दुष्काळी परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने एकरी १५ ते १६ क्विंटल बीटी कापसाची आशा

श्री. पंडित सुदामराव यसलोटे, मु.पो. एकलहेरा, ता. अंबड, जि. जालना - ४३१२०९.
मो. ९४२१६४६४१०


कपाशीच्या बोलगार्ड -२ वाणाची आम्ही आमच्या ६ एकर क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने लागवड केली आहे. तिर्थपुरी मार्केटमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे डिलरच बोर्ड, उत्पादने व माहिती पाहून मी श्री. अशोक काटे यांना फोन करून माहिती घेतली व पुढील गुरुवारी आठवडी बाजार दिवशी त्यांना प्रत्यक्ष समर्थ अॅग्रो येथे भेटलो.त्यांनी कपाशी पिकाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्यातूनच मग मला सेंद्रिय शेतीतून निरोगी आरोग्याचा मंत्र मिळाला आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा मी निर्णय घेतला. मी माझ्या कपाशीवर जर्मिनेटर ५०० मिली + कॉटन थ्राईवर ५०० मिली + १५० लि. पाणी याप्रमाणे पहिली फवारणी केली. शेजारच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कपाशीवर ह्युमिक हे औषध वापरले. तर दोन्ही प्लॉटमध्ये खुप फरक जेवणात होता. जर्मिनेटर, कॉटन थ्राईवर वापरलेला कापूस अगदीच सरस दिसत होता. पिकाची वाढ, पानांची रूंदी व हिरवेगारपणा डोळयात भारण्याजोगा होता. मग पुढील फवारणीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आमच्या भागातील विभाग प्रतिनिधी श्री. गणेश कसाब (मो. ७७९८६१०६५०) यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रत्यक्ष प्लॉटवर आले. मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार कॉटन थ्राईवर, प्रिझम, क्रॉपशाईनरची किटकनाशका सोबत फवारणी केली. त्यामुळ पुर्ण जुलै महिना आणि अर्धा ऑगस्ट असा सलग १।। महिना पाऊस नसतानाही माझा कापूस अत्यंत हिरवागार असून प्रत्येक झाडास ५० ते ६० दोडे (बोंडे) तयार आहेत. त्यामुळे मला एकरी १५ ते १६ क्विंटल उताऱ्याची अपेक्षा आहे.