६ गुंठे मरणारी कापरीपासून पहिल्या ३ तोड्याचे ९ हजार

श्री. देविदास सदाशिव यादव,
मु.पो. भुलेश्वर माळशिरस, ता. हवेली, जि. पुणे,
मोबा. ९७३०६९२८१४


आम्ही गेल्यावर्षी गणपतीत बिजलीसाठी प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी औषधे नेली होती. मात्र ती पाऊस चालू असल्याने वापरू शकलो नाही. ती तशीच शिल्लक होती. त्याचा वापर चालू वर्षी कापरीवर केला. कापरीच्या बियाचे १ पाकिट आणले होते. ते रोपासाठी टाकल्यावर उगवून आल्यावर उष्णता असल्याने रोपे मरायला लागली होती. त्यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर फवारले तर आढवड्यात रोपांची वाढ चांगली झाली. रोप २५ दिवसात लागवडीला आले. त्या रोपांची मध्यम प्रतीच्या जमिनीत ठिबकवर २' x १.५' वर लागवड २५ ते २०१४ ला ६ गुंठ्यामध्ये केली, तर लागवडीनंतरही रोपे मरत होती. म्हणून वरील औषधे पुन्हा फवारली, तर लावलेली रोपेही वाढीस लागली. त्या अनुभवानंतर मात्र नियमित १५ ते २० दिवसांच्या अंतराने थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर या औषधांची फवारणी घेवू लागलो. पुर्वी वापरत असलेली रासायनिक औषधे पुर्णपणे बंद केली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांमुळे कापरीचे फूट भरपूर होवून झाडे तीन फूट उंचीची व घेर २।। फूट झाला. २।। महिन्यात फुले तोडणी चालू झाली. कळी भरपूर आहे. नेहमीपेक्षा कापरीची फुले मोठी, ठोकळ, तेजदार आहेत. मार्केटमध्ये १ नंबर भावाने विकली जात आहेत. पहिला तोडा २ ऑगस्ट २०१४ ला केला होता. तेव्हा ४० किलो फुले निघून त्याला ६५ रू. भाव मिळाला. नंतर ४ - ४ दिवसांनी २ तोडे आज अखेरे झाले आहेत. दुसऱ्या तोड्याच्या ४० किलोला १०० हजार रू. झाले असून एकूण खर्च ३ हजार रू. झला आहे. अजून १।। ते २ महिने फुले तोडणी चालेल. गणपतित मालही वाढेल व भावही ज्यादा मिळतात. आजपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ५ फवारण्या केल्या असून पुढील फवारणीसाठी आज (१७ ऑगस्ट २०१४) थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, हार्मोनी प्रत्येकी ५०० मिली घेऊन जात आहे.