डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अर्ध्या एकरातून दिली ३५ पोते वाळलेली शेंग

श्री. अशोक आनंदराव वाडेकर,
मु.पो. बहूळ, व्हाया चाकण, ता. खेड, जि. पुणे,
मोबा. ९६७३६९९४०२माझ्याकडे बहूळ येथे १० एकर जमीन मध्यम प्रतीची आहे. त्यामध्ये मी पारंपारिक पद्धतीने पिके घेत असतानाच माहे फेब्रुवारी २०११ मध्ये सहज गुलटेकडी मार्केटला इतर चौकशीसाठी आलो असता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे ऑफिस येथे भुईमूग व इतर पिकांबद्दल माहिती घेतली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती घेतली आणि त्याचवेळी वेस्टर्न - २० या भुईमूग (निमपसऱ्या) बियाची २० किलोची एक बॅग घेऊन गेलो. त्याचवेळी सप्तामृत एक लिटर घेऊन गेलो. मोनोसॉल पावडर लावून लागवड केली. नंतर उगवून आल्यावर पंधरा दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, प्रोटेक्टंट १५ लि. पंपासाठी प्रत्येकी ४० मिली या प्रमाणात घेऊन फवारणी केली. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम, न्युट्राटोन, प्रोटेक्टंट, पंपासाठी प्रत्येकी ५० मिली प्रमाण घेऊन फवारणी केली आणि तिसरी व चौथी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रिझम, न्युट्राटोन, प्रत्येकी ६० मिली व प्रोटेक्टंट ६० ग्रॅम १५ लि. पंपासाठी घेऊन केल्या व खत १५:१५:१५ च्या ३० किलोच्या ६ बॅगा दोन वेळा विभागून टाकल्या जमीन तीन वर्ष उसाखाली होती आणि उन्हाळ्यामध्ये शेवटचे पाणी कमी असताना सुद्धा ३५ पोते वाळलेल्या शेंगा निघाल्या. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरी खाण्यासाठी आजतागायत पुरवठा चालू आहे. आज पुणे ऑफिसला बीट पिकाची माहिती घेऊन मासिक घेऊन जात आहे. त्यावेळी दिलखुलासपणे हा मागील अनुभव सांगितला आहे.