दुष्काळी भागातील जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर

२०११-१२, २०१२-१३,२०१३-१४,२०१४-१५ असे सलग ४ वर्षे मोसमाचा पाऊसकाळ जो जून ते सप्टेंबर असतो, या काळातील पावसाचे आगमन हे सुरुवातीचे ५० ते ५५ दिवस आणि चालू मोसमात तर ७५ दिवस उघडीप दिली त्यामुळे सततच्या नापिकी व सुरूवातीचा मोसमी पाऊस असतो त्यावर देशाचे आर्थिक नियोजन असते. जेव्हा खरीपाचा असा पाऊस दगा फटका करतो तेव्हा सर्व क्षेत्रातील आर्थिक आराखडे कोलमडतात. कृषी क्षेत्र हे शासनकर्ते, प्रशासक, शास्त्रज्ञ, विकास अधिकारी, नेते यांना फार मोठे आव्हान याकाळामध्ये उभे करतात. कारण पाऊसच नसेल तर खरीप पेर होत नाहीत. माणसाच्या, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीरपणे उभा राहतो. परंतु गेल्या १० वर्षात जो शेततळ्याच पर्याय अवलंबला जातोय तो संरक्षित पाणी (protective Irrigation) देता येण्यासाठी S.O.S. म्हणून उपयोग होतो आणि जाणारी पिके ही बऱ्यापैकी येतात. परंतु ४ वर्षाच्या मोसमी पावसात सतत पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न, शेळ्या - मेंढ्यांचा, गाई - म्हशींचा, शेतीकामाच्या जनावरांचा गंभीर प्रश्न झालेला आहे. तथापि १ ते २ महिन्यामध्ये येणारी मूग, चवळी मटकी ही (Leguminous) पिके मध्यम काळात, ५ ते १० टक्के मुक्त चुना असलेल्या भारताच्या काना - कोपऱ्यात चांगली येऊ शकतात. यामुळे सकस, हिरवा, अधिक प्रथिनेयुक्त चारा मिळून जनावरांचे पोषण मूल्य चांगले राहते. त्याच बरोबरच ज्या खारवट जमिनी आहेत तेथे गिनीग्रास, गजराज गवत, नेपीअर ग्रास, स्टायलो अशी तत्सम जलद वाढणारी चारा पिके तुषार सिंचनावर वाढवावीत तसेच पारंपारिक गवतामध्ये ज्या ठिकाणी पिकच उगवत नाही तेथे शिंपी, घोळू ही तृणवर्गीय तणे ही दुभत्या जनावरांना आणि मेहनतीच्या जनावरांना उपलब्ध होऊ शकतात. या सर्व चारा पिकांना कल्पतरू हे एकरी १ ते २ पोती वापरावे. जेथे पाण्याची उपलब्धता आहे तेथे २ ते ५ गुंठे लसूण घासाचा प्रयोग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी केलेला आहे. एरवी कापणी पारंपारिकतेने उशिरा होती तेथे सप्तामृताच्या फवारण्या तर, पहिली कापणी ८ ते १० दिवस लवकर होऊन पौष्टीक, मुबलक, हिरवागार, रूचकर, पोषण मूल्ययुक्त कमी क्षेत्रात अधिक प्रमाणात पल्लेदार चारा होत असल्याने असा चारा दुभत्या जनावरांना दिल्याने दुधाचे पोषण मूल्य अधिक होते व कष्टाच्या जनावरांनादेखील हा चारा कमी लागतो व ही सर्व जनावरे तरततीर राहतात. चाऱ्याच्या कापण्या एरवी ३ ते ४ होतात. त्या तेथे ६ ते ७ होतात व बहुवर्षीय चारा हा अधिक उत्पादन देऊन भरपूर जनावरांची भूक भागवितो. तेव्हा अशा पिकांना तुषार सिंचनाचा वापर रात्री करावा म्हणजे दिवसाच्या उष्णतेने जे बाष्पीभवन अधिक होते व पाण्यापासून चारा पिके वंचित राहतात हे टळून अपेक्षित उत्पादन मिळेल. प्रत्येक कापणीनंतर ४ ते ५ व्या दिवशी व कापणीच्या अगोदर ८ दिवस एकदा अशा सप्तामृताच्या फवारण्या कराव्यात म्हणजे जमिनीत राहिलेल्या खुंटांना फुट येऊन चाऱ्याचे उत्पादना व दर्जात सातत्य राहील व कमी वेळात. कमी पाण्यात सकस चारा उपलब्ध होऊन जनावरांची जोपासणा करता येईल. त्याकरिता विविध चारा पिकांचे नियोजन करावे, तसेच चारा कोणत्या जनावरांसाठी म्हणजे व्यापारी तत्त्वे कोणती जसे दुध निर्मिती, काटक जनावरांसाठी चुनी, मका, भरडा, डाळी काढल्यानंतरची फोलपटे, भाताचा कोंडा, भाताचा पेंढा द्यावा. भाताचा पेंढा देताना त्यावर युरिया २ किलो व १ किलो मीठ व उसाची मळी २ ते ५ किलो किंवा २ किलो कळ्या गुळाचे पाणी प्रती क्विंटल पेंढ्यावर मारून त्याची कुटी करून जनावरांना दिली म्हणजे सुक्या चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यात रूपांतर होऊन जनावरे हा चारा आवडीने, रूचकरपणे खातात व सर्व चाऱ्यांचे रूपांतर दुधामध्ये व कष्टाची कामे करणाऱ्या जनावरांना शक्तीत रूपांतर होते.

ज्या ठिकाणी मुरघास किंवा सायलेज तयार करण्याची सोय आहे त्याचा व्यवस्थित वापर करावा. म्हणजे एरवी जो चारा पाला खाऊन उरलेला पायाखाली किंवा जनावरांच्या मुत्रात जातो तो वाया जातो. तेव्हा असा चारा वाया न जाता या पद्धतीने तो संपूर्ण खाल्ला जाईल.

अतिशय दुष्काळी परिस्थिती असते तेथे पट्टा पद्धत न करता एक एक फुटावर ऊसाची रोपे लावून त्याला सप्तामृताच्या १५ दिवसाला अशा ४ फवारण्या कराव्यात तुषार सिंचनाने पाणी देऊन १ पोते कल्पतरू महिन्याला द्यावे व दर २ महिन्यांनी कापणी करावी व परत फवारणी करावी. म्हणजे अशा ऊसाची पाने रसदार, टवटवी, रुंद, अधिक जाडीची, पौष्टिक बनून कमी चाऱ्यामध्ये जनावरांचे पोषण भरपूर होईल आणि हा चारा इतर पारंपारिक ऊसापेक्षा सकस, पौष्टिक व न त्रासदायक ठरेल. शेळ्यामेंढ्यासाठी बरबडा आणि तरोटा ही बांधाच्या आणि पडीक गायरानात आपोआपच असतात. ती मान्सुनच्या पावसावर आपोआपच वाढतात, परंतु जर साधन सामुग्री असेल तर त्याला कल्पतरू व सप्तामृत वापरून आणि या गायरानात जनावरे सतत चरत असल्याने त्यांचे मल - मूत्र पडल्याने दुर्लक्षित गायरानापेक्षा यात तरोटा, बरबडा, एकदलवर्गीय (तृणधान्य) गवते म्हणजे बारीक व मोठा चिमणचारा, शिंपी अशी गवते कापून जनावरांना द्यावीत. तेथे जनावरांना चरायला सोडू नये कारण ती जनावरे त्यांच्या पद्धतीने मातीसह चारा उपटून त्या गवताचे नासाडी होईल तसेच गवताबरोबर माती जनावरांच्या पोटात गेल्याने आजार निर्माण होतील. असे गवत दर महिन्यास कापणीस येऊ शकते.

कष्टाळू शेतकरी आपल्या कष्टाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून त्यांची जनावरे पोसतात, जोपासतात. दुग्ध व्यवसाय व शेतीकामे व्यवस्थित जोपासतात असा अनुभव आहे. शेळ्यांसाठी सुबाभूळ, येडीबाभूळ, कडूनिंबाचा पाला आहे तो द्यावा. कारण भारतात ज्या ठिकाणी १०० इंचाचा पाऊस आहे तेथे फक्त कडूनिंबाची झाडे नसतात. परंतु जेथे ट्रॉपीकल हवामान आहे म्हणजे २५ ते ५० इंच पाऊस पडतो तेथे कडूनिंबाचे पक्षामार्फत बीज प्रसारण १०० टक्के चांगले होते. तसेच उंबर, पिंपळ, वड ही वृक्षे युरोपीयन देशात दिसत नाहीत. परंतु भारतासारख्या उष्ण प्रदेशात पक्षांनी वृक्षसंवर्धन व बीज संवर्धनाचे, वृक्षरोपणाचे प्रसारण (Dehisenc) होते हे काम विलक्षणपणे नैसर्गिकरित्या ३/४ (७५%) भारतात अतिशय यशस्वीपणे रूजविले गेले आहे. अशी नैसर्गिक देणगी भारतासारख्या खंडप्राय देशाला वरदान ठरली आहे.

Related New Articles
more...