पोळ्याला कापूस वेचणी सुरू होऊन एकूण ४ वेचणीत एकरी १२ क्विंटल

श्री. मोहन जयराम चौधरी, मु.पो. खेडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव.
मो. ९४०५४४१९१७


मी माध्यमिक विद्यालय, खेडगाव येथे शिक्षक होतो. २००८ साली निवृत्त झालो. माझा मुलगा योगेश हा ३ वर्षापुर्वी जळगाव येथे कृषी प्रदर्शन पाहण्यास गेला होता तेव्हा तेथे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या स्टॉलवर प्रतिनिधींनी सखोल अशी माहिती दिली. तेथून कृषी विज्ञान मासिक आणि कापूस पुस्तक आणले. त्यातील पिकांची माहिती तसेच शेतकऱ्यांच्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरून यशस्वीरित्या उत्पादन घेतलेल्या यशोगाथा वाचून आम्ही प्रभावित झालो. आम्ही दरवर्षी १८ ते २० एकर कापूस लावत असतो. ३ वर्षापुर्वी (जून २०१४) ८ एकर कापूस लावला होता. मात्र त्यातील २ एकरवरच ह्या तंत्रज्ञानाचा प्रयोग केला. बाकिच्या प्लॉटला नेहमी प्रमाणे सेंद्रिय व रासायनिक खते, औषधांचा वापर करत होतो. तर यामध्ये आम्हाला असे आढळले की, आम्ही नेहमीप्रमाणे वापर करत असलेल्या क्षेत्रामधील खर्च जास्त व उत्पदान एकरी ८ ते ९ क्विंटल च्या वर निघत नव्हते. तर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेल्या प्लॉटमधून एकरी २- ३ हजार रू. खर्च कमी येऊन खात्रीशीर रिझल्ट मिळाल्याने १२ क्विंटल उत्पादन मिळाले.

या अनुभवावरून आम्ही गेल्यावर्षी जून २०१५ ला लागवड केलेल्या १८ एकर कपाशीवर डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले. यामध्ये खते नेहमीचीच रासायनिक वापरली, मात्र ठिबक असल्याने जर्मिनेटरचे ड्रेंचिंग आणि सप्तामृताच्या कपाशी वाढीच्या काळात एक नंतर फुलपात्या लागताना एक आणि बोंडे पोसताना एक अशा एकूण ३ फवारण्या केल्या कीड प्रतिबंधासाठी आलटून पालटून रासायनिक औषधांच्या फवारण्या घेत होतो. तर गेल्यावर्षी पाणी कमी असल्याने कपाशीची वाढ खुंटली असताना आम्ही जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले असता पांढऱ्या मुळीची वाढ होऊन वर शेंडा वाढ होऊ लागली. याच काळात झाडांवर सप्तामृत फवारल्यामुळे फुटवे नेहमीपेक्षा जास्त निघून झाडांची वाढ सुरुवातीला जी इतरांच्या कपाशीपेक्षा कमी होती ती इतरांपेक्षा जास्त झाली. पाने हिरवीगार, रुंद, टवटवीत झाली. नंतर फुलपात्या लागताना केलेल्या सप्तामृत फवारणीमुळे झाडाच्या सर्व फांद्यांना फुलपात्या भरपूर लागल्या, शिवाय गळ न होता बोंडामध्ये रूपांतर झाले. त्यानंतर बोंडे पोसताना राईपनर, न्युट्राटोन, फवारल्याने बोंडांची फुगवण चांगल्याप्रक्रारे झाली. दरवर्षी झाडांवर बोंडाची संख्या कमी व फुगवण साधारण असायची. त्यामुळे एकरी ८ - ९ क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन मिळत नव्हते. मात्र यावेळी पोळ्याला पहिली वेचणी सुरू होऊन पहिल्या २ वेचण्यातच ७० ते ८०% कापूस घरात आला. नंतर तिसऱ्या व चौथ्या वेचणीत बाकीचा कापूस वेचला. तर एकरी १२ क्विंटल ची रास मिळाली.

या अनुभवातून चालू वर्षी जुलै २०१६ मध्ये ४।।' x २' वर लावलेल्या १८ एकर कापसासाठी हे तंत्रज्ञान वापरत आहे. जमीन नेहमीचीच मध्यम प्रतीची आहे. ठिबकमधून आतापर्यंत जर्मिनेटरचे २ वेळा ड्रेंचिंग केले आहे. तसेच सप्तामृत औषधांच्या २ फवारण्या केल्या आहेत. सध्या कपाशी झाडांची उंची ४ x ४।। फुट असून फुलपात्यांची संख्या ५० ते ८० पर्यंत आहे, शिवाय ३० -४० बोंडेही लागलेली आहेत. हा कापूस ऑकटोबर २०१६ मध्ये वेचणीस येईल.

लिंबाच्या हस्त बहारास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी प्रयोग

लिंबाची ९ वर्षापुर्वीची ३ एकर आणि ४ वर्षाची ३ एकर बाग आहे. जुनी बाग आम्ही कॉन्ट्रॅक्टने पोळा ते पोळा असे वर्षासाठी ३ लाख रु. ला देत असे. गेल्यावर्षी त्या कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या शेतकऱ्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती सांगून वापरण्यास सांगितले तर लिंबाचा बहार जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझमच्या फवारण्यांमुळे चांगला फुटला. मग त्याने फळे पोसण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेतल्या तर फळांचा आकार वाढला. झाडांना व फळांना चमक आली, हे मी स्वतः पाहिले.

त्यावरून नवीन लिंबाच्या (४ वर्षाच्या) ३ एकर बागेचा बहार आम्ही स्वतः घेतला आहे. त्याला ऑगस्टमध्ये जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करून जर्मिनेटर, थ्राईवर व प्रिझमची फवारणी केली. त्यामुळे हस्त बहार अतिशय चांगल्याप्रकारे फुटला आहे. आता जुन्याबागेचा ५ वा बहार जानेवारीत (आंबे बहार) मी स्वतःधरणार आहे.