पपई ४ एकरमधून ९२ टन, इतरांना ६० ते ७० टन, कापूस, तूर, उडीद, ऊस यास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा यशस्वी वापर

श्री. विनोद लक्ष्मणदास शहा,
मु.पो. खेतिया, ता. पानसेमल, जि. बडवानी (म.प्र.)
मो.०९९७७२९२५६७


मी ५ - ६ वर्षापुर्वी ४ एकर पपई आणि ४ एकर कापूस पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरली होती. तेव्हा मार्च महिन्यात भारी काळ्या जमिनीत ८' x ६' अंतरावर तैवान पपईची रोपे आणून लावली होती. त्यावेळी मला 'कृषी विज्ञान' मासिकामधून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी माहिती मिळाली. त्यानुसार पपईचा प्लॉट साधारण १ महिन्याचा असताना १५ - १५ दिवसांच्या अंतराने २ वेळा जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट आणि न्युट्राटोन यांच्या प्रत्येकी ५०० मिली + १५० लि. पाणी याप्रमाणे फवारण्या केल्या आणि जर्मिनेटर एकरी १ लि. या प्रमाणे ड्रेंचिंग केले तर रोपांची कडक उन्हाने जी मर होत होती आणि झाडे सुकून वाढ होत नव्हती ती या फवारण्यांमुळे व जर्मिनेटरच्या आळवणीमुळे मर जागेवर थांबून रोपांना नवीन पाने फुटली. जुन्या पानांचा पिवळेपणा जाऊन काळोखी आली. मग पुढे झाडांच्या निरोगी वाढीसाठी दर महिन्यास सप्तामृताच्या फवारण्या करत होतो. त्यामुळे झाडांची निरोगी वाढ होऊन फुलकळीची गळ न होता फळधारणा ५ महिन्यातच झाली. त्यानंतर फळे पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे ३ फवारण्या केल्या. तेवढ्यावर फळांचे पोषण चांगले झाले. पपईचा हा पहिलाच प्रयोग होता तरी व्हायरसमुक्त निरोगी बाग राहून आम्हाला ४ एकरातून ९२ टन उत्पादन मिळाले की जे इतर अनुभवी शेतकऱ्यांना त्या परिसरात ४ एकरात जास्तीत जास्त ६० ते ७० टनापर्यंत उत्पादन मिळत होते.

एरवी कापसाचा ५ ते ६ क्विंटल उतारा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने १० क्विंटल

त्यावर्षी (२०११) जूनमध्ये कापूस (जे. के. सिडसचा) ६' x १' वर लावला होता. कापसाला देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ४- ५ फवारण्या घेतल्या होत्या, ते झाडांची निरोगी ५' - ६' वाढ होऊन फांद्यांचा फुटवा वाढून नेहमीपेक्षा फुलपात्यांचे प्रमाण वाढले होते. शिवाय दरवर्षीच्या तुलनेत फुलगळीचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे बोडांची संख्या वाढून प्रत्येक झाडावर ६० ते ७० बोंडे होती. त्यांचे पोषण नेहमीपेक्षा चांगले झाल्याने आम्हाला एकरी ५ - ६ क्विंटल उत्पादन मिळायचे, हा कापूस बागायती पण कमी पाण्यावरील होता.

कापसात उडीद

पपई आणि कापूस डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने अतिशय यशस्वी झाल्याने पुढेही हे तंत्रज्ञान वापरायचे होते. मात्र दरम्यानच्या ५ - ६ वर्षात प्रकृती अस्वस्थामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले होते.

आता चालूवर्षी मात्र या जुन्या अनुभवातून पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे. चालूवर्षी पट्टा पद्धतीने ७ फूट पट्टा आणि नंतर ३ फुटाची जोड ओळ आणि ओळीतील रोपांमधील अंतर १ फूट अशा प्रकारे अंबीका -१२ आणि ५०५ या दोन्ही जातीचा मिळून १५ एकर कापूस जून २०१६ ला लावला आहे आणि पट्ट्यामध्ये उडीद पेरले आहे.

तुरीतही उडीद

कापसाप्रमाणेच राजेश्वरी जातीची तूर लावली असून मध्ये पट्ट्यात उडीद पेरला आहे. तेव्हा या तिन्ही पिकांना चालूवर्षी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी वरील अनुभवावरून आज सरांचे (३०/७/२०१६) मार्गदर्शन घेण्यास आलो आहे.

ऊसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचा मानस

ऊस खोडव्यासह एकूण २५ एकर आहे. त्यातील बेणे प्लॉट कापसाप्रमाणेच जोड ओळची एप्रिलमध्ये १ एकर २६५ आणि १०००१ या दोन्ही जातीची लागवड केली असून १ एकर ८६०३२ जुलै २०१६ मध्ये ३।। फुटी सरीवर २ डोळे अशी लागवड केली आहे. या उसालादेखील हे तंत्रज्ञान वारपणार आहे.