कल्पतरूने पिकाची तहान भागविली - ५५ गुंठ्यात ७ लाख

श्री. दिपक महादेव भिसे,
मु.पो. येडगाव, ता. जुन्नर, जि. पुणे,
मोबा. ९८९०१००४१२ /८८८८६६४०६६


मी प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करण्याचे ठरविले. चालू वर्षी ६ एप्रिल २०१२ रोजी मध्यम प्रतीच्या ५५ गुंठे जमिनीमध्ये ४ फूट रुंदीच्या सरिला अभिनव टोमॅटोची लागवड केली. लागवडीनंतर ४ बॅगा कल्पतरू सेंद्रिय खत वापरले, त्यामुळे फुटवा चांगला होऊन पांढरी मुळी अधिक प्रमाणात वाढली. त्याचा फायदा असा झाला की, आमच्या भागात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात असूनही पिकाला पाण्याचा ताण बसला नाही. त्यानंतर जर्मिनेटर पाण्यातून सोडले असता मर अजिबात झाली नाही. प्लॉट १५ ते २० दिवसाचा असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ४० मिली प्रति पंपास घेऊन फवारले असता फुटवा चांगला होऊन वाढ जोमाने झाली. नंतर फुलकळी लागल्यावर गळ होऊ नये म्हणून पुन्हा थ्राईवर, क्रॉपशाईनरचे २ स्प्रे घेतले. त्यानंतर फुगवणीसाठी न्युट्राटोन, राईपनर, क्रॉपशाईनर फवारले असता फळांची फुगवण चांगली होऊन शाईनिंग आली. मार्केटमध्ये मालाला एक नंबर भाव मिळाला. ५५ गुंथ्यामध्ये जुलै अखेरपर्यंत २४०० क्रेट माल निघाला. आणखी १ हजार क्रेट माल सहज निघेल. विशेष म्हणजे माझ्या प्लॉटला ड्रिप नाही. दुष्काळी परिस्थितीतसुद्धा प्लॉट डोक्याच्यावर म्हणजे ५ ते ६ फूट उंचीचा आहे. दररोज ८ ते १० लोक प्लॉट पाहण्यास येतात. माझ्या बरोबरीचे प्लॉट संपले. तरी माझा प्लॉट सप्टेंबर अखेरपर्यंत चालेल. आतापर्यंत या प्लॉटपासून ७ लाख रुपये झाले आहेत. लोकांनी टोमॅटोचे नवीन प्लॉट लावले आहेत. परंतु मी याच प्लॉटला पुन्हा कल्पतरू सेंद्रिय खताच्या ३ बॅगा व १०:२६:२६ खताच्या ३ बॅगा असा डोस दिला आहे. त्यामुळे आणखी फुटवा होऊन फुले व फळे लागली आहेत. योग्य नियोजन केल्यास कमी क्षेत्रातसुद्धा जास्त उत्पादन मिळू शकते. हे मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सहाय्याने दाखवून दिले.