गुलाबाची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


सध्या फुलशेती महत्त्वाची व किफायतशीर ठरत आहे. यामध्ये गुलाबशेती हा महत्त्वाचा उद्योग होऊ शकतो. जगात गुलाबाची मोघ्या प्रमाणात लागवड होते. भारतात दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चंदीगड, लखनौ व बेंगलोर या शहरांभोवती गुलाबशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. महारष्ट्रात नाशिक, पुणे, सांगली आणि शिर्डी तेथे गुलाबाची लागवड केली जाते.

Gulabसर्व फुलांमध्ये गुलाबास वरचे स्थान आहे. गुलाबास 'फुलांचा राजा' म्हटले जाते. उत्तरे, सुगंधी तेल (ओटो), गुलकंद यासारखी मौल्यवान उत्पादने गुलाबापासून मिळतात. गुलकंद आरोग्यवर्धक असून उत्तम टॉंनिक आहे. रोझ दमास्काना या जातीपासून उत्तर व गुलाबपाणी काढले जाते. गुलाबाची फुले केशशृंगार, पुष्प सजावट, फुलदाणी सजावट, हार, गुच्छ बनविण्यासाठी वापरली जातात. आजारी माणसाला लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा देताना गुलाबाची फुले दिली जातात. बग्गेरियाना या जातीच्या फुलबोंडापासून 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळते. याशिवाय भावना व्यक्त करण्यासाठी या फुलाचा वापर केला जातो. तांबड्या रंगाचा गुलाब प्रेमाचे व पिवळ्या रंगाचा गुलाब मैत्रीचे प्रतिक मानला जातो.

जमीन : गुलाब बहुवर्षायू फुलझाड असल्याने जमीन काळजीपूर्वक निवडावी. उत्तम निचऱ्याची, भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त व आम्ल - विम्ल निर्देशांक (सामू) ६ ते ७.५ च्या दरम्यान असणारी जमीन लागवडीयोग्य असते. जमिनीची खोली एक मीटर असावी. कठीण खडकाच्या, चुनखडी व क्षारयुक्त जमिनी या फुलझाडास मानवत नाहीत. त्यामुळे अशा जमिनीत लागवड टाळावी.

हवामान : गुलाबास थंड व कोरडे हवामान मानवते. १५ टे २० अंश सेल्सिअस तापमानात गुलाबाची वाढ चांगली होऊन उत्पादन भरपूर मिळते. स्वच्छ हवा, भरपूर सुर्यप्रकाश आणि मध्यम तापमान वाढीस योग्य असते. समुद्रसपाटीपासून ४००० मीटर उंचीपर्यंत गुलाबाची लागवड होऊ शकते. हवेतील सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५% असावी.

जाती : गुलाबात अनेक प्रकार आहेत. विविध रंगांच्या व आकारांच्या जाती आहेत. काही जातीच्या फुलांना सुगंध असतो. तर काही जातीच्या पाकळ्या बारीक असतात. गुलाबाच्या फुलांची संख्या व वाढ यामध्ये जातींमध्ये फरक आढळतो. या वैशिष्ट्यावरून गुलाबाचे सहा प्रकार पडतात.

१) हायब्रीड टी, २) फ्लोरीबंडा, ३) पॉलीएंथा, ४) मिनीएचर, (छोटे गुलाब). ५) वेली गुलाब, ६) रानटी गुलाब, यापैकी हायब्रीड टी व फ्लोरीबंडा या जातीची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते.

१) हायब्रीड टी : टी गुलाब आणि परपेच्युअल गुलाब यांच्या संकरातून ही जात तयार केली आहे. फुले आकाराने मोठी, एका रंगाची, दोन रंगाची अथवा विविध रंगी आकर्षक असतात. गुलाबाचा आकार सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये अनेक जाती आहेत.

अ) लाल रंगाच्या जाती : पपा मिलांड, ग्लॅडिएटर मिस्टर लिंकन, खिश्चन डिऑर, सोफिया लॉरन्स, हॅपीनेस, क्रिमसन ग्लोरी, ओक्मा होमा.

ब) गुलाबी रंगाच्या जाती : क्वीन एलिझाबेथ, सुपर स्टार, फ्रेंडशिप, सोनिया मिलांद, मारीया क्लास, फस्र्ट प्राईझ, सिंदूर, पिटर फ्रँकेन फेल्ड,

क) पिवळ्या रंगाच्या जाती : लांडोरा, समर सनशाईन, सनकिंग, किंग्ज रॅमसन, गंगा गोल्डन जाएंट, पूर्णिमा, गोल्डन स्पेंडॉंर, ग्रॅन्ड मेरी जेनी.

ड) पांढऱ्या रंगाच्या जाती : ऑनर व्हर्गो, पास्कली डॉ. होमी भाभा, जॉन ऑफ केनेडी, मेसेज, मेमोरियम, चंद्रमा.

इ) निळ्या रंगाच्या जाती : ब्ल्यू मून, लेडी एक्स, पॅराडाइस, स्टर्लिंग सिल्व्हर.

ई) बहुरंगी जाती : डबल डिलाईट, पीस, अॅनव्हील स्पार्स्क, अमेरिकन हेरीटेज, सी पर्ल, किस ऑफ फायर, गार्डन पार्टी.

फ) सुगंधी जाती : नूरजहान, दमास्क, क्रिमसन ग्लोरी, एडवर्ड

२) फ्लोरीबंडा : फ्लोरीबंडा ही जात हायब्रीड टी व पॉलिएंथा यांच्या संकरातून निर्माण केली आहे. फुले घोसात व मोठ्या संख्येने येतात. फुलांचा आकार चांगला असून हंगाम मोठा असतो. काही महत्त्वाच्या फ्लोरीबंडा जाती, त्यांच्या फुलाचा रंग खाली दिला आहे.

अ) ऑल गोल्ड: फुलांना पिवळा रंग असून मंद सुवास असतो.

ब) अँगल फेस : गुलाबी फुले असतात. फुलांना भरपूर सुवास असतो.

क आरथर बेल : फुले पिवळी व सुवासिक असतात.

ड) एलिझाबेथ ऑफ ग्लॅमिस : सालमन रंगाची सुवासिक फुले असतात.

इ) फ्रेंच लेस : पांढरी मंद सुवासिक फुले असतात.

ई) गोल्डन टाईम्स : या जातीची फुले पिवळ्या रंगाची असतात.

उ) लिटल डार्लिंग : पिवळसर गुलाबी फुलांना भरपूर सुवास असतो.

ऊ) मरसेडिस : शेंदरी रंगाची व मंद सुवास असणारी फुले येतात.

ए) सिंप्लीसिटी : गुलाबी रंगाची फुले असतात.

ऐ) आईस बर्ग : पांढऱ्या रंगाची फुले खूपच सुवासिक असतात.

काही महत्त्वाच्या भारतीय जाती व फुलांचा रंग :

१) अभिसारिका - नारंगी,

२) आकाश सुंदरी - गुलाबी,

३) अनुपमा - लाल,

४) अनुरंग - रोझी,

५) अप्सरा - गुलाबी,

६) अर्जुन - रोझी,

७) भीम - गर्द लाल,

८) गंगा - सोनेरी,

९) हसीना - गुलाबी,

१०) जवाहार - पांढरा (मंद सुवास),

११) राजकुमार - गुलाबी,

१२) सुगंधा - लाल (गोड सुवास)

* अभिवृद्धी : गुलाबाची अभिवृद्धी बिया लावून, छाट कलम, गुटी कलम व डोळे भरून केली जाते. व्यापारी तत्त्वावर लागवड करताना अभिवृद्धी टी (T) पध्दतीने डोळे भरून करावी. गुलाबाच्या अभिवृद्धीसाठी प्रथम खुंट रोप (Root Stock) तयार करून त्यावर डोळा भरावा.

अ) खुंटरोपाची निवड (Selection of Root Stock) : गुलाबासाठी प्रामुख्याने चार खुंट रोपे वापरली जातात.

१) रोझा इंडिका,

२) रोझा मल्टिफ्लोरा,

३) रोझा स्पेसीज,

४) थॉर्नलेस (काटे नसणारे) वरीलपैकी पहिल्या दोन खुंटरोपाचा वापर सर्रास केला जातो. ७.५ पेक्षा जात सामू (विम्लधर्मी) असणाऱ्या जमिनीसाठी 'रोझा इंडिका' हे खुंटरोप वापरावे. ७.५ पेक्षा कमी सामू (आम्लधर्मी) असल्यास त्या जमिनीत 'रोझा मल्टिफ्लोरा' या खुंट रोपावर डोळे भरावेत. प्रथम फांदीकलमाद्वारे खुंट रोप वाढवावे व त्यावर टी (T) पद्धतीने चांगल्या जातीचा डोळा भरावा.

ब) डोळा भरणे : पावसाळी हंगामात खुंट रोपाची, पॉलिथिनच्या पिशवीत लागवड करावी. खुंटरोपाची चांगली वाढ होऊ द्यावी. ज्या जातीचा डोळा भरावयाचा आहे. त्या काडीवरील टी (T) आकाराचा डोळा काळजीपूर्वक काढावा, असा डोळा १० मिली जर्मिनेटर + ५ ग्रॅम प्रोटेक्टंट + १ लि. पाणी या द्रावणामध्ये ५ ते १० मिनिटे भिजवून, खुंटरोपावर याच टी (T) आकाराची खाची पाडून त्यात भरावा. प्लॅस्टिक पट्टीच्या सहाय्याने हा डोळा खुंट रोपाशी घट्ट बांधतात. एक महिल्यानंतर डोळा व फांदी कलम एक होऊन फूट होऊ लागते. मात्र याच दरम्यान खुंट रोपावर येणारी कोवळी फूट वरचे वर काढावी. चांगली वाढ झाल्यानंतर रोप शेतात किंवा बागेत कायमच्या जागी लावावे.

क) पॉलिबॅग मेथड : ही गुलाबावर डोळे भरण्याची अतिजलद पद्धत आहे. कमी वेळात रोपे तयार होतात. यासाठी ६ ते १० सेंमी. रुंद व १५ ते २० सेंमी. उंचीची पॉलिथिन पिशवी १ भाग सुपीक माती, १ भाग शेणखत, १ भाग भाताचे पिंजर व बी. एच. सी. पावडरचे मिश्रण भरावे. मिश्रण भरताना पिशवी फुटू नये म्हणून १०० ते २०० गेज पॉलिथीन पिशवी वापरावी. मातीचे मिश्रण चाळून घेऊन दाबून पिशवीत भरावे.

ज्या जातीचे खुंटरोप निवडले आहे त्याची पेन्सिल आकाराची १५ सेंमी लांबीची खोडकाडी घेऊन पिशवीत लावावी. पाच ते सहा आठवड्यात काही मुले धरते. भरपूर मुळे फुटल्यानंतर काडी डोळे भरण्यास योग्य समजली जाते. योग्य जातीचा डोळा घेऊन तो खुंटरोपावर 'इंग्रजी टी (T) पद्धतीने भरावा.

पूर्व मशागत : लागवडीपूर्वी उभी - आडवी खोल नांगरणी करावी. त्यानंतर ढेकळे फोडून कुळवणी करावी. जमीन तणविरहित करून योग्य अंतरावर खड्डे घ्यावेत. गुलाबाची लागवड चर काढून अथवा खडडे घेऊन करता येते. खड्डे अथवा चराचा आकार जमिनीचा प्रकार व गुलाबाच्या जातीवर अवलंबून असतो.

१) खड्डयाचा आकार : उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे

१) ५० x ५० x ५० सेंमी. (लांबी, रुंदी, खोली)

७५ x ७५ x ७५ सेंमी. (लांबी, रुंदी, खोली)

५० x ५० x ५० सेंमी. (लांबी, रुंदी, खोली)

२) चराचा आकार :

४५ x ४५ सेंमी. (रुंदी, खोली)

४५ x ५० सेंमी. (रुंदी, खोली)

६० x ६० सेंमी. (रुंदी, खोली)

६० x ४५ सेंमी. (रुंदी, खोली)

* लागवडीतील अंतर : गुलाबाची लागवड विविध अंतरावर करता येते. परंतु जमिनीचा प्रकार, जातीची निवड व मशागतीची पद्धत यानुसार पुढील अंतरावर लागवड करता येते. खड्ड्यात १ मी. x १ मी. व १.५ मी. x १.० मी. वर लागवड करावी. तर चरामध्ये १.५ मी. x ६.६ मी. अंतरावर लागवड करावी.

खड्डे भरणे : चर अथवा खड्डे मातीचे चांगले मिश्रण तयार करून भरावेत. योग्य प्रतीचे गार्डन मिक्चर (Garden Mixture) तयार केल्यास झाडांची वाढ चांगली होते. गार्डन मिक्श्चरसाठी खड्डयातून निघालेली माती, शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा. खड्डे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यावेत.

लागवडीची वेळ : गुलाबाची लागवड वर्षभर करता येते, परंतु लागवड करताना काही गोष्टी विचारात घ्याव्यात. कमी पर्जन्यमानाच्या भागात जून - जुलै महिन्यात लागवड करावी. जास्त पाऊस पडून पाणी साचत असल्यास ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान लागवड करणे फायदेशीर ठरते. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास जून, ओक्टोबर व जानेवारी महिन्यातील कालावधी लागवडीस अधिक योग्य आहे.

* लागवड : गुलाबाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. पहिल्या पद्धतींत निवडलेल्या अंतरावर कलमांची रोपे लावून लागवड केली जाते. दुसऱ्या पद्धतीत अगोदर लागवडीच्या जागी खुंट लावून त्यावर योग्य जातीचा डोळा भरतात.

आंतरमशागत : गुलाब बहुवर्षायू असल्याने ६ ते १० वर्षे शेतात राहतो. त्यामुळे आंतरमशागतीकडे लक्ष द्यावे. आंतरमशागत वेळेवर केल्याने गुणवत्ता व उत्पन्नात भर पडते. खुरपणी, भरणी, खुंटरोपावरील फुटवे काढणे इत्यादी गोष्टींचा यात समावेश होतो. लागवडीपासूनच शेत खुरपूण स्वच्छ ठेवावे. हरळी अथवा नटग्राससारखी तणे एकदा वाढली तर नियंत्रण करणे अवघड जाते. गोखारूसारख्या तणांचा नायनाट करण्यासाठी २ ते ३ वेळा पंधरा दिवसांच्या अंतराने खुरपण्या कराव्यात.

पाणीपुरवठा : गुलाबास नियमित पाण्याची गरज असते. जमिनीचा प्रकार, हंगाम व वाढीच्या अवस्थेवर पाण्याची गरज अवलंबून असते. भारी जमिनीत जास्त अंतराने तर हलक्या जमिनीत कमी अंतराने पाणी द्यावे. झाडे फुलाधारणेच्या अवस्थेत असताना पाणी कमी पडू नये, याची काळजी घ्यावी. हंगामाचा विचार केल्यास पावसाळी हंगामात १५ - २० दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीला पीक चांगला प्रतिसाद देते. या पद्धतीने पाण्याची बचत होऊन जास्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळतात. पाण्याचे नमुने तपासून पाणी देणे योग्य असते. पाण्यात क्लोराइडसारखे हानिकारक क्षार असणार नाहीत याची काळजी घ्यावी.

उत्पादन व गुणवत्ता वाढ : गुलाब फुलाझाडास पाणी, खते व्यवस्थापन व इतर नियोजन अनुकूल असूनही गुणवत्ता व उत्पन्नात भर पडत नाही. अशा वेळी गुणवत्ता वाढीच्या पुढील पद्धती अवलंबाव्या लागतात.

१) डी - सकरिंग (De - Sukering) : डोळा भरल्यानंतर खुंट रोपावर येणारे फुटवे काढण्याच्या क्रियेस 'डी - संकरिंग' म्हणतात. कोवळी फूट वेळेतच काढावी. अन्यथा ती डोळे भरलेल्या फांदीच्या वाढीवर परिणाम करते. डोळा भरल्यानंतर वर्षभर डी - सकरिंग केले जाते. कोवळे फुटवे झाडातील अन्न मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे ते योग्य वेळी काढून टाकणे महत्त्वाचे ठरते.

२) पिंचिंग (Pinching) : वाढीच्या काळात टोकाकडील फांदीचा जोमाने वाढणारा थोडा भाग कापण्याच्या क्रियेस 'पिंचिंग' असे म्हणतात. झाडास योग्य व एकसारखा आकार आणण्यासाठी पिंचिंग करतात. लागवडीनंतर काही फांद्या जोमाने व उरलेल्या हळुवार वाढतात. जोमाने वाढणाऱ्या फांद्या टोकाकडे थोड्या प्रमाणात कापल्यास त्यांची वाढ थांबते. आपोआप इतर फांद्यांच्या वाढीला संधी मिळते. यामुळे सर्व फांद्यासारख्या वाढून झाडाला आकर येतो. पिंचिंगमुळे झाडावरील फांद्या वाढण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे फुलांची संख्या वाढते.

३) डिस - बडिंग (Dis Budding) : गुलाबावरील लहान फुले व कळ्या काढण्याच्या क्रियेला 'डिस -बडिंग' म्हणतात. झाडावर भरपूर फुले आल्यास झाड त्यांना पोसू शकत नाही. त्यामुळे त्यांचा आकर लहान राहतो. याउलट मर्यादित फुले झाडावर ठेवल्यास फुलांचा दर्जा चांगला राहतो. म्हणून डिस - बडिंग फायदेशीर ठरते, परंतु आवश्यकता असेल तेव्हाच डिस - बडिंग करावे.

४) मल्चिंग (Mulching) : प्लॅस्टिक कागद अथवा पालापाचोळ्याने दोन रोपांमधील जमीन झाकण्याच्या क्रियेस 'मल्चिंग' (आच्छादन) म्हणतात. जमिनीत ओलावा टिकवून तणांची वाढ रोखण्याच्या उद्देशाने आच्छादन करतात. आच्छादनासाठी वाळलेले गवत. पालापाचोळा व काळ्या पॉलिथिन कागदाचा वापर करावा. आच्छादन करण्यासाठी ३०० गेजची काळी पॉलिथिन शीट योग्य असते, आच्छादनाचा हंगामानुसार चांगला उपयोग होतो. पावसाळ्यात तणांची वाढ रोखली जाऊन उन्हाळ्यात मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

५) पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे : उत्पादन दर्जेदार आणी सतत, भरघोस येण्यासाठी खालीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात त्याने कीड रोगास आळा बसतो. फवारणी

१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ राईपनर १०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + न्युट्राटोन १०० मिली + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २१ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. राईपनर १५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३५० मिली + स्प्लेंडर ३५० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४५० ते ५०० मिली + स्प्लेंडर ४५० मिली + २५० लि. पाणी.

५) तोडे चालू झाल्यानंतर हवामानातील बदलानुसार : (१० ते १५ दिवसाच्या अंतराने ) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४५० ते ७५० मिली + हार्मोनी ४५० ते ५०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + २५० लि. पाणी.

बहार संपल्यानंतर छाटणी केल्यावर नवीन फुटीसाठी : (छाटणीनंतर ८ ते १० दिवसांत)

जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रिझम ५०० मिली.+ १०० लि.पाणी.

त्याचबरोबर जर्मिनेटर एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून मुळावाटे द्यावे.

* छाटणी (Pruning) : फुलांची संख्या वाढविण्यासाठी फांदीचा काही भाग काढण्याच्या क्रियेला 'छाटणी' म्हणतात. गुलाबाला नवीन वाढीवर फुले येतात. जुन्या फांद्यावर फुले येत नाहीत. नवीन फांद्यांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होते. फांद्यांची गर्दी वाढल्यास झाडाचा आकार बिघडतो. छाटणीत जोमदार वाढीच्या निरोगी फांद्या ठेवून बारीक, कमजोर रोग व कीडग्रस्त, वाळलेल्या, अयोग्य दिशेत वाढणाऱ्या फांद्या काढाव्यात.

छाटणीचे उद्देश : १) जुनाट भाग व निर्जीव फांद्या काढणे.

२) फुलांची संख्या वाढविणे.

३) रोग व कीडग्रस्त फांद्या काढणे.

४) फवारणी, फुलांची तोडणी व इतर आंतरमशागती सोप्या करणे.

५) कोवळ्या, गर्दी करणाऱ्या व वांझ फांद्या काढणे.

६) योग्य वेळी झाड बहारात आणणे.

झाडाच्या वाढीच्या सुरुवातीला चांगला आकर आणण्याकडे लक्ष द्यावे. निवडक फांद्या ठेवून बाकीचा भाग काढावा. झाड फुलावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित छाटणी करावी. छाटणीची तीव्रता लक्षात घेतल्यास, गुलाबाच्या छाटणीचे प्रकार पडतात.

१) सौम्य छाटणी (Soft Pruning) : फुलांचा बहार व पावसाला संपल्यानंतर छाटणी केली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस छाटणी केली जात असल्याने 'हिवाळी छाटणी' असेही म्हणतात. पावसाळी बहार झाल्यानंतर दुसरा बहार येण्यासाठी ही छाटणी केली जाते. बहार नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन फेब्रुवारी - मार्चपर्यंत चालतो. सौम्य छाटणीत फांदीचे शेंडे छाटले जातात. यामुळे झाडास फुले भरपूर लागतात, परंतु ती आकाराने लहान असतात.

२) मध्यम छाटणी (Medium Pruning) : या छाटणीत फांद्याची खरडून अथवा फार उंचीवर छाटणी करत नाहीत. मध्यम उंचीवर म्हणजेच फांदीवर ७ ते ८ डोळे ठेवून छाटणी करतात. छाटणीनंतर ४० ते ५० दिवसांत नवीन फुटीवर फुले येतात. फुले भरपूर व मध्यम ते मोठ्या आकाराची असतात. मध्यम छाटणी झाडाची उंची मध्यम राहून डौलदार वाढतात.

३) कडक छाटणी (Heavy Pruning) : कडक छाटणी उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे मे महिन्याच्या शेवटी करावी. फांदीच्या खोडाकडील भागावर ३ ते ४ डोळे राखून छाटणी करावी. कडक छाटणीस 'उन्हाळी छाटणी' असेही म्हणतात. छाटणी उन्हाळ्यात लवकर करू नये. तसे केल्यास कोवळ्या कोंबांना इजा पोहोचते. छाटणी खोलवर केल्याने फुले संख्येने कमी असतात. परंतु आकाराने मोठी असतात.

* छाटणीनंतर घ्यावयाची काळजी :

१) छाटणी योग्य वेळी करावी.

२) रोग - कीडग्रस्त व गर्दीच्या फांद्या काढाव्यात.

३) छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.

४) धारदार सिकेटरने एकाच कापात छाटणी करावी.

५) छाटणीनंतर मशागत करून खत घालावे.

फुलांची तोडणी, प्रतवारी व उत्पन्न : गुलाबाची लागवड केल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांनी फुले लागण्यास सुरुवात होते. सुरुवातीला फुलांची संख्या कमी असते, परंतु एक वर्षानंतर नियमित व भरपूर फुले येण्यास सुरुवात होते. फुलांच्या बाहेरील एक ते दोन पाकळ्या उमलण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांची तोडणी करावी. फुलांच्या वापरावरून तोडणी वेगवेगळ्या प्रकारे करावी. हार, अत्तरे तयार करण्यासाठी तसेच देवाला वाहण्यासाठी पूर्ण उमललेली फुले तोडावीत. अशी फुले उघड्या टोपलीत गोळा करावीत.

फुलदाणी वापरण्यासाठी (कट फ्लॉवर्स) १५ ते ६० सेंमी लांबीची देठ ठेवून फुले तोडावीत. निरोगी डोळ्याच्या वरील बाजूस देठावर धारदार चाकूने कट द्यावा. गुलाबपुष्पाची तोडणी सूर्योदयापूर्वी अथवा सूर्यास्तवेळी करावी. त्यामुळे उन्हामुळे होणारे फुलांचे नुकसान टळते. उशिरा तोडल्याने फुलदांडी व फुलांचे आयुष्य कमी होते. अत्तरे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी फुले उशिरा तोडल्याने सुगंधी द्रव्याचे प्रमाण कमी होते. फुलदांडी (कट फ्लॉवर्स) तोडणी केल्यानंतर फुलांचे देठ मानेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे फुलांचे आयुष्यमान वाढते. तोडणी संपेपर्यंत फुले सावलीत ठेवावीत.

प्रतवारी : तोडणीनंतर सावलीत ठेवलेल्या फुलांची प्रतवारी करावी. सुकलेली व खराब फुले बाजूला काढावीत. चांगल्या व निरोगी फुलांची देठाच्या लांबीनुसार प्रतवारी करावी. जास्त देठाच्या लांबीची फुले चांगल्या प्रतीची समजली जातात. तसेच त्यांना बाजारात किंमत जास्त मिळते. देठाच्या लांबीनुसार पुढील ग्रेडमध्ये फुलांची प्रतवारी केली जाते.

ग्रेड        देठाची लांबी

अ        ६० सेंमी पेक्षी जास्त

इ        ४५ ते ६० सेंमी

उ        ३० ते ४५ सेंमी

ऊ        १५ ते ३० सेंमी

ए        १५ सेंमी पेक्षा कमी

प्रतवारी जाती व रंगानुसार करावी. समान दांडे असलेली ६ किंवा १२ फुले एकत्र बांधून जुड्या खोक्यात पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात.

उत्पादन : प्रतिवर्षी फुलांचे सरासरी एकरी १.२५ लाख फुले मिळतात. दुसऱ्या वर्षापासून स्थिर उत्पादन येते.

गुलाबावरील रोग :

१) भुरी (Powdary Milde)

२) काले ठिपके (Black Spots)

३) शेंडा मर (Die -Back)

४) तांबेरा (Rusty)

१) भुरी : भुरी हा बुरशीजन्य रोग आहे. स्पेरोथिका पेनोसा नावाच्या बुरशीमुळे होतो. उष्ण - दमट वातावरणात प्रादुर्भाव जास्त आढळतो. पानावर भुरकट पांढऱ्या रंगाची बुरशी वाढून नंतर पानाच्या दोन्ही बाजूस पसरते. बुरशी कळ्या, फुलांचे देठ व कळीच्या मानेखाली पसरते. बुरशी आकुंचन पावतात. कळ्यांनी नैसर्गिक वाढ होत नाही. झाडाची वाढसुद्धा खुंटते.

उपाय : भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी २ मिली/लि. याप्रमाणे थ्राईवर, क्रॉंपशाईनर सोबत फवारावे.

२) शेंडा मर : हा बुरशीजन्य रोग आहे. फांदी शेंड्याकडून पाठीमागे काळपट पडून वाळत येते. छाटणीतून होणाऱ्या जखमांमधून बुरशी आत शिरते व मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसाळ्यात व पाणथळ जागी रोगाची तीव्रता जास्त असते.

उपाय : जर्मिनेटर, प्रिझम प्रत्येकी ५ मिली आणि हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. त्याचबरोबर जर्मिनेटर एक लि./२०० लि. पाण्यातून एकरी मुळावाटे सोडावे.

३) काळे ठिपके : डिप्लोकारपॉन रोझी या बुरशीमुळे रोग होतो. जमिनीलगतच्या जुन्या पानांपासून रोगाची सुरुवात होऊन अनुकूल हवामानात वरपर्यंत पसरतो. पानावर गोलाकार काळपट ठिपके पडतात. रोगट पाने पिवळी पडून थोड्याशा धक्क्याने गळून पडतात. झाड कमकुवत होऊन फुलांची प्रत व उत्पादनावर परिणाम होतो.

उपाय : थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३ ते ४ मिली आणी हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

४) तांबेरा : फ्रॅग्मीडियम म्युक्रोनॅटम या बुरशीमुळे तांबेरा होतो. हिवाळा व पावसाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. रोगग्रस्त पाने तपकिरी पडून झाडाची वाढ खुंटते. पानगळ होऊन झाड अशक्त बनते. यामुळे फुलधारणेस उशीर लागतो.

उपाय: हार्मोनी २ मिली किंवा झेड - ७८ दोन ग्रॅम/लि. पाणी याप्रमाणे फवारावे.

गुलाबावरील किडी:

१) सुरवंट (Hairy Catter Piller),

२) भुंगेरे (Chafer Beetle),

३) फुलकिडे (Thrips),

४) मावा (Aphids),

५) खवले कीड (Scale Insects),

६) लाल कोळी (Red Mites)

१) सुरवंट : हे किडे पानांच्या शिरामधील भाग खातात, फक्त शिरा शिल्लक राहतात. यामुळे पान जाळीदार बनते. पाने व फुलांच्या कळ्यांचे नुकसान होते. सुरवंटाची अंडी पानाच्या खालील बाजूस आढळतात. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या फुलांना भाव मिळत नाही.

२) भुंगेरे : भुंगेरे काळपट तपकिरी ते लालसर असतात. ते निशाचर असतात. दिवस तणांमध्ये व बुंध्याजवळ जमिनीत लपून बसतात. आणि रात्री पाने व कोवळी फूट कुरतडतात.

जास्त प्रादुर्भाव असल्यास भुंगेरे फुगलेले डोळे व कळ्या खातात.

३) फुलकिडे : फुलकिडे भुरकट पिवळ्या रंगाचे व लांबट आकाराचे असतात. कोवळे शेंडे. पाने, कळ्या व फुलांच्या पाकळ्या खरडून स्त्रवणारा रस शोषतात. असा भाग प्रथम पांढरा व नंतर तपकिरी होऊन खरचटल्यासारखे डाग पडतात. पाने व फुले आकसून वेडीवाकडी होतात.

४) मावा : तपकिरी, राखी हिरवट किंवा तपकिरी रंगाचे आणि लहान आकाराचे किडे असतात. शरीर गोल व मऊ असते. समूहाने पानाच्या खालच्या बाजूस अथवा शेंड्याकडील बाजूस आढळतात. हिवाळ्यात प्रादुर्भाव जास्त असतो. पिल्ले व पूर्ण वाढ झालेले किटक पाने, कळ्या व फुलातील रस शोषतात. कीडग्रस्त कळ्या उमलत नाहीत. माव्याच्या प्रादुर्भावने पानांवर व फुलांवर चिकटपणा आढळतो.

५) खवले कीड : काळसर करड्या रंगाची, पापद्यासारख्या आकाराची कीड, खोड व पानांना चिकटलेली असते. खवले एकाच ठिकाणी राहून रस शोषतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांद्या वाळतात.

६) लाल कोळी : किटक लांबट - गोल व तांबूस रंगाचे असतात. पूर्णावस्थेत आठ गाय असतात. खालच्या बाजूकडील पानांचा रस शोषतात. त्यामुळे पाने निस्तेज बनून झाडातील जोम कमी होतो.