शेजारचे प्लॉट करप्याने करपले आमचा मात्र उत्तम, निरोगी

श्री. प्रशांत प्रमोद वाघज,
मु.पो. शेटफळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर.
मोबा. ९७३०८४४००७


जून २०१२ मध्ये मी टोमॅटो हे पीक घ्यायचे ठरविले. त्यासाठी मी नामधारी २५३५ वाणाची निवड करून १५ जुनला लागवड केली. रोपे कल्पतरू नर्सरी शेटफळ येथून विकत घेतली. मी अगोदरपासून जर्मिनेटर वापरत होतो. त्यामुळे याही पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरायचे ठरविले. आदर्श कृषी सेवा केंद्र, मोडनिंब येथून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी १ लि. व प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम घेऊन २२५ लि. पाण्यातून लागवड केल्यानंतर १५ दिवसांनी फवारणी केली. त्यानंतर पुन्हा ६ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर ह्या औषधांची दुसरी फवारणी केली. त्यामुळे प्लॉटमध्ये एकदम उजाळा दिसायला लागला. त्यानंतर परत १० दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर यांचा स्प्रे घेतला असता फुटवा अधिक निघून झाडे तजेलदार दिसायला लागली. याच अवस्थेत माझ्या शेजारी तसेच परिसरातील प्लॉट करपा रोगाच्या प्रादुर्भावाने वाया जावू लागले होते. त्यांची वाढ खुंटली होती. अशा परिस्थितीत देखील माझ्या प्लॉटमधील सर्व झाडे निरोगी होती. हे बघून शेजारीसुद्धा म्हणू लागले या प्लॉटला तुम्ही काय वापरले ? मग मी त्यांना डॉ.बावसकर तंत्रज्ञानची माहिती सांगितली.

सध्या माझा प्लॉट पुर्णपणे निरोगी असून ८ ते १० दिवसात तोडे चालू होतील. या प्लॉटपासून चांगले दर्जेदार उत्पदान मिळण्यासाठी डॉ. बावसकर तंत्रज्ञान पुढेही चालूच ठेवणार आहे.