२५ दिवसात २५ किलो मेथीपासून २५ हजार नफा

श्री. संपत सोपानराव तनपुरे,
मु.पो. धांगवडी, ता. भोर, जि. पुणे,
मोबा. ९८२००६१४७२आम्ही जिप्सी काकडी १ एकरमध्ये २० मे २०१४ ला लावली आहे. जमीन काळसर लाल मातीची निचऱ्याची सुपीक आहे. या काकडीला ड्रीप केले आहे. वेल वाढीसाठी तार - काठीचा आधार केला होता. या काकडीला प्रत्येक १० दिवसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत फवारण्या करत होतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही वेल जोमदार वाढले, पाने हिरवीगार, रुंद, तजेलहार होती. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांमुळे झाला नाही. ३० दिवसात फुलकळी दिसू लागली. प्लॉटमध्ये सर्वत्र फुलकळी मोठ्या प्रमाणात लागली होती. या अवस्थेत थ्राईवर, क्रोपशाईनर, प्रोटेक्टंटचे फवारे घेतल्यामुळे फुलगळ झाली नाही. तसेच मधमाशा, फुलपाखरांचे प्रमाण वाढून परागीभवन वाढले, त्यामुळे माल भरपूर लागला.

४० - ४५ दिवसापासून काकडी विक्री चालू झाली. दिवसाड तोडे करत होती. दिड महिन्यात २० तोडे झाले, तर एकूण १५ टन उत्पादन मिळाले. मालाचा दर्जा उत्तम (काकडी सरळ, एकसारखी हिरवीगार, टवटवीत) असल्याने पुणे मार्केटमध्ये १ नंबर भावात लवकर विकली जात असे. ३०० ते ३२० रू./१० किलो असा भाव मिळाला. साधारण २० तोडे झाल्यानंतर (तोडे चालू झाल्यावर १।। महिन्यांनी) १ ऑगस्टपासून पाऊस चालू झाल्यापासून बाजारभाव ढासळले. पुणे मार्केटला निचांकी भाव ५ ते ६ रू. किलो झाल्याने माल तोडणी व औषध फवारणीचा खर्चही निघेना म्हणून तो प्लॉट काढून टाकला. आता त्यामध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा लावायचा आहे. तरी या काकडीपासून ३ लाख रू. उत्पन्न मिळाले.

दुसऱ्या १ एकर जमिनीत कारली, दोडका व भोपळ्याचे मिश्रपीक घेतले आहे. साधारण १२ ते १५ गुंठ्याचे तिन्ही प्लॉट आहेत. कारली अर्जुन व अभिमन्यू वाणाची, दोडका नागा तर भोपळा अंकूर वाणाचा आहे. हे तिन्ही प्लॉट आज (९ ऑगस्ट २०१४ ) ५० दिवसाचे झाले असून सप्तामृताचे नियमित १२ - १५ दिवसांनी या तिन्ही प्लॉटवर फवारे घेत आहे. त्यामुळे या १५ दिवसात अति पाऊस होऊन देखील प्लॉट पुर्णपणे रोगमुक्त आहे. फुलकळी चांगल्याप्रकारे आहे. दोडका ८ ते १० दिवसात चालू होईल.

'सिद्धीविनायक' शेवग्याची २ महिन्यापुर्वी ४०० रोपे लावलेली आहेत. त्या शेवग्याची वाढ २ महिन्यात २ ते २।। फूट झाली आहे. आता त्याचा शेंडा खुडायचा आहे.