लिंबूवर्गीय फळबागांतील त्रुटी, समस्या व उपाय

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारता देश हा उष्ण कटीबंधामध्ये येत असल्यामुळे येथील जवळजवळ ७५% राज्यांमध्ये वर्षातील ९ महिने कायम ३० ते ३६ -४२ ते ४६ डी. से. तापमान असते. त्यामुळे भारतीय माणसांमध्ये घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते व कामाचा थकवा येतो. ही ऊर्जा परत मिळविण्यासाठी नुसती कर्बोदके, प्रथिने व फॅटची गरज पुरेशी नसून त्याचबरोबर व्हिटॅमीन - सी ची भारतीय माणसास नितांत गरज आहे.

भारतामध्ये लिंबूवर्गीय फळांचे क्षेत्र ७८९.१० हजार हेक्टर असून त्यापैकी लिंबाखालील २८६.३० हजार हेक्टर मोसंबीखालील २८८ हजार हेक्टर व संत्राखालील २१४.८० हाजार हेक्टर इतकी आहे. देशातील लिंबूवर्गीय पिकाच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर (१६१.३ हजार हे.) असून उत्पादनाच्या बाबतीत आंध्रप्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. तर कर्नाटक राज्यात लागवड सर्वात कमी (११.७ हजार हे.) असून उत्पादकतेमध्ये मात्र प्रथम क्रमांक (२१.४ टन/हे.) लागतो.

लिंबू हे साधारण हलक्या जमिनीपासून भारी जमिनीत येते, मात्र संत्री हे मध्यम, भारी जमिनीत मुक्त चुन्याचे (CaCo३)चे प्रमाण ३ ते ५% असेल तर संत्र्याचे उत्पादन चांगले येते. मोसंबीला देखील लिंबाप्रमाणे मध्यम काळी जमीन चांगली ठरते. ३० वर्षापुर्वी आजारी लोकांनीच फक्त मोसंबी खावी अशी प्रथा होती. पण आता उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने सामान्य माणूसदेखील मोसंबी हे आपल्या फल आहारात समाविष्ट करू लागला आहे.

लिंबामधील समस्या व उपाय

लिंबामध्ये सिट्रस कँकर फार मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे हजारो एकर क्षेत्र बाधीत आहे. डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या संशोधन केंद्रावर केलेल्या संशोधनातून व प्रयोगातून कँकरमुक्त 'मल्हार' नावाची जात आम्ही विकसित केलेली आहे आणि या जातीवर एका फर्ग्युसन विद्यालयातील मुलीने डॉ. बावसकर सरांच्या मार्गदर्शनाखाली जीवनसत्व 'क' चे मल्हार लिंबातील प्रमाण या बिषयावर प्रबंध लिहून एम. एस्सी.बायोकेमिस्ट्री या (जीवरसायन शास्त्र) पुणे युनिव्हर्सिटीची पदवी मिळविली आहे.

दुसरी महत्त्वाची विकृती म्हणजे सुक्ष्म मुलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पानांवर स्पॉट येणे. हस्तबहार निट येत नाही. ही समस्या देशभर जाणवते, कारण जेव्हा हस्तबहार घेतला जातो तेव्हा सप्टेंबर - ऑक्टोबर महिना असतो. या काळात हस्त नक्षत्राचा पाऊस हा प्रचंड कोसळतो. त्यामुळे लागणारे फुल हे गळून जाते. म्हणून हस्त नक्षत्राच्या बहाराची समस्या कायम जाणवते. यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हमखास उपाय शोधला आहे. तो असा की टेक्नॉंलॉजीचा वापर करून हस्त नक्षत्राच्या अगोदर पाणी सोडून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बहार फोडून फुलगळ न होता फुलाचा देठ पक्व होऊन गुंडी धरते. त्यामुळे फळधारणा अधिक होते. (संदर्भ - श्री. बाळकृष्ण निवृत्ती कदम, मु. पो. बेलवंडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर मोबा. ९०९६९०८१९० यांची मुलाखत पहावी.)

लिंबामधील पुढील संशोधनाची दिशा

जिल्हावार जमिनीच्या प्रकारानुसार व हवामानानुसार आणि देशातील सर्व राज्यांच्या गरजा लक्षात घेऊन उत्कृष्ट वाण निर्माण करून त्याची रोपवाटिका जिल्हावार निर्माण करणे व लिंबू लागवडीचा प्रसार करणे हे फार गरजेचे आहे. कारण २ तृतीयांश (६६.६६%) आरोग्य हे नुसत्या लिंबाने सुधारते.

मोसंबीवरील समस्या व त्यावरील उपाय


लिंबाप्रमाणे मोसंबी हे एक फाटक प्रकारचे लिंबूवर्गीय फळझाड आहे. याची पाने गर्द हिरवी, जाड आणि अंडाकृती, मध्ये फुगीर व टोकाला निमुळती, अधिक हरीतद्रव्ययुक्त असून पानांवर मेनचट थर (क्रिटीकल लेअर) असतो. त्यामुळे हे फळझाड कमी पाण्यावर येणारे काटक फळझाड आहे. म्हणून देशातील अनेक भागांमध्ये या फळझाडाची लागवड बघायला मिळते. तरीपण ती मर्यादीतच स्वरूपात आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, अहमनगर, पुणे, जालना, अंबड, बदनापूर या भागात मोसंबीची लागवड मोठ्याप्रमाणात आहे. घरटी एक एकरापासून ५ ते १० एकरवर मोसंबीची लागवड आहे. परंतु गेल्या २ वर्षाच्या भिषण दुष्काळी परिस्थितीने व राजकिय शक्ती कोरडी पडल्याने धरणे कोरडी राहिली. त्यामुळे या भागातील ७०% बागा मानवनिर्मित दुष्काळाने जळून खाक झाल्या. त्यामुळे या भागातील उत्पन्नाचे स्रोत हरवून येथील माणूस हवालदिल झाला. यापरिस्थितीला 'कोल्हापूर पद्धतीचे बंधारे' बांधून अथवा खानापूरकरांचा 'शिरपूर पॅटर्न' राबवून हे उजाड झालेले क्षेत्र परत मोसंबीच्या लागवडीमुळे हरीत पट्ट्यांमध्ये बहरू लागेल. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, फक्त शेततळे किंवा मोठ्या धरणांचा अट्टाहस न धरता देशाची संपत्ती अबाधीत राहील असे पाहणे गरजेचे आहे.

मोसंबी पिकातील समस्या

मोसंबी पिकातील महत्त्वाचे रोग म्हणजे 'डिंक्या' रोग होय, म्हणजे येथे जुन्या बागांच्या जाड खोडाच्यामध्ये भेगा पडून डिंकासारखा चिकट पांढरट, पिवळसर, तपकिरी द्रव पदार्थ बाहेर येतो व झाड वरून सुकत येवून कालांतराने झपाट्याने सुकते. यावर अनेक शास्त्रज्ञांच्या मते कॉपर आणि लोह या घटकांमुळे हे घडते. यावर साऱ्या देशभर संशोधन चालू आहे. यावर योग्य संशोधन होऊन उत्कृष्ट शिफारस आपणांस मिळेल ही आशा आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मोसंबीचे दर्जेदार उत्पादन आणून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मोठा दिलासा दिला आहे. ज्या - ज्या बागायतदारांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले त्यांच्या बागा ह्या नुसत्या जगवल्या नाही तर त्यापासून ते दर्जेदार व विक्रमी उत्पादन घेत आहेत. त्यांना इतरांपेक्षा अधिक भाव मिळत आहे. त्यांच्या मुलाखती आम्ही वेळोवेळी कृषी विज्ञानमधून प्रसिद्ध करीत आहोतच. मिसंबीमधील फळमाशी ही महाराष्ट्रातील अनेक भागात जटील समस्या आहे. साऱ्या देशभर आणि जगभर सेंद्रिय शेतीची लाट असून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने प्रोटेक्टंट, स्प्लेंडर आणि हार्मोनी याचा विविध बुरशीजन्य रोग व किडींवर हमखास उपाय होतो, असे अनेक शेतकऱ्यांनी कळविले आहे. तेव्हा मोसंबी पिकावर याचे अधिक प्रयोग होणे आवश्यक आहे. तेव्हा या विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तंत्रज्ञांशी संपर्क साधून उपाय योजना करावी. म्हणजे शंकांचे योग्य प्रकारे वेळेवर हमखास निरसन करण्यात येईल.

संत्री हे पीक त्यातील रोग व किडीच्या समस्या

संत्रा हे पीक विदर्भाचे नाक असून नागपूर संत्रा हा विदर्भाचा 'कल्पवृक्ष' आहे. परंतु राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळे विदर्भातील ७७ हजार हेक्टर इतके क्षेत्र असून त्यामध्ये नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ व अकोला येथील अनुक्रमे क्षेत्र २७,०३१ हेक्टर, ३८,१४६ हेक्टर, ४,९३६ हेक्टर, ५,०१५ हेक्टर,१,०६४ हेक्टर इतके आहे. येथे जमिनीच्या समस्या आहेत. पाण्याच्या (अतिवृष्टी व अनावृष्टी) समस्या आहेत. तर दुय्यम आणि सुक्ष्म मुलद्रव्यांच्या समस्यादेखील विदर्भात प्रचंड आहेत. विशेषकरून मृगबहार व आंबेबहार यातील गुंडीगळ व अनियमितता या समस्या प्रामुख्याने भेडसावतात. यावरील कोळशी रोग व संत्र्यावरील विकृती ही समस्या संत्री पिकावर फार मोठी समस्या आहे. डायबॅकमुळे शेंडा वरून सुकून कालांतराने झाड जळून जाणे ही समस्या अधिक जाणवते, संत्र्यावरील कोळशी रोग हा विदर्भातील संत्र्यावरील 'कॅन्सर' म्हटले तर वावगे ठरणार नाही. या विविध रोगावर व विकृतीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनीधी मोठ्या प्रमाणावर प्रयोग करीत आहेत आणि त्यामध्ये चांगल्याप्रकारे निरीक्षणे टिपून होकारार्थी, आशादायक निष्कर्ष येत्या दोन वर्षात चांगल्याप्रकारे हाती येण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे मल्हार लिंबाची टिकावू क्षमता निर्माण केली त्याचप्रमाणे संत्र्याच्या टिकावूपणाच्या समस्येवर आम्ही मात केली तर हा फार मोठा ब्रेक - थ्रू मिळणार आहे. या समस्यांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू हा एक उपाय ठरू शकेल हा आशावाद आहे. शेतकरी बांधवांनी, तंत्रज्ञानी, शास्त्रज्ञांनी, विकास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात विविध प्रयोग करून त्यांचे अनुभव सखोल अभ्यासासाठी आमच्याकडे पाठवावेत.

सदर पुस्तकामध्ये या अनेक गोष्टींचा उहापोह करून शेतकऱ्यांना विविध पिकावर मार्गदर्शन करून त्यांनी दर्जेदार उत्पादन मिळवून जागतिक निर्यात मार्केट काबीज करावेच, परंतु याही पेक्षा प्रक्रिया उद्योगाने आणि फळांच्या टिकाऊ व उपयुक्त घटकांपासून १ रू. चे १०० रू. मध्ये मुल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या मुलांनी स्वत:ची इंडस्ट्रिज उभारावी अशा प्रकारचे आवाहन आम्ही एका कार्यक्रमामध्ये मंत्री महोदयांना केले होते. म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा जो मंत्री झाला त्याचे जीवन सार्थकी लागेल, असा आशावाद आम्ही एका भाषणात व्यक्त केला होता. शेतकऱ्यांच्या मुलांनी फक्त शास्त्रज्ञ म्हणून नोकरी न करता अभ्यास करून स्वत:च्या ज्ञानाच्या बळावर इच्छाशक्तीने मात करून स्वत:चे ग्रंथालय थाटून जिद्दीने उभे राहून स्वत:चा प्रक्रिया व औषधी उद्योग उभारावा. म्हणजे लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन व कारखानदारी ही समृद्धीची पहाट अलिबाबाच्या गुहेसारखी न भासता तशी साक्षात अनुभवता येईलच!