शेजाऱ्याने तणनाशक फवारल्याने खराब झालेला कपाशी प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दुरुस्त होऊन उत्पन्नाची अपेक्षा

श्री. अवधूत देवराव वाघमारे, मु.पो. परजना, ता. उमरखेड जि. यवतमाळ - ४४५२०६.
मो. ९६६५७८२०३८


मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर गेल्या वर्षी (जुलै २०१५) पासून कापूस या पिकावर करत आहे. गेल्यावर्षी मला ३ एकर क्षेत्रामध्ये जमीन हलक्या प्रतिची असूनही २१ क्विंटल कापूस झाला होता. सतत ३ वर्षपासून दुष्काळ होता. गेल्या वर्षी पाऊस झाला. मात्र त्यामध्ये खंड पडत होता. तरीही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने मला २१ क्विंटल कापूस झाला. तेच माझ्या जवळच्या शेतकऱ्यांना फक्त ४ - ५ क्विंटल कापूस झाला. तेव्हापासून मी आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी सतीश दवणे (९६०४५२५२११) ह्यांनी सांगितल्या प्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो. चालूवर्षी २० जून २०१६ ला आम्ही ५ एकरमध्ये डॉ. ब्रेंड ट्रस्ट हा कापूस ४' x १' वर लावला आहे. जमीन हलकी आहे. तर आमच्या शेजाऱ्याने त्याच्या शेतातील धुरे होते त्या बांधावर २ - ४ डी तणनाशकाची फवारणी केली. त्याचा माझ्या अर्धा एकर कापूस प्लॉटवर दुष्परिणाम दिसत होता. त्यावेळेस आमच्या आजु - बाजूचे शेतकरी म्हणत, की कापूस उपटून मका पेरा. कापूस काही सुधारणार नाही. मी त्यावेळेस सतीश धवणे यांना फोन करून विचारतो व नंतरच निर्णय घेतो असे म्हणालो. धवणे यांनी मला सांगितले की, याला प्रथम जर्मिनेटर ५० मिली आणि प्रिझम ५० मिलीची १० लि. पाण्यातून आळवणी करा. त्याप्रमाणे आळवणी केली आणि नंतर मी जर्मिनेटर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + न्युट्राटोन ५० मिली प्रति पंपास घेऊन फवारणी केली. एवढ्यावरच कापूस पिकामध्ये सुधारणा झाली. आज रोजी २ -४ डी चा प्रादुर्भाव झालेला प्लॉट व दुसरा प्लॉट यात फरक दिसत नाही. झाडावर २० ते २५ बोंड आहेत. यंदा पावसाळा चांगला असल्याने ३ एकरातून ३० - ३१ क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. तसेच या वर्षी विहीर पाण्याने भरली असल्यामुळे आपल्या टेक्नॉलॉजीने फरदड कापूस घेणार असून रब्बीतील हरभरा पिकासाठी देखील हे तंत्रज्ञान वारपणार आहे.