जिरे लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जिऱ्याचे झाड लहान, ३० सें.मी. उंच, सडपातळ व वार्षिक असते. खोड बारीक असते आणि खालच्या भागातून बऱ्याच फांद्या वाढतात. पाने पातळ, लांब व निळसर हिरव्या रंगाची असतात. पानाचा खालचा भाग (देठ) खोडाभोवती गुंडाळलेला असतो. फुलांचा रंग पांढरा किंवा फिकट लाला (गुलाबी) असून त्यांचा झुबका असतो. फळ बारीक असून १/५ किंवा १/६ इंच लांब असते. दबलेले असून दोन्ही टोकांना निमुळते असते. फळावर धारा आणि अखोडद केस असतात. काही जातीच्या जिऱ्यावर केस नसतात.

जिऱ्याचे बी मसाल्यासाठी वापरतात. तसेच त्याचे औषधी उपयोगही आहेत. युरोपमध्ये जिऱ्याचे ऐवजी 'कॅरावे' (विलायती जिरे) वापरतात. इंग्रजीत जिऱ्याला 'क्युमीन सीड' म्हणतात. जिऱ्याचे मुळस्थान इजिप्त असले तरी प्राचीन काळापासून भारतात जिऱ्याची लागवड होते. भारताव्यतिरिक्त इराण, अरबस्थान, इलिप्त, मोरोक्को, सिसीली, चीन, जावा इ. देशात जिऱ्याची लागवड करतात. भारतात बंगाल व आसाम व्यतिरिक्त सर्व राज्यात जिऱ्याची लागवड होते. यामध्ये पंजाब, राजस्थान, गुजराथ व उत्तरप्रदेश या राज्यात त्याची लागवड बरीच होते. जबळपूर, रतलाम, जयपूर व गंगापूर ही जिऱ्याची व्यापर केंद्रे आहेत.

जिऱ्याला विशिष्ट मसाल्याचा सुवास असतो. चव किंचित कडवट असते. जिऱ्यामध्ये खालील घटक असतात - पाणी ११.९%, प्रथिने १८.७%, कर्बोदके ३६.६%, तंतू १२%, खनिजे ५.८%, कॅल्शियम १.०८%, स्फुरद ०.४९%, लोह १०० ग्रॅममध्ये ३१ मिलीग्रॅम, कॅरोटीन (अ जीवनसत्व) १०० ग्रॅममध्ये ८७० आंतरराष्ट्रीय एकके, उडणारे तेल २ ते ४%. या तेलाचा वास मनपसंत नसतो आणि चव कडू असते. ताजे तेल रंगरहित किंवा पिवळे असते. जुने झल्यानंतर गडद बनते. या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्यात, मद्यात व कॉर्डियल मध्ये सुगंधासाठी करतात. भारतात जिऱ्याचे उत्पादन सुमारे ६०,००० मे. टन होते. त्यापैकी १०% उत्पादन राजस्थान व गुजराथमध्ये होते.

*हवामान :

समुद्र किनाऱ्यापासून १०,००० फूट उंचीपर्यंत जिऱ्याची लागवड होते. मैदानी उष्ण हवामानापेक्षा सौम्य हवामान पिकाला मानवते. हे पीक नाजूक असल्याने बागायती पीक घेतात. माध्यम स्वरूपाचे नियमित पाणी देतात. पैकी काढण्याच्या काळात हलक्या पावसाच्या सरी लागतात. मुसळधार पावसाने पिकाचे नुकसान होते, म्हणून मुसळधार पावसाचे आधी व नंतर या पिकाची लागवड करतात.

* जमीन :

जिऱ्याचा लागवडीसाठी खोल, भुसभुशीत, उत्तम निचऱ्याची, सुपीक पोयट्याची जमीन योग्य असते. लागवडीसाठी जमिनीची उत्तम मशागत करून सेंद्रिय खते द्यावी लागतात.

* जाती :

जिऱ्याच्या 'आरझेड १९' (युसी १९) या सुधारित जातीची शिफारस राजस्थानकरिता केली आहे. ही जात मर रोगाला प्रतिकारक आहे. या जातीच्या जिऱ्याची प्रत चांगली आहे. बियात उडणाऱ्या तेलाचे प्रमाण २.६% आहे. प्रति एकरी सरासरी २.५ ते ३ क्विंटल जिऱ्याचे उत्पादन मिळते. या जातीचे बी राजस्थान कृषि विद्यापीठ, जोबानेर येथून मिळवावे.

* लागवड :

जिऱ्याची लागवड दोन हंगामात करतात. लवकर लागवड एप्रिलच्या मध्यात करतात आणि उशिरा लागवड ऑक्टोबरच्या अखेरीस करतात. पीक ९० दिवसात तयार होते. जमिनीची चांगली मशागत करून चांगल्या पोताची जमीन तयार करावी. प्रति एकरी चांगले कुजलेले शेणखत ३० ते ४० गाड्या आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० ते १५० किलो जमिनीत मिसळावे. सिंचनासाठी सपाट वाफे तयार करावेत. या वाफ्यात बी फेकून पेरतात. ते हाताने जमिनीच्या पृष्ठभागात समान मिसळतात. प्रति एकरी १४ ते १६ कि. ग्रॅ. बी लागते. वाफ्यांना हलके पाणी द्यावे. बी पाण्यावर तरंगून वाफ्याच्या कोपऱ्यात गोळा होणार नाही याची काळजी घ्यावी. पाच दिवसात बी उगवते. दररोज हलके पाणी द्यावे. ७ ते १० दिवसांनी वाफ्यातील तण काढावे. आवश्यकता असल्यास पिकाची विरळणी करावी. म्हणजे पिकाची वाढ झपाट्याने होते. पाण्याची पाळी ३ किंवा ४ दिवसांनी द्यावी.

* पीक संरक्षण :

या पिकावर महत्त्वाची कीड किंवा रोग आढळत नाहीत. कधीकधी पाने खाणाऱ्या अळ्या व फुलावर ढेकण्या कीड आढळते. त्यांचे नियंत्रणासाठी नीमार्कची फवारणी करावी.

* रोग : १) भुरी : राजस्थान व महाराष्ट्रातील जिरे पिकावर हा बुरशी (Erysiphe Polygoni) रोग आढळतो. तो उशीरा (पीक फुलावर व दाण्यावर असतांना) जानेवारी ते मार्च महिन्यात हवामान कोरडे व तापमान कमी असतांना आढळतो. महाराष्ट्रात या रोगामुळे ५० टक्के उत्पादन घटते. फार उशिरा रोग पडल्यास १५% उत्पादन घटते. सुरुवातीला पानांच्या खालच्या बाजूवर लहान पांढऱ्या किंवा करड्या रंगाचे ठिपके दिसतात. त्यानंतर संपूर्ण पानावर राखेच्या रंगाचा भुकटीचा थर थिसतो. हा रोग खोड, फुले व फळांवर पसरतो. गरम, दमट हवामानात रोगाचा झपाट्याने प्रसार होतो. प्रसार हवेतून होतो.

उपाय :

१) निरोगी बी पेरणी करिता वापरावे.

२) पिकावर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच प्रति एकरी १० किलो गंधकाची भुकटी धुरळावी किंवा ०.२% पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाची फवारणी करावी किंवा ५०० मिली हार्मोनी २५० ते ३०० लि. पाण्यातून फवारावे.

२) करपा : (Blight) बुरशी (Alternaria Burnsii) रोग महाराष्ट्रात अधून - मधून जानेवारीच्या मध्यात हा रोग दिसतो आणि १ ते ५ टक्के नुकसान होते. हवेतून रोगाचा प्रसार होतो. सुरुवातीला पानांचे शेंडे जांभळे दिसतात. नंतर तपकिरी व काळे पडतात. रोगामुळे बी आकसलेले व काळे असते.

उपाय :

१) १ किलो बियांना जर्मिनेटरच्या बीज प्रक्रियेसोबत चार ग्रॅम थायरम चोळावे.

२) थ्राईवर ५०० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + हार्मोनी २५० मिली + + १५० लि. पाणी याची ८ ते १० दिवसांनी २ ते ३ वेळा फवारणी करावी किंवा १% बोर्डो मिश्रण किंवा ०.२५% कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा ०.२५% झायनेब किंवा ०.२ % कॅपटान किंवा ०.१५% डायफोलाटान द्रावणाची पिकावर फवारणी १० दिवसांच्या अंतराने ३ वेळा करावी.

पिकाच्या निरोगी वाढीबरोबरच दर्जा व उत्पादन वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या पुढी लप्रमाणे फवारण्या कराव्यात

१) पहिली फवारणी : ( फुटवे फुटून निरोगी वाढीसाठी उगवणीनंतर १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : ( पिकाच्या वाढीसाठी व फुलकळी लागण्यासाठी उगवाणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( फुलगळ होऊ नये जिऱ्याचे पोषण होऊन उत्पादन वाढीसाठी उगवाणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + राईपनर १ लि. + २५० लि.पाणी.

* काढणी : पेरणीनंतर ७ आठवड्यांनी पीक फुलावर येते. तेव्हा एक आठवड्याचे अंतराने पाण्याची पाळी द्यावी. आणखी ६ आठवड्यांनी बी पक्व होऊन पीक काढणीकरिता तयार होते. त्यावेळी झाडे उपटून खळ्यावर ढिगात गोळा करतात. थोडया दिवसांनी उन्हात पसरून वाळवितात. मोगरीने पेंड्या झोडपून बी वेगळे करतात. बी पाखडून पोत्यात भरतात.

जिरे पिकातील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वरील शेतकऱ्याचा अनुभव राजस्थानमधील नागौर जिल्हातील (ता. खिवसर)थांबडीयासार येथील श्री. घनशाम छगनलाल गौड (मो. ०८२९०३४७३३५) या आय. टी. इंजिनिअर शेतकऱ्याने डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पुर्णतः वालूकामय (वाळवंटात) जमिनीत मोठ्या प्रमाणात भगवा डाळींब लागावड करून ते यशस्वी केल्यानंतर जिऱ्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरले तर जिऱ्याचा दर्जा सुधारून नेहमीपेक्षा दुप्पट उत्पादन मिळविल्याने कळविले.