कलिंगड (टरबुजाचे) दर्जेदार उत्पादन

श्री. संतोष मधुकर शिंदे,
मु. पो. कुलधरण , ता. कर्जत, जि . अहमदनगर.
मोबा. ९९२२९१३३४०



मी गेल्या ३ ते ४ वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत असून शेवगा, ऊस, डाळींबाचे चांगल्याप्रकारे उत्पादन घेतले आहे. जून महिन्यात शेवग्यामध्ये आंतरपीक म्हणून शुगर क्विन कलिंगड दीड एकरमध्ये ७ x १ फुटावर लावले होते. जमीन हलकी, मुरमाड असून या कलिंगडाला ठिबक केले होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर सुरूवातीपासूनच म्हणजे बियाला जर्मिनेटर ची प्रक्रिया करण्यापासून केला व त्याच्या प्रक्रियेमुळे ९५ % उगवण झाली. नंतर १५ दिवसाच्या अंतराने सप्तामृताच्या ४ ते ५ फवारण्या केल्या. त्याने वेलींची वाढ झपाट्याने होऊन वेलीवर कोणताही रोग व कीड आले नाही. प्रत्येक वेलीवर साधारण ३ ते ४ फळे धरली. फळे साधारण ३ ते ७ किलो वजनाची मिळाली. मोठ्या फळाला १० रू. किलो, तर छोट्या फळांना ८ रू. किलो भाव मिळाला. आज रोजी (१४ ऑगस्ट) २ टन माल पुणे मार्केटला आणला होता. अजून २० ते २२ टन माल निघेल. कलिंगडाला एकूण (बियाणे, खत, औषधे) खर्च ३०,००० रू. आला. फळांना गोडी भरपूर आहे. फळांचा रंग आतून लाल भडक असून गर रवेदार व अतिशय गोड आहे. एकूण आम्ही या तंत्रज्ञानामुळेच एवढे उत्पादन घेवू शकलो. तसेच मी स्वत: मोबाईल मोटर स्टार्टर खास ड्रिपसाठी बनविले आहे. त्याच्या सहाय्याने मी पुण्यातूनही मोटर चालू - बंद करतो. कारण तिथे शेती बघायला फक्त आई असते.