कळी लागल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी तरीही रिझल्ट उत्तम

श्री. दिलीप शिवाजी साळुंखे,
मु. पो. मांडवे, ता. सातारा, जि. सातारा.
मोबा. ९७६५४३३७७८


माझ्याकडे एकूण १० एकर क्षेत्र असून त्यात सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग, आले, झेंडू, तारेवरचा वाल, घेवडा, वांगी, टोमॅटो, अशी पीके घेतो, दोन वर्षपुर्वी मार्केटला फुले विकण्यासाठी आलो होतो. तेव्हा आपल्या सप्तामृत औषधांची माहिती घेतली. तेव्हा ट्रायल म्हणून साप्तामृत कलकत्ता झेंडूसाठी घेतले. झेंडूला कळी लागली होती. तेव्हा आपले औषधांचे स्प्रे घेतले तर झाडे टवटवीत, हिरवीगार झाली. वाढ व फुट भरपूर झाली. कळी मोठी होऊन फुले तेजबाज निघाली. झेंडूवर करपा आला नाही. नागआळी आली नाही. झेंडूला शाईनिंग व चमक भरपूर आल्यामुळे इतरांपेक्षा भाव अधिक मिळाला. बाजारात माल उठून दिसत असल्यामुळे इरारांपेक्षा आपल्या मालाची विक्री लवकर व्हायची. हा अनुभव फक्त झेंडू कळीवर असताना मारलेल्या सप्तामृत औषधांचा आहे. म्हणून आम्ही आता रोपे टाकण्यापासून म्हणजे कोणतेही बी जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये भिजवूनच टाकतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे आल्याचे रोगट बियाण्याची उत्तम उगवण प्लॉट निरोगी

आम्ही आले लावताना जर्मिनेटरचा वापर केला. आल्याचे बियाणे रोगट होते व वाटत नव्हते. की हे एवढे उगवून येईल, परंतु जर्मिनेटरमुळे १०० % उगवण, एकावेळी एकसारखी झाली. आता आले ३॥ महिन्यांचे असून आल्याची वाढ चांगली आहे. हिरवेगार तेजदार आहे. पिवळेपणा अजिबात नाही. ही औषधे (सप्तामृत) सुरूवातीपासून वापरल्यामुळे फायदा भरपूर होतो. नुकसान होत नाही. सरायानिक किटकनाशकांचा भरमसाठ खर्च वाचतो. हे सर्व तंत्रज्ञान वापरल्यामुळे एकूण १०० % गेरंटी पीक (उत्पादन) मिळते.