थायलंड चिंचेचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार उत्पन्न व अधिक भाव मिळविण्यासाठी प्रयोग

श्री. विनायक शंकर पवार,
मु.पो. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली.
मो. ९९७५९६८०२०


मी अमेरिकन मर्चंट (व्यापारी) नेवीमध्ये अमेरिकेत न्युयॉर्कला १७ वर्षे नोकरी केली. मात्र त्यानंतर आई - वडिलांच्या निधनानंतर २००४ साली घरची शेती करण्यास कोणी नसल्याने नोकरी सोडून भारतात आलो आणि २००५ पासून शेती करू लागलो. त्यावेळी पहिल्या वर्षी गहू, ज्वारी, बाजरी अशी पिके घेतली. त्यानंतर २००६ साली थायलंड चिंचेची चव मार्केटमधून घेतल्यावर ती गोड असल्याने व तिला भाव जादा मिळत असल्याने आपल्या शेतात लावण्याचे ठरविले. त्याप्रमाणे बारामतीवरून ३०० रोपे (कलमी) आणून २०' x २०' वर २००६ साली लावली. जमीन हलकी मुरमाड, खडकाळ आहे. पाणी ठिबकने देतो. ह्या चिंचेला गेल्यावर्षी थोड्या प्रमाणात चिंचा लागल्या. यावर्षी चिंचा लागल्यात मात्र त्या कमर्शियल (व्यापारी तत्त्वावर) नाही.

या चिंचेला मार्च, एप्रिल, मे महिन्यात फुले लागतात. मात्र सुरूवातीची फुले गळतात नंतर जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर बहार टिकून चिंचा सध्या (८ - ८ - २०१५) २ - ३ इंचाच्या लागल्या आहेत. यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरायचे आहे, म्हणून सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे.

मी 'कृषी विज्ञान' चा १।। वर्षापासून वाचक आहे. मासिकातील माहिती अतिशय प्रेरणादायक आहे. त्यामध्ये मुलाखती आलेल्या शेतकऱ्यांना फोन करून औषधांच्या रिझल्टबद्दल खात्री केली असता. औषधे खात्रीशीर रिझल्ट देणारी असल्याने समजल्यानंतर मागील कराड प्रदर्शनातून सप्तामृत घेतले. त्याच्या माझ्याकडील १० वर्षाच्या केशर आंब्यावर कैरी अवस्थेत असताना (मार्च २०१५ महिन्यात) २ फवारण्या केल्या होत्या, तर फळांना चकाकी आली, आकार वाढला, गोडी - चवीत सुधारणा झाली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अर्धवट अवस्थेत वापरूनही एवढा चांगला रिझल्ट आल्याने आता चिंच, पेरू, आंब्याला हे तंत्रज्ञाना वापरण्यासाठी आलो आहे.

सरांनी सांगितले, "जमिनीत वाळवी असल्याने प्रथम या चिंचेला प्रोटेक्टंट २ किलो, चुना १ किलो, गेरू १ किलो, मोरचूद १ किलो आणि स्प्लेंडर १०० मिली हे २० लि. पाण्यात कालवून त्याची तागाच्या कुंच्याने खोडाला ३ ते ४ फुटापर्यंत पेस्ट लावणे. वरील प्रमाणातील द्रावण जर जास्त घट्ट झाले तर ४० लि. पाण्यात मिसळावे व त्यामध्ये फक्त स्प्लेंडरचे प्रमाण वाढवून (म्हणजे २०० मिली) घेणे. तेच प्रत्येक झाडाला कल्पतरू खत १ किलो, निंबोळी पेंड १ किलो, कुरंजपेंड १ किलो ठिबकजवळ देणे. तुमच्या भागात पाऊस नसला तरी कल्पतरू हे ढगातील पाणी खेचून घेते. खोडाजवळ गारवा निर्माण करते, त्यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते. तसेच ते गांडूळांची निर्मिती वाढविते. सुत्रकृमीच्या प्रादुर्भावास प्रतिबंधात्मक म्हणून खोडाभोवती झेंडू लावणे."

आता चिंचेवर आळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यासाठी मोठ्या (१० वर्षाच्या) ३०० झाडांसाठी "स्प्लेंडर ३५० ते ४०० मिली, जर्मिनेटर ५०० मिली, थ्राईवर १ लि., क्रॉपशाईनर ५०० मिली, राईपनर १ लि., न्युट्राटोन १ लि. प्रिझम ५०० मिली, हार्मोनी ३०० मिली, प्रोटेक्टंट २ किलो, कॉपर ऑक्सीक्लोराईड १ लि, १०० ते १२५ लि. पाण्यातून २ वेळा फवारणे. छोट्या ३ वर्षाच्या २०० चिंचेला वरीलप्रमाणेच औषधे घेऊन ती १५० लि. पाण्यातून २ वेळा फवारणे, छोट्या ३ वर्षाच्या २०० चिंचेला वरीलप्रमाणेच औषधे घेऊन ती १५० लि. पाण्यातून २ वेळा फवारावीत. म्हणजे कीड कमी होईल. दर्जा सुधारेल. उत्पन्न वाढेल. चिंच ही खाण्याची वस्तु असल्याने याला कीड नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस क्लोरोपायरीफॉस, डायक्लोरोव्हॉस अशी विषारी किटकनाशके फवारू नयेत."

केशर आंबा २००६ साली २५' x २५' वर लावलेला आहे. १०० झाडे आहेत. पेरू लखनौ - ४९ ची जून २०१३ ला ३०० झाडे लावली आहेत. लागवड १५' x १५' वर आहे. सध्या खोड पायाच्या अंगठ्यापासून मगनटाच्या जाडीचे आहे. पेरूची शेंडा छाटणी करतो. ५ - ६ फुटवे आहेत. घेर ४ फुटाचा आहे. सरांनी सांगितले "आंब्याला देखील चिंचेप्रमाणेच पेस्ट लावून कल्पतरू खत प्रत्येक झाडास ५ किलो द्या आणि जर्मिनेटर १ लि. प्रिझम १ लि. कॉपर ऑक्सीक्लोराईड १ किलोचे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग (आळवणी) करणे. त्याचबरोबर थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ - १ लि. प्रोटेक्टंट १ किलो, प्रिझम ५०० मिली आणि शेंडा चालण्यासाठी राईपनर १ लि. १०० ते १५० लि. पाण्यातून फवारणे. तसेच पेरूला देखील वरीलप्रमाणे तंत्रज्ञान वापरणे आणि पुढच्या वेळी येताना पेरूची दक्षिणेकडील १।। फुट हिरवी फांदी जाड देठ असणारी घेऊन येणे. माती परिक्षण केले असल्यास त्याचा अहवाला घेवुन येणे म्हणजे पुढील व्यवस्थानासंदर्भात मार्गदर्शन करता येईल."