८ गुंठे अर्धी गाडी बेण्यापासून ५ टन आले, निव्वळ नफा ३२ हजार रुपये

श्री. प्रदीप महिपती पवार, मु.पो. भाटमरळी , ता.जि. सातारा,
मोबा. ९९२३२३५८६७


आम्ही २ वर्षापुर्वी १८ मी २०१० रोजी २२० किलो आले बेण्याची लागवड केली होती. बेणे औरंगाबादवरून १८,००० रू. ला गाडी (५०० किलो) दराप्रमाणे अर्धी गाडी बेणे आणले होते. त्यातील खराब बेणे बाजूला काढून २५० किलोपैकी २२० किलोचीच लागण झाली.

जमीन माळरान निचऱ्याची आहे. ४ फुटाचा गादीवाफा करून ९ इंचावर १ ते २ डोळ्यांची कुडी लावली होती. पाणी व्यवस्थापनासाठी मिनी स्प्रिंक्लर (पोगर) केली होती. सुरुवातीला कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा आणि शेणखत २ ट्रेलर ८ गुंठे जमिनीत मिसळून नंतर बेण्यास जर्मिनेटर ची प्रक्रिया करून लागण केली होती. तर उगवण अतिशय चांगली झाली. जर्मिनेटरचा एक फायदा असा आहे की, २ वर्षाचे कांदा, मेथी कोथिंबीरीच्या घरच्या बियांना जर्मिनेटर वापरले तर उगवण अतिशय खात्रीशीर १०० % होते. आल्याची उगवण झाल्यानंतर १ महिन्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पहिली फवारणी केली. नंतर वर्षभरामध्ये दोन फवारण्या असे एकूण ३ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या या आले पिकास केल्या, तर आल्याची निरोगी व उत्तम वाढ झाली. विशेष म्हणजे एक वर्षाचे आले झाल्यानंतर पुढील जून, जुलैमध्ये या आल्याचा फुटवा जबरदस्त झाला. गणपतीत साधारण १५ महिन्याचे आले असताना काढणी केली असता. अर्धी गाडी बेण्यापासून १० गाडी उत्पादन मिळाले. म्हणजे २२० किलो बेण्यापासून ५ टन उत्पादन मिळाले. मात्र या काळात अतिशय मंदी आल्याने भाव गडगडले होते. जागेवरून ६००० रू./गाडीप्रमाणे म्हणजे फक्त १२ रू. किलोप्रमाणे आले व्यापाऱ्यांनी नेले, तरी ८ गुंठ्यातून ४९ हजार रू. इतर खर्च जाऊन झाले. लागणीचा खर्च म्हणजे बेणे, खते, औषधे यांचा एकूण खर्च १६ ते १७ हजार रू. आला. तो वजा करून निव्वळ नफा ३२ हजार रू. मिळाला.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारणीचा फवारणी करणाऱ्यास धोका नाही तरीही रिझल्ट १००%

आम्हाला दुसरा फरक असा जाणवला कि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे फवारताना फवारणी करणाऱ्या माणसाला त्याचा धोका अजिबात नसतो. माझ्यासारखा वयस्कर माणूसही ह्या औषधांची फवारणी सहज करतो. तसेच रिझल्ट अतिशय चांगले मिळत असल्याने उत्पादनात भरीव वाढ होते. त्यामुळे भाव जरी ढासळले तरी उत्पादन वाढल्याने पैसे होतात आणि भाव जर मिळाले तर, निश्चितच शेतकरी लखपती होतो.

या अनुभवावरून चालू वर्षी एक एकर आले ७ जून २०१२ रोजी लावले आहे. त्यासाठी आज २९ जुलै २०१२ सप्तामृत औषधे घेऊन जात आहे.