'कृषी विज्ञान' चे १४ व्या वर्षात यशस्वी पदार्पण

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


सप्टेंबर १९९८ मध्ये 'कृषी विज्ञान' हे मासिक आम्ही सुरू केले असून गेल्या १३ वर्षामध्ये समाजातील सर्व क्षेत्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. हे मासिक लहान अल्पभूधारक शेतकऱ्यापासून ते शास्त्रज्ञांपर्यंत आणि अडाणी शेतकऱ्यांपासून ते लक्षाधीश शेतकऱ्यांचा मार्गदर्शक, सल्लागार ठरले आहे.

'कृषी विज्ञान'च्या प्रत्येक अंकात शेतकऱ्यांचे विविध पिकांवरील अनुभव, विविध लेख असतात. शेतकऱ्यांनि केव्हा, काय, का लावावे.. हे अनुभवातून साकारता येते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कृषी विज्ञान' ने मानव आणि मानवतेला काय दिले.. या सदरास तर फार मोठा प्रतिसाद मिळाला. हे यशस्वी अफलातून प्रयोग देशाची अर्थव्यवस्था सुधरण्यासाठी व सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रेरणादायक ठरत आहेत. संपादकीमधून सरकारने, बँकांनी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी, कृषी क्षेत्रातील पणन तज्ज्ञांनी तसेच निधीचा विनियोग, पर्यावरण, शेतकऱ्यांनी स्वत: चे मार्केट अभारणे, पाणी, वीज, खते, बी- रोपे निर्मिती, फळबाग लागवड नव- नवीन पिकांचे मुल्यवर्धीत प्रक्रिया उद्योग, व्यवहार्य मार्गदर्शन असे देशभरातील शेतकऱ्यांन व तज्ज्ञांना नियोजन, धोरण, कार्यक्रम व कृती करण्याकरिता सर्वांना प्रेरणा देणारे 'कृषी विज्ञान' मार्गप्रदीप ठरले आहे.

डॉ. स्वामीनाथन सरांसारख्या आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञापासून देशातील व परदेशातील अनेक मान्यवरांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व 'कृषीविज्ञान' च्या कार्यास नुसत्या सदिच्छा दिल्या नाहीत. तर या उपक्रमाचे ते दूत ठरले आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे यांचे सरांच्या कार्याबद्दल गौरवोद्‌गार

अण्णांच्या राळेगण सिद्धीच्या संस्थेत 'कृषीविज्ञान' हे मासिक अनेक वर्षापासून जाते. ते वाचून, "सरांचे शेती शास्त्रातील काम हे फार मोठे आहे आणि हे तंत्रज्ञान देशातील शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त असून गरीबी. भूक, दारिद्र्य मिटविणारे आहे. " असे कौतुकोद्‌गार एका भेटीच्यावेळी काढले.

'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे' आले व हळदीची आधुनिक लागवड' पुस्तक प्रकाशित

गेल्या ४ - ५ वर्षापासून पारंपारिक पिके तसेच ऊस परवडेनासा झाल्यामुळे शेतकरी हा आले व हळद या व्यापारी पिकाकडे वळला व आधुनिक तंत्रज्ञानातील नवीन - नवीन प्रयोग करून एकरी ४ ते ५ लाख रू. आल्यापासून व ८ ते १० लाख रू. हळदीपासून घेऊ लागला. अनेक प्रदर्शनातून आले व हळद या पुस्तकाची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्याला मुर्त रूप येऊन हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी, प्राध्यापक, विकास अधिकारी तसेच तंत्रज्ञ यांना हे उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. पुस्तकाची किंमत ५० रू. असून पोष्टखर्चासह ५५ रू. ची मनीऑर्डर पाठवून पुस्तक घरपोच मिळविता येईल.