'कृषी विज्ञान' माझी प्रेरणा, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने डाळींब

श्री. अमर विठ्ठल वीर, मु.पो.ता. भूम (वीरगल्ली), जि . उस्मानाबाद -४१३५०४, मोबा. ९९२१६३४९५४

आमच्या रविंद्रनाथ टागोर नगरपालिका सार्व, वाचनालयात 'कृषी विज्ञान' मासिक मी गेली ७ - ८ वर्षापासून वाचत आहे. दर महिन्याला मासिक येण्याची वाट पाहत असतो. 'कृषी विज्ञान' मासिका अतिशय प्रेरणादायक ठरत आहे.

आज पंचवार्षिक वर्गणी स्वत:च्या नावाने भरून अंक चालू केला आहे. तसेच डाळींब, शेवगा, आलेहळद, केळी, पपई, कापूस आणि कृषी मार्गदर्शिका घेतली आहे. आमच्याकडे पंढरपुरी म्हशी २० आहेत. १४ -१५ लि. दूध देतात. डोंगर उताराची मध्यम प्रतिची एकूण २० एकर शेती आहे. त्यातील ५ एकराला गाळ भरला आहे. त्यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भगवा डाळींब लावणार आहे. मी. बी. ए. पर्यंत शिक्षण अंबेजोगाई येथून पुर्ण केले. आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आधुनिक शेती करणार आहे.

Related New Articles
more...