हस्त बहरातील डाळींब प्रतिकूल परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी

श्री. केरबा लक्ष्मण पळसकर, मु.पो. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे मो. ९९७०७४७२२३माझ्याकडे २००९ मध्ये लावलेले २।। एकर भगवा डाळींब आहे. मुरमाड जमिनीत १२' x ८' वर याची लागवड आहे. २ वर्षाची बाग झाल्यानंतर बागेचा बहार धरू लागलो. जुलै - ऑगस्ट महिन्यात बागेस ताण देतो. ताण नीट न बसल्यास इथ्रेलची फवारणी करून पानगळ करतो आणि हस्त बहार धरतो. २।। एकरात १ हजार झाडे लावली होती, मात्र निमॅटोडचा प्रादुर्भाव होऊन यातील जवळपास २०० झाडे गेली. सध्या ८०० झाडे आहेत.

हस्त बहार धरण्याचे कारण असे की, या बहाराचा माल मार्केटमध्ये लवकर (मे महिन्यातच) म्हणजे आंबे बहाराच्या मालाच्या अगोदर येत असल्याने याला भाव जादा मिळतो. मात्र यामध्ये मुख्य अडचण अशी येते की, बागेला विश्रांती (ताण) देण्याच्या अवस्थेत पाऊस जर पडला तर बागेस ताण बसत नाही. त्यामुळे पानगळ न होता फुट निघते. याचा परिणाम म्हणजे कळी पाहिजे तशी निघत नाही. आणि कळी जर की लागली तर उत्पादनात घट येते.

यासाठी मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरतो. कळीसाठी प्रिझम, कळी सेटिंगसाठी प्रोटेक्टंट, अनावश्यक शेंडा वाढ थांबण्यासाठी थ्राईवर, शाईनिंगसाठी क्रॉपशाईनर आणि फळे पोसून वजन, दाण्याचा रंग, गोडी वाढीसाठी राईपनर व न्युट्राटोन फवारतो. जर्मिनेटरचे ड्रेंचिंग (आळवणी) माल निघेपर्यंत ३ - ४ वेळा करतो.

पहिल्या बहारापासून खर्च वजा जाता १ लाख रू. मिळाले. दुसऱ्या बहारापासून १।। लाख रू., तिसऱ्या बहारापासून २ लाख रू. नफा मिळाला. मात्र यावर्षीचा बहार प्रतिकूल वातावरण होते आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापरही करू शकलो नाही, त्यामुळे हा बहार फेल गेला. कळी अतिशय कमी म्हणजे कुठेतरी ५ ते १० लागली होती. छाटणीदेखील चुकली. यासाठी २३ एप्रिल २०१५ रोजी ४० पिशवी कांदा विक्रीस पुण्याला आलो होतो, तेव्हा सरांचे मार्गदर्शन घेऊन गेलो. त्यानुसार जुलै महिन्यात पानगळ केली आणि आता ऑगस्टमध्ये नवीन पालवी फुटत आहे. त्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर १ लि. + क्रॉपरऑक्सीक्लोराईड १ लि. २०० लि. पाण्यातून/एकरी ड्रेंचिंग (आळवणी) करून फुटीसाठी प्रिझम १ लि. + जर्मिनेटर १ लि.ची २०० लि. पाण्यातून फवारणी करणार आहे. म्हणजे फूट चांगली निघून कळी चांगल्याप्रकारे निघेल.