मागील वर्षापर्यंत शेतीत नेहमी येणारे नैराश्य व अति पाऊस होऊनही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दिले हमखास सोयाबिनचे उत्पादन व तूर डवरली

श्री. धनेश उमाशंकर जयस्वाल,
मु.पो. गावनेर, ता. नांदगाव, जि. अमरावती - ४४४६०३.
मो. ९८५०३४३५३६


मला शेतीचा अनुभव कमी असल्याने गेल्या वर्षी कृषी सेवा केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे वापरत होतो. मात्र यामध्ये माझे फार नुकसान झाले. त्यामुळे यावेळेस आमचे साळभाऊ यांच्या सल्ल्यानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापर करण्याचे ठरविले अमरावती येथे सुधीर लढ्ढा यांच्याकडे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे मिळत असल्याने समजले कंपनी प्रतिनिधी सुजीत भजभुजे (मो. ९६६५२९०४९५) यांच्या मार्गदर्शनानुसार सोयाबीन व तुरीला हे तंत्रज्ञान वापरू लागलो.

१० एकरमध्ये सोयाबीनच्या ७ ओळी नंतर तुरीची १ ओळ अशी २५ जून २०१६ रोजी पेरणी केली होती. सोयाबीन जेएस - ३३५ आणि मारुती वाणाची तूर आहे. जमीन हलकी मुरमाड प्रतिची आहे. प्रथम जर्मिनेटर व प्रोटेक्टंटची बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण एकसारखी दिसत होती. त्यानंतर १० दिवसांनी पंपास जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + प्रिझम ५० मिली आणि टरगासुपर घेऊन फवारले. त्यामुळे सोयाबीन ताजेतवाने दिसत होते. मात्र त्यानंतर सतत १० - १२ दिवस पाऊस पडत असल्याने सोयाबीन व तुरीचा अति पाण्याने ७० - ८० टक्के प्लॉट वाया जाणार अशी परिस्थिती झाली. याकरीता मी सोनाली ट्रेडर्स, अमरावती येथे गेलो. त्यांना पिकाची परिस्थिती सांगितली. त्यावर त्यांनी सांगितले की खोडामधील एक जरी पांढरी मुळी जिवंत असली तरी आपण पुर्ण झाड जिवंत करू. त्यावर माझा विश्वास बसेना. मात्र पर्याय नसल्याने वापरून बघूया, कारण पीक वाचले तर दुबार पेरणीचे संकट तरी टळेल. यामुळे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर खर्च करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी दिलेले जर्मिनेटर हे पाण्यामध्ये मिक्स करून झाडांच्या मुळापाशी सोडले. त्यानंतर ७ - ८ दिवसात झाडांना पाने फुटली व काडी जोम धरू लागली. ते पाहून मला आश्चर्य वाटले. ८ ते १० दिवसात ७० ते ८०% मरगळलेला प्लॉट ५० ते ६० % पुर्णपणे बहरला. नंतर मी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली प्रति पंपास घेऊन दुसरी फवारणी केली. त्यामुळे कोणत्याही रोगाचा तसेच खराब हवामानाचा पिकांवर वाईट परिणाम झाला नाही.

त्यानंतर सोयाबीन फुलावर आल्यावर प्रति पंपास थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + न्युट्राटोन ६० मिली + राईपनर ६० मिलीची किटकनाशकासोबत फवारणी केली. एवढ्यावर सोयाबीन व तुरीचे पीक अतिशय उत्तम असे बाहरून एकरी १० ते १२ पोते सोयाबीनचा उतारा मिळाला तर तुरीला पुन्हा एक फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनची केली आहे. शेंगा बऱ्यापैकी असल्याने ५ ते ६ पोटे तूर होईल असा अंदाज आहे. शेतीत गेल्यावर्षी नुकसानीत गेलो होतो. त्यामुळे आलेले नैराश्य डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे जाऊन मला शेतीत आवड निर्माण झाली. पुढील वर्षी मी कपाशी लावणार असून त्यासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचे ठरविले आहे.