डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कृषी प्रदर्शनातील संत्र्याला बक्षीस !

श्री. बाळासाहेब सयाजीराव धुमाळ,
मु. पिंपळेधुमाळ, पो. हिवरे कुंभार, ता. शिरूर, जि. पुणे.


आमच्याकडे संत्र्याची २०० झाडे असून बहार धरताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी केल्यामुळे फूट चांगली निघाली. कोणताही रोग आला नाही. शिवाय फळे इतकी चांगली पोसली की संत्र्याच्या लहान पेटीमध्ये ६ नगही एकावेळी बसत नव्हते. शिवाय संत्र्याच्या फळांना गोडी खूप होती. संत्र्यास दर्जा चांगला असल्याने शिरूर येथील शेतकरी मेळाव्यातील प्रदर्शनामध्ये आमच्या संत्र्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते मिळाले. ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी केली नसती तर मला हा पुरस्कार व संधी मिळाली नसती असे मला वाटते. कारण यापूर्वी इतर कोणत्याही औषधाने असे रिझल्ट मिळाले नाहीत.