टिश्युकल्चर केळीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा दुष्काळातही उत्तम रिझल्ट

श्री. कैलास महादेव खेडकर,
मु.पो. पिंपरी दुमाला, ता. शिरूर, जि. पुणे,
मोबा. ९२७००७४७४३


माझी एकूण ८ एकर शेती असून सप्टेंबर २०१२ मध्ये ३ एकर क्षेत्रामध्ये ग्रँड -९ केळीची ५ x ५ फुट आणि ५ x १० फुटावर लागवड केली. सुरुवातीला मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी माहीत नव्हती. परंतु किसान प्रदर्शनात भेट देत असताना स्टॉंलवर मी एका शेतकऱ्याचा केळीचा घड पाहिला. तो पाहून मी देखील अशा प्रकारचे केली उत्पादन घ्यायचे, असे ठरविले. चौकशी केली असता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादन घेतल्याचे त्या शेतकऱ्याने सांगितले. त्यावरून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरायचे ठरविले. त्यानंतर केळी ३ महिन्याची असताना कल्पतरू सेंद्रिय खत एकरी ५ बॅगा आणि १०:२६:२६ एकरी २ बॅगा तसेच सुक्ष्म अन्नद्रव्य २ बॅगा वापरले. एकरी ड्रीपमधून जर्मीनेटर १ लि. प्रमाणे प्रत्येक १५ दिवसाला सोडले. तसेच फवारणीतून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर वापरले असता झाडांची उंची व घेर चांगला वाढला. मागील वर्षी केळीला पाण्याचा ताण बसला होता. यावर्षीसुद्धा सुरुवातीला पाण्याचा ताण बसला, परंतु डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे केळी बागेवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मागील वर्षी मला खतांचा १ लाख रुपये खर्च येऊन सुद्धा गळीत (केळीची रास) फक्त २० ते २२ किलोचा घड निघाला होता. परंतु यावर्षी निम्म्याहून कमी खर्चात केळी घडांचे वजन ४२ ते ४५ किलो पर्यंत निघाले. आज दि. ६ ओगस्ट २०१३ रोजी नारायणगाव सेंटरचे प्रतिनिधी प्लॉटला भेट द्यायला आले होते. त्यावेळी घडांची काढणी चालू होती. २ टन २ माल काढला होता. प्लॉटची उंची बघून आणि घडांची फुगवण व उंची बघून पाहणारे लोक अचंबित होतात व विचारतात कोणते तंत्रज्ञान वापरले? तेव्हा मी अभिमानाने सांगतो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यामुळे हा फरक जाणवतो आहे. इतर कंपनीचे प्रतिनिधीही प्लॉट पाहून अचंबित होतात. (संदर्भासाठी प्लॉटचा फोटो कव्हरवर दिला आहे) ही सर्व किमया केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत व कल्पतरू सेंद्रिय खतामुळे घडली आहे. सध्याच्या प्लॉट परिस्थितीनुसार ३ एकर केळीपासून मला १०० ते १२० टन उत्पादन निश्चितच निघेल अशी खात्री आहे. यानंतर मी कांद्यालादेखील हीच टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.