नोकरी सोडून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने १।। एकरातील उत्पन्नातून २।। एकर जमीन खरेदी सातत्याने विविध प्रयोगातून फूल शेती व डेकोरेशन व्यवसायात जबरदस्त यश !

श्री. अरूण तारळे, मु.पो. वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला. मो. ९७६३९३९७८

मी १९८२ साली अकलूज येथे साखर कारखान्यामध्ये नोकरी करीत होतो. तेव्हा कारखान्यातील संचालकांच्या बंगल्यावरील परसबागेत गुलाबाची झाडे निस्तेज होऊन मृतावस्थेत होती. तेव्हा त्या संचालकांनी मला ती झाडे काढून टाकण्यास सांगितले. या काळात माझे पुण्याला येणे - जाणे होत असे. तेव्हा मार्केटयार्ड, पुणे येथे डॉ.बावसकर सरांची भेट घेतली. त्यांचे मार्गदर्शनावर व आधुनिक तंत्रज्ञानावर मी प्रभावीत झालो आणि मग प्रत्येक वेळी पुण्याला आलो की सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जुन भेट घेत होतो.

संचालक साहेबांनी जेव्हा मला ती गुलाबाची मृतावस्थेतील झाडे काढून टाकण्यास सांगितले, तेव्हा मी ती झाडे न काढता पुण्यामध्ये आल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी भेटून ही झाडे जगविण्यासाठी उपाय विचारला असता सरांनी त्यावेळी मला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर ही पंचामृतातील ३ अमृत दिली. मी त्याचा वापर त्या गुलाबाच्या झाडांवर केला तर आश्चर्यकारकरित्या झाडे फुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मग २ - ३ वेळा या तंत्रज्ञानाचा वापर केला तर गुलाब झाडे फुलांनी बहरली. या प्रत्यक्ष अनुभवातून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर मी अधिकच प्रभावीत झालो व विचार केला की ह्या खाजगी नोकरीत काहीच तथ्य नाही. त्यापेक्षा जर गावी जी आपली थोडी शेती आहे त्यामध्ये जर हे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले तर आपली शेती व परिस्थतीही सुधारेल.

त्यानंतर मात्र मागे वळून पहिले नाही. नोकरी सोडली. सरांचे मार्गदर्शन घेतले. सुरुवातीला कापूस शेती करण्यास सुरुवात केली. तेव्हा दुष्काळ असूनही या प्रतिकूल परिस्थितीत अर्ध्या एकरातून ६ क्विंटल 'ए' ग्रेड कापूस उत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने मिळाले. त्यावेळी आपण शेतीत १००% यशस्वी होत आहे त्याची खात्री झाली. त्यानंतर १० -१२ वर्षे कापूस शेती केली. त्यानंतर पुढे शेती कमी असल्याने बांधावर सिताफळाची ६० झाडे लावली. त्यालाही डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत होतो. २००० साली या झाडांचा पहिला बहार घेतला. त्याला सरांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर या ६० झाडाच्या पहिल्याच बहारापासून १०,८०० रु. झाले.

त्यानंतर पुढे घरचे क्षेत्र कमी पडू लागल्याने दुसऱ्याची वाट्याने शेती करू लागलो. त्यामध्ये झेंडू फुलाची लागवड जून - जुलैमध्ये करून त्यापासून नवरात्र, दसरा, दिवाळीत चांगले पैसे होऊ लागले.

घरच्या व वाट्याचे केलेल्या शेतीतून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने आलेल्या उत्पन्नातून पुढे ४ -५ वर्षाच्या काळात टप्प्याटप्प्याने अशी २।। एकर शेती विकत घेतली. यामध्ये कलकत्ता आणि डिव्हाईन गुलाबाची शेती करू लागलो. यामध्येही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने चांगला जम बसला. मग पुढे ग्लॅडीएटर व डिव्हाईनची गुलाबशेती, रंगीबेरंगी अॅस्टर, गलार्डीया, शेवंती, मोगरा अशी फुलशेती करू लागलो. आपल्या फुलांना डेकोरेशन वाल्यांकडून दिवसेंदिवस मागणी वाढू लागल्यावर आमही स्वतः देखील डेकोरेशन व्यवसायात उतरलो. माझा मुलगा प्रविण या फुलशेती सोबत डेकोरेशनमध्ये तरबेज झाला आहे.

१० गुंठे मोगरा ५० हजार

माझ्याकडे १० गुंठे मोगरा आहे. जमीन भारी काली असल्याने ५ x ३ फुटावर १ x १ x १ फुटाचा खड्डा घेऊन बेलिया आणि मोतीया जातीचा मोगरा जो नांदेडमध्ये प्रसिद्ध आहे, त्या दोन्ही वाणांची लागवड केलेली आहे. मोगरा सर्वसाधारण मार्चच्या सुरुवातीस चालू होऊन १५ जूनपर्यंत तोडे चालतात. पावसाळ्यात कळी लाल पडते. त्यामुळे भाव मिळत नाही. उन्हाळ्यात मात्र डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सप्तामृताच्या नियमित आठवड्याला फवारण्या केल्यामुळे सुरुवातीस दररोज १० गुंठयातून १८० ग्रॅमची ५१ पाकिटे निघतात. नंतर फुले कमी होत होत १५ पाकिटांपर्यंत निघतात. ३ बायांमध्ये तोडणी होते. कळी अवस्थेत रोज तोडावा लागतो. भाव ४० रु. ते १०० - १२० रु. किलो मिळतो. उन्हाळ्यात लग्नसराईत तेजीचे भाव मिळतात. १० गुंठयातून वर्षाला ५० हजार रु. उत्पन्न सहज मिळते.

ग्लॅडीएटर व डिव्हाईनची गुलाबशेती

ग्लॅडीएटर गुलाबाची २।। हजार रोपे ५' x ३' वर लावलेली आहेत. तसेच डिव्हाईन गुलाबाचीही २।। हजार रोपे ६' x ३' वर आहेत.

ग्लॅडीएटरचे फुल आकर्षक घट्ट कळीचे असते. त्यामुळे लग्नसराईत २ ते ३ रु. ला एक फुल जाते, तर इतरवेळी १ ते १.२५ रु. भाव सतत मिळतो. फुले वर्षभर चालूच असतात. फक्त लग्नसराई संपल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीस आभाळ आल्यावर झाडांची जमिनीपासून १ फूट उंचीवरून खरड छाटणी करतो. या अवस्थेत अंगठ्याच्या आकाराच्या काड्या छाटल्या जातात. पुढे पाऊस झाला की, लगेच नवीन फुटवे जोमाने फुटतात आणि महिन्याभरानी पुन्हा फुले चालू होतात. याची ७०० ते ८०० फुले तोड्याला निघतात.

डिव्हाईनचे फुल ग्लॅडीएटरपेक्षा कमी आकर्षक असते. त्यामुळे लग्नसराईत एक फूल १ रु. ला तर एरवी ५० ते ६० पैशाला जाते. दोन्ही गुलाबांना ठिबक केले आहे. गुलाब फुले तोडताना दररोज फिरावे लागत असल्याने दोन ओळीमधील जागा कडक होते. त्यामुळे खुरपणी शक्य होत नाही. म्हणजे दोन ओळीमध्ये तण नियंत्रणासाठी तणानाशक फवारतो. दिवाळीत मोकळे पाणी देऊन वाफश्यावर मजुरांकडून चाळणी करतो.

अॅस्टरची रंगीबेरंगी (गुलाबी, जांभळी, पांढरी) फुले आहेत. याची रोपे सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील श्री. दत्ता चौधरी यांच्याकडून ८०० रु./ वाफा ( ५ x ३ फुटाचा) याप्रमाणे घेतली होती. वाफ्यातून १००० ते १२०० रोपे निघतात. अॅस्टर ४५ दिवसात चालू होतो. २ ते २।। महिने फुले चालतात. या फुलांचा सजावटीमध्ये उपयोग होत असल्याने परवडते. गलार्डीया (गलांडे/ जर्मन) अर्धा एकर आहे. बी गावरान घरचेच वापरले. गलार्डीयाची पिवळी फुले ३० ते ४० रु. किलो भावाने अकोल्याला जातात. गलार्डीया ६ महिने चालतो.

शेवंतीच्या काशा शिमग्याला निघतात. उन्हळ्यात वाफ्यात दाबून सांभाळून ठेवतो. त्या जिवंत राहण्यासाठी आठवड्यातून १ - २ वेळा पाणी देतो. जुनमध्ये ३' x २' वर वरंब्यावर एका बाजुला, उत्तर - दक्षिण लावतो. या फुलांना सणासुदीच्या काळात म्हणजे महालक्ष्मी, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळीत भाव चांगला असतो. मात्र आमच्या भागातील जमीन भारी काळी असल्याने या भागातील शेवंती उशीरा म्हणजे दिवाळीत किंवा दिवाळीनंतर चालू होते व १ महिनाच चालते. त्यामुळे सणासुदीचा सिझन सापडला तरच पैसे होतात. अन्यथा वर्षभर शेवंती सांभाळावी लागते. त्यामुळे इतर फुलांच्या मानाने हे पीक परवडत नाही. म्हणून त्याचे क्षेत्र कमी करून त्याच्या फक्त २ - ३ ओळीच ठेवल्या आहेत.

पारनेर (अहमदनगर) भागातील जमीन शेवंतीला पोषक आहे. येथील मुरमाड जमिनीत शेवंती जूनला लावल्यावर २।। महिन्यात फुले चालू होतात आणी ती २ - ३ महिने चालतात. त्यामुळे गणपती, महालक्ष्मी, दसरा, दिवाळी यापैकी २ - ३ सण तर निश्चितच सापडतात आणि त्यांना अधिक भाव मिळतात.

दरवर्षी ४ एकरातून ४ - ५ लाख

अशाप्रकारे घरचे १ ।। एकर आणि विकत घेतलेले २।। एकर असे एकूण ४ एकर जमिनीतून वर्षाला फुलशेतीतून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने ४ ते ५ लाखाचे उत्पन्न हमखास मिळते.

२ किलो हरभरा बियापासून २।। क्विंटल

मागे हरभऱ्याला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले होते. तर २ किलो बियापासून २।। क्विंटल हरभरा उत्पादन मिळाले होते.

आमची आदर्श फुलशेती पाहून भारत कृषक समाजाचा २०१३ चा 'कृषी गौरव पुरस्कार' मला जळगाव प्रदर्शनात मिळाला.

५ - ६ हजाराच्या फुलांपासून डेकोरेशनमधून २५ हजार रु. ची प्राप्ती होते

आमचा फुले डेकोरेशनचा व्यवसाय चांगल्याप्रकारे वाढीस लागला आहे. आम्ही कार्यक्रमाचे हॉल, गाड्या सजवतो. फुलांचे बुके, गुच्छ, हार बनवितो. या व्यवसायातून आम्ही नावलौकीक मिळवून अकोला जिल्ह्यातून आम्हाला सजावटीच्या ऑर्डर येतात. मागे नागपूरच्या कार्यक्रमाची ऑर्डर मिळाली होती.

योगीराज महाराज, शेगाव यांचा ११ व १२ ऑगस्ट २०१३ ला प्रवचनाचा कार्यक्रम झाला. तेव्हा त्याची ऑर्डर मिळाली होती. महाराजांनी त्यावेळी आमचे काम पाहून यापुढे तुम्हीच सजावटीचे काम करायचे असे सांगितले. सजावटीसाठी जरबेऱ्याची फुले पुण्याहून नेतो. आमच्या भागात जरबेऱ्याची पीक फारच कमी प्रमाणात होत असल्याने अकोल्याला १ फुल १० रु. ला डेकोरेशनसाठी घ्यावे लागते. तेच पुणे येथे १५ ते २५ रू. ला १० फले मिळतात. या कार्य क्रमासाठी ५ - ६ हजार रू. ची फुले लागली आणि त्यापासून २५ हजार रू. चे बील मिळाले.

गुलाबावरील लाल कोळीसाठी स्प्लेंडर, तर भुरीसाठी हार्मोनी

आतापर्यंत या फुलशेतीला पुर्वीपासून पंचामृत (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट) च वापरात होतो. तरी यापासून अतिशय दर्जेदार उत्पादन मिळत होते. आता फुट वाढीसाठी आणि अधिक कळ्या निघण्यासाठी प्रिझम व फुलांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी न्युट्राटोन हे पंचामृतासोबत आम्ही नेहमी वापरत असतो. गुलाबावरील भुरीसाठी हार्मोनी वापरतो. त्याने भुरी रोग लगेच आटोक्यात येतो.

गुलाबावर लाल कोळीचा प्रादुर्भाव हमखास होतो. त्यासाठी रासायनिक औषधे बाजरातील वापरावी लागत आणि यावर जादा खर्च होत असे. मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा वर्गणीदार असल्याने नियमित मासिक वाचतो. 'कृषी विज्ञान' मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे लाल कोळीवरील 'स्प्लेंडर' हे औषध शेतकऱ्यांनी वापरून त्यापासून लालकोळीचे नियंत्रण झाल्याच्या मुलाखती वाचण्यात आल्यामुळे आता आम्ही लाल कोळीवर हे वापरत आहे. तेव्हा लाल कोळीवर हे 'स्प्लेंडर'औषध सरांनी उपलब्ध केल्याने आता गुलाबावरील लाल केळीच्या समस्येवरही मात करता येते.

Related New Articles
more...