हळवा कांदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अजून लवकर व गरव्यासारखा येतो, त्यामुळे अधिक भाव व अधिक नफा

श्री. सदाशिव आत्माराम भगत,
मु.पो. राजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे,
मो. ७७२१००५०१४



हळव्या कांद्याची लागण केल्यानंतर आंबवणी देताना जर्मिनेट एकरी १ लिटर पाण्यामधून सोडले, त्यानंतर कांदे चांगले फुटून आल्यावर त्याला थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५० मिली/१५ लिटर पंपाला घेऊन फवारणी केली. त्यानंतर ८ दिवसांनी पाण्यातून एकरी १० किलो युरिया दिला. त्यानंतर १५ दिवसांनी १९:१९:१९, बायोझाईम व कॉन्फीडॉंरची फवारणी केली. एकरी १८:४६ च्या दोन बॅगा दिल्या. दरम्यान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या ३ फवारण्या १५ - १५ दिवसाला केल्या. आता कांद्याचे पोषण चांगले झाले असून काढणीस आला आहे. एकरी १० ते १२ टन माल निघेल अशी अपेक्षा आहे.