व्हायरसयुक्त प्लॉट पुर्ण दुरुस्त होऊन ९० टन पपई, ८ रू. किलो दर

श्री. मधुकर भादू पाटील,
मु. पो. कढोली, ता. एरंडोल, जि. जळगाव.


मी २८ मार्च २००९ रोजी तैवान ७८६ पपईच्या २००० रोपांची ९ x ६ फुटावर लागवड केली. जमीन मध्यम प्रतीची आहे. सुरुवातीला त्यावेळेस मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करता आला नाही. मात्र जुलै २००९ मध्ये पपईच्या काही झाडांवर जेव्हा व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवू लागला, तेव्हा याचे नियंत्रणासाठी औषधे आणण्यास जळगाव येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये गेलो असता श्री. मनोज चौधरी यांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने विक्रमी पपई उत्पादन व दर्जात घडविलेली क्रांती' हे पुस्तक तसेच पपई संदर्भात सप्तामृताचे कार्य यासंबंधी सविस्तर माहिती दिली. त्यानुसार सप्तामृत औषधे घेऊन गेलो. प्रत्येकी ३ मिली सप्तामृत (न्युट्राटोन ४ मिली) प्रति लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्याने प्रादुर्भावग्रस्त झाडावरील व्हायरस आटोक्यात राहिला. तसेच इतर झाडांवर त्याचा प्रादुर्भाव जाणवला नाही. महणून लगेच दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच केली. त्यामुळे झाडे पुर्णता व्हायरसमुक्त झाली. ८० ते १०० टन माल निघालेला असून ८ रू. किलोप्रमाणे बाजारभाव मिळाला. या उत्पादनामध्ये वेळोवेळी आम्हाला कंपनीचे प्रतिनिधी श्री. विनोद पाटील (९३७०६३९५७२) यांचे प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे फवारणीमध्ये औषधे व प्रमाण योग्य प्रमाणात घेऊन त्याच्या गरजेनुसार फवारण्या केल्या. त्यामुळे खर्चात बचत होऊन रोगमुक्त प्लॉट राहिला व उत्पादन आणि दर्जातही वाढ झाल्याने बाजारभाव उच्च प्रतिचा मिळाला. या अनुभवावरून अजून २००० पपईची रोपे लावणार आहे. त्यासाठी जर्मिनेटर १ लि. आणि सप्तामृत ५०० मिली घेऊन जात आहे. हे पीक सुरूवातीपासून या तंत्रज्ञानाने करणार आहे.