झेंडुचे ३० गुंठ्यात ऑगस्ट ते डिसेंबर ५० हजार रू.

श्री. अजबराव गोविंदराव देसले, मु. पो. देवभाने, ता.जि. धुळे.
मोबा. ८८०६७५८१००


कलकत्ता झेंडुची १ ऑगस्ट २०१२ ला ३० गुंठे मध्यम प्रतीच्या जमिनीत लागवड ३' x २॥ वर केली होती. रोपे जर्मिनेटर च्या द्रावणात बुडवून लावल्यामुळे गळ पडली नाही. रोपांची जोमाने व लवकर वाढ सुरू झाली. नंतर प्रत्येक १५ ते २० दिवसांनी अशा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच ३ फवारण्या केल्या. एवढ्यावर प्लॉटचा फुटवा व वाढ चांगली होऊन फुलकळी वाढती. याला २४:२४:० युरीया खताच्या २ - २ बॅगा आणि पोटॅश १ आणि मॅग्नेशियम १, नंतर मायक्रोन्यु ट्रिअंट २५ किलोची १ असे खताचे डोस दिले. शेणखत लागवडीपुर्वी ३ ट्रॅक्टर टाकले होते.

५० दिवसात फुले चालु झाली. फुले चालू झाल्यावर पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची चौथी फवारणी केली. त्यामुळे फुलांचा दर्जा (कलर व आकर्षकपणा) वाढला. दसऱ्याला ३० ते ५० रू. प्रमाणे ३ क्विंटलचे १० हजार रू. झाले. नंतर दिवाळीत ३ क्विंटलचे ५० रू. भावाने १५ हजार रू. झाले. नंतर डिसेंबरपर्यंत २- ३ दिवसाला २० ते ३० किलो फुले निघत होती. ती धुळे मार्केटला २० रू. ने जात असत. शेवटी - शेवटी १५ रू. किलो भाव मिळाला. असे एकूण ३० गुंठ्यात ५० हजार रू. झाले.

या अनुभवातून १५ ऑगस्ट २०१३ रोजी १ एकरमध्ये कलकत्ता (ऑरेंज १५०० रोपे आणि यलो १५०० रोपे) लावला आहे. यावेळी लागवडीतील अंतर वाढवून ४' x २॥' केले. त्यामुळे वाढ चांगली होते. मोकळी हवा लागते. त्यामुळे रोगराई कमी होते. फुले तोडायला मोकळे फिरता येते. त्यामुळे फांद्या मोडत नाहीत.नुकसान टळते.

याकरीता रोपे नर्सरीवाल्याने नारायणगाववरून २।। रू. प्रमाणे नंदुरबार पर्यंत दिली. तेथून आपल्या गाडीने मागविली. या प्लॉटसाठी आज (२० ऑगस्ट २०१३) सप्तामृत घेण्यास आलो आहे.