५ गुंठे वांगी ५० दिवसात सुरू, सर्व खर्च ५० हजार, उत्पन्न १।। लाख, अजून २ महिने उत्पादन येईल

श्री. भगवान दगा ठोके,
मु.पो. दऱ्हाणे, ता. सटाणा, जि. नाशिक.
मो. ९९७५२७४२६६


आम्ही गेली ३ - ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरून वांग्याचे अतिशय चांगल्याप्रकारे उत्पादन घेत आहे. चालूवर्षी ५ गुंठ्यामध्ये गावरान काटेरी हिरव्या वांग्याची लागवड २५ मे २०१६ रोजी केली. मध्यम प्रकारच्या जमिनीत ठिबकवर ४' x ३' वर वांगी लावली आहेत. रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही रोपांची मर न होता, रोपे न सुकत वाढ सुरू झाली. पांढऱ्या मुळीचा जारवा वाढला. त्यानंतर दर १० ते १२ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट, हार्मोनीच्या फवारण्या करत असे. वातावरण जास्तच खराब असले तर ३ - ४ दिवसाला देखील फवारण्या करतो. शेंडे अळी किंवा फळातील अळीसाठी कोरेजन या रासायनिक औषधाची गरजेपुरत्या आलटून पालटून फवारण्या घेतो.

ह्या वांग्याचा प्लॉट १ महिन्याचा असताना ५ गुंठ्याला ५० किलो कल्पतरू खत रोपाजवळ गाडून दिले. त्यानंतर माल सुरू होताना पुन्हा ५० किलो कल्पतरू खताचा डोस दिला. त्यामुळे झाडांची वाढ झपाट्याने होऊन ४ x ३ अंतर झाकले जाऊ लागले. झाडे कंबरेच्यावर लागत होती. १५ जुलै २०१६ ला तोडा चालू झाला. दिवसाड सुरुवातीला ४ - ५ क्रेट माल निघत होता.

त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारण्यांमुळे मालामध्ये वाढ होत गेली. सुरुवातीच्या ४ - ५ तोड्यानंतर ८ ते १० क्रेट माल निघू लागला. ही वांगी चांदवड, कळवण, देवळा, अबोना या गावी आठवडी बाजारामध्ये ठोक विकली. जून - जुलैमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यामुळे बाजारभाव ऑगस्ट २०१६ पर्यंत तेजीचे मिळाले. ४०० ते ५०० रु./ क्रेट भाव मिळत होता. त्यानंतर बाजारभाव कमी होऊ लागले सध्या ३०० ते ३५० रु./ क्रेट भाव मिळत आहे. या वाग्यांला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीसह सर्व मिळून ५० हजार रु. खर्च होऊन १।। लाख रु. उत्पन्न आज (३ सप्टेंबर २०१६) अखेर झाले असून अजून २ महिने वांगी चालतील. तेव्हा मी अजून १० गुंठ्यामध्ये नवीन वांगी लागवड केली आहे. सध्याचा चालू प्लॉटचा माल संपला की लगेच हा नवीन प्लॉट सुरू होईल. याला देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी सुरुवातीपासून वापरत आहे.