१० गुंठे 'सिद्धीविनायक' शेवग्याचे पहिल्या तोड्याचे १० हजार

श्री. राजेंद्र तानाजी आवटे,
मु. पो. नेक्तूर, ता. जि. बीड.
मोबा. ९८९०१११२४२गेल्यावर्षी मी सरांच्या सल्ल्याने २ पाकिटे मोरिंगा शेवगाचे बियाणे घेऊन लागवड केली. जमीन मध्यम व चुनखडीयुक्त असल्याने १२' x ६' वर १ x १ x १ चे खड्डे घेऊन लागण केली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पंचामृत फवारणी वेळोवेळी केल्याने आणि खड्डे भरताना कल्पतरू २५० ग्रॅम खड्ड्यात टाकल्याने झाडे जोमाने वाढून ६ ते ७ महिन्याने शेंगा विक्रीस चालू झाल्या. वेळेवर शेंडा खुडल्याने झाडांची वाढ छत्री आकाराची झाली आहे. साधारणत: आठवड्यातून दोनदा तोडणी करून पहिल्या तोडणीस ४० किलो शेंगा मिळाल्या. बीड येथील लोकल मार्केटला विक्री करताना २५ ते ३० रू. किलोस भाव मिळाला. पट्टीचा सर्व खर्च वजा जाता १० हजार रू. नफा मिळाला. त्यामुळे मी अत्यंत खूष असून मध्यंतरी रिझल्ट चांगला आल्याने १०० किलो कल्पतरू मागवून पुन्हा शेवग्यास दिले. २५/ ७/१३ रोजी सरांच्या सल्ल्याने पुन्हा ५ पाकिटे शेवगा बियाणे पुणे ऑफिसवरून घेऊन फवारणीची औषधे घेतली व कापूस लागवडीचे तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती व औषधे ऑफिसवरून घेऊन जात आहे.