संत्र्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचा मानस

श्री. दिलीप काशिनाथ वडघुले,
मु. पो. टाकळी भिमा, ता. शिरूर, जि. पुणे,
फोन नं. (०२१३७) २७६१६४


आमचे गावातील श्री. सतीश घोलप यांची संत्र्याची दीड एकर (५५० झाडे) १५ -१६ वर्षाची बाग आहे. जमीन मुरमाड आहे. १०'x १०' वर झाडे लावल्यानंतर ४ थ्या - ५ व्या वर्षापासून चालू झाली. त्यानंतर ५ - ६ वर्ष भरमसाठ उत्पादन मिळाले. नंतर नदीचे पाणी दिले आणि त्या पाण्यामुळे गेले ३ - ४ वर्षे झाले उत्पादन पुर्ण घटले. या बागेला बहार लागण्यासाठी त्यांना घेऊन आलो आहे. या बागेला आंब्याप्रमाणेच फायदा होईल असे सांगितले. संत्र्याला पंचामृत औषधाने जर पुर्ण फरक जाणवला तर आमच्या भागातील बरेच शेतकरी संत्रा, आंब्यासाठी ही औषधे वापरतील. उद्या संत्र्यासाठी पंचामृत १-१ लि. व कल्पतरू खत ५० किलो च्या १० बॅगा घेऊन जाणार आहे.