कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भगवा तेल्यामुक्त, माल दर्जेदार व दर अधिक

श्री. धुळदेव कचरे,
मु.पो.निमगाव केतकी, ता.इंदापूर, जि.पुणे,
मोबा. ९४०३९५४७३९



६ वर्षापुर्वी आम्ही लावलेली भगवा डाळींबाची ९०० झाडे आहेत. जमीन पुर्णता माळरानाची आहे. तसेच आमच्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. अशा परिस्थितीत देखील गेल्यावर्षी जून २०१३ ला मृग बहार धरला. हा तिसरा बहार होता. झाडे १२' x १०' वर आहेत. पाणी ठिबकने देतो. बागेला छाटणीनंतर शेणखत, निंबोळीपेंड आणि रासायनिक खते देऊन पाणी सोडले. जमीन पुर्ण पणे माळाची असल्याने ८ - १० दिवसाचा ताणसुद्धा बागेला पुरेसा होतो. एवढ्यावर ७० % पानगळ होते आणि इथ्रेलची १ फवारणी केली कि राहिलेली पानेही गळतात.

नेहमीप्रमाणे बागेला बहार धरल्यानंतर रासायनिक औषधे व विद्राव्य खते वापरत होतो. ४० - ५० फळे झाडावर होती. ह्या बहाराची फळे नोव्हेंबर २०१३ ला चालू झाली. १।। टन माल जागेवरून च व्यापाऱ्यांनी ६६.५० रू./किलो भावाने नेला. ४०० ते ५०० ग्रॅमची फळे होती. राहिलेल्या मालातील मध्यम प्रतीचा काही माल पुणे मार्केटला भास्कर लवटे यांच्या गाळ्यावर जानेवारी २०१४ ला आणला होता. तेव्हा मार्केटला आल्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली.

तेव्हा ऐन उन्हाळा सुरू झाला आणि बागेस पाणी कमी पडले. शेंड्यावर लागलेला माल काही फुगत नव्हता. टँकरने पाणी आणून बागेला देत होतो. तर माल फुगावणीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमधून थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, हार्मोनी घेऊन गेलो. त्याची फवारणी केली असता मालाच्या आकारात व शाईनिंगमध्ये फरक जाणवला. तोडे चालूच होते. प्रतवारी नुसार मालास भास्कर लवटे (पुणे) यांच्या गाळ्यावर १८० रू./किलो पर्यंत उच्चांकी भाव मिळाला. सरासरी मालास ७० रू. पासून ते १०० रू. भाव मिळाला. त्यानंतर शेवटचा राहिलेला माल पोसण्यासाठी पुन्हा दुसऱ्या फवारणीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन घेऊन फवारणी केली तर शेंड्यावरचा माल देखील अत्यंत कमी पाण्यावर चांगला पोसला. सुरुवातीच्या मालापेक्षा साईज वाढून ६०० ते ७०० ग्रॅम पर्यंतची फळे मिळाली. नोव्हेंबर २०१३ ते मार्च २०१४ पर्यंत तोडे चालू होते. एकूण ८२५ क्रेट उत्पादन ९०० झाडांपासून मिळाले. एका क्रेटचे वजन १८ किलो भरत होते. अत्यंत कमी पाण्याच्या मानाने चांगले वजन मिळाले.

विशेष म्हणजे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करण्यापुर्वी २ - ३ झाडांवर लाल्याचा प्रादुर्भाव जाणवत असतानाच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्या केल्याने तेल्या जागेवर थांबला. तो अजिबात स्प्रेड झाला नाही. शेजारी इतरांच्या बागामध्ये मात्र तेल्या रोगाचे प्रमाण अधिक होते.

यावर्षी चौथा बहार ऑगस्ट २०१४ ला धरला आहे. आमच्या भागात यंदा तेल्याचा प्रादुर्भाव खूपच वाढला आहे. त्यामुळे जूनचा बहार न धरता थोडा लेट बहार धरला आहे.

बागेची छाटणी केल्यानंतर खते देऊन पाणी दिल्यावर बाग फुटीसाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझमची पहिली फवारणी केली आणि जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले तर बाग चांगली फुटली. नंतर फुले लागताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट, फवारले. त्यामुळे सेटिंग चांगले झाले. सध्या बागा पुर्णपणे तेल्यामुक्त असून लिंबू आकाराची ३० ते ४० फळे आहेत. अजून सेटिंग होण्यासाठी व मालाचा दर्जा वाढण्यासाठी आज (१३ सप्टेंबर २०१४) तिसऱ्या फवारणीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ३ लि. आणि हार्मोनी २ लि. घेऊन जात आहे.