणी असते. भात निघाल्यानंतर सरांनी काकडी, वांगी, टोमॅटो लागवडीचा सल्ला दिला. आम्ही ही पिके थोड्या प्रमाणात करत असतो. परंतु डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने यावर्षी या पिकांचे दर्जदार उत्पदान घ्यायचे आहे.