'कुदरत' गव्हाचे बेण्याने कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे घडली आमची 'कुदरत'

श्री. अंकुश बाबुराव मोहिते,
मु.पो. शिनगरवाडी (टाकळी हाजी), ता. शिरूर, जि. पुणे.
मोबा. ९४०४२४४५१७


माझा जन्म (१९५५) भायखळा (मुंबई) येथील, आमची शिरूरला वडीलोपार्जित ७ एकर जमीन होती. शिरूर तालुका हा ५० वर्षापुर्वी दुष्काळी होता. त्यामुळे शेती पिकत नसे. म्हणून आम्ही मुंबईलाच स्थायिक झालो. शिक्षण मुंबईत पुर्ण झाल्यावर ३५ वर्षे कॉलेजमध्ये लेखनिक पदावर नोकरी केली. आता २००८ साली निवृत्त झाल्यानंतर शेती करू लागलो.

पहिले २ - ३ वर्षे प्रायोगिक तत्वावर शेती केली. ३ वर्षापुर्वी 'सिद्धीविनायक' शेवग्याची ४०० झाडे लावली होती. तेव्हापासून सरांची व या तंत्रज्ञानाची ओळख झाली. शेवग्याचे उत्पादन भरपूर आले, मात्र मजुरांअभावी शेगांची विक्री करू शकलो नाही. यामुळे तो काढून टाकला. त्यानंतर गेल्यावर्षी रब्बीत कुदरत १७ या गव्हाची २।। एकरमध्ये पेरणी केली. तसेच याबरोबर १।। एकर गावरान हरभरा केला. या पिकांना शेणखत नसल्याने पिकांची अवस्था बिकट होती. तसेच गहू पोसण्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याची गरज होती मात्र ते देऊ शकलो नाही. तरीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांनी आम्हास तारले.

गहू १।। महिन्यात असताना मावा पडू नये तसेच फुटव्यांचे प्रमाण वाढून त्यांची वाढ होण्यासाठी सप्तामृताची पहिली फवारणी केली. त्याने गहू किडरोगमुक्त राहून आध समाधानकारक झाली. पुढे पोटरीत गहू असताना दुसरी फवारणी सप्तामृताची केली. त्याने ओंब्यांचा आकार व लांबी वाढली. गव्हाचे ओंबीतील दाण्यात चिक भरतेवेळी पाणी कमी पडल्याने देवू शकलो नाही. त्यावेळी पिकास पाण्याची अत्यंत गरज होती. मात्र ती भागवू साकलो नसल्याने या अवस्थेत पुन्हा सप्तामृताची तिसरी फवारणी केली तर सप्तामृतामुळे दाण्यांचे पोषण चांगले झाले. एरवी या अवस्थेत पाणी कमी पडल्यावर दाने पोचट राहिले असते. फवारणीमुळे दाण्यांचा आकार, वजन वाढून उठावदार दाणे तयार झाले. हा गहू फेब्रुवारी अखेरीस काढला तर २।। एकरातून ४५ पोती गव्हाचे उत्पादन मिळाले. या गव्हाची चपाती अतिशय चवदार लागत आहे. अजून गव्हाची विक्री केली नाही.

हरभऱ्यालादेखील गव्हाप्रमाणेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ फवारण्या घेतल्या तर १।। एकरात ९ पोती हरभरा झाला. या अनुभवातून यावर्षी देखील गहू, हरभऱ्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.