गळ पडलेली टोमॅटो (Collar Rot), कोबी सड व खरबुजावरील सुरकुत्या सप्तामृताने पुर्ण दुरुस्त

श्री. अर्जुन आण्णासाहेब देवकर,
मु. पो. निमगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड.
फोन नं. (०२४४४) २८८२७९


टोमॅटोची वाकलेली निस्तेज झाडे ३ ते ४ दिवसात १०० % सरळ

मी ५ - ६ वर्षापुर्वी अविनाश टोमॅटोची लागवड केली होती. तेव्हा खराब हवामानामुले टोमॅटोची झाडांची खोडापासून १ ते १।। इंच उंचीवरील साल गोलाकार काळी पडून वाळत होती. त्यामुळे त्या ठिकाणी झाड मोडून खाली पडत, म्हणून सरांचा सल्ला घेण्यासाठी पुण्याला आलो. यावर सरांनी पुर्ण सप्तामृत औषधांची चूळ भरून फवारणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे चूल भरून फवारणी केली असता वाकलेली झाडे १०० % सरळ झाली. तसेच झाडांवर ते पुर्वीपेक्षा अधिक आले. पाने केसाळ लवयुक्त, रुंद तयार झाली. हा अनुभव औषधे वापरल्यानंतर ३ ऱ्या - ४ थ्या दिवशीच आला.

कोबीसड ३ ते ४ दिवसात थांबली

त्यानंतर मी फुलकोबीचे गड्डे खराब होऊन सडत होते. फुलकोबीला घाणेरी यायची. यावरही सरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा वापर केला, तर ३ ते ४ दिवसात गड्डे सडायाचे थांबले.

गेल्या फेब्रुवारीमध्ये लावलेल्या खरबुजाची फळे आकसत होती. सालीवर सुरकुत्या पडत होत्या. तेव्हा कोणतीही फवारणी करणे जमले नाही, म्हणून फक्त थ्राईवर, क्रॉंपशाईनर १ - १ लिटर ड्रिपमधून दिले तर ३ -४ दिवसात फळे टवटवीत, कडक झाली. ती फळे आज मार्केटला घेऊन आलो आहे. मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचे अतिशय चांगले रिझल्ट मिळाले आहेत. माझे मित्र श्री. प्रल्हाद देवकर हे माझ्या अनुभवावरून ही औषधे वापरणार आहेत.

आडहंगामी खरबुजावरील नागअळी, डावणी व करप्यासाठी उपाय

५ एप्रिलला २ x २ x ६ फुटावर मध्यम काळ्या जमिनीत आड हंगामी खरबुजाची लागवड केली आहे. सध्या वेळ १॥ ते २ फूट लांबीचे असून कुठेतरी फुलकळी दिसत आहे. आतापर्यंत आम्हाला खरबुजा चे पीक घेताना असा अनुभव आला की, वेलीवर फळ लागल्यानंतर पानांवर नागआळी, डावणी व करपा येतो आणि त्यावर भारी - भारी रासायनिक औषधे वापरूनही तो आटोक्यात येत नाही. आठ दिवसात पुर्ण प्लॉट हाताबाहेर जातो.

तर हे घडू नये म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट ,प्रिझम, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि हार्मोनी ४०० मिली २५० लि. पाण्यातून फवारणार आहे. कल्पतरू खत एक - एक काडेपेटी वेलाभोवती सरांनी सांगितल्याप्रमाणे देणार आहे.