डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने नर्सरी (रोपवाटीका) व ढोबळीचा प्लॉट यशस्वी

श्री. सागर बापू बाबर,
मु.पो. तांदुळवाडी, ता, माळशिरस, जि. सोलापूर - ४१३३१०,
मो. ८६००८७१९२३


आमची भाजीपाला पिकांची नर्सरी आहे. इंद्रा ढोबळी मिरचीची सिझनमध्ये (जून महिन्यात) १० ते १२ लाख रोपे जातात. वांगी, मिरची, टोमॅटोची तर कायमच (वर्षभर) रोपे असतात वांगी अजय अंकूर, पन्ना, महिको, बायो सिडसची त्रिशुळ या जातीची रोपे तयार करतो. मिरचीमध्ये अग्नी, ज्वाला या जाती असतात. टोमॅटो हंगामानुसार अगस्टा, अभिनव तर खरबुज कुंदन बॉबी आणि कलिंगडामध्ये शुगर क्वीन या वाणांची रोपे ट्रेमध्ये तयार करतो.

या नर्सरीमध्ये बिजप्रक्रियेसाठी आवर्जुन 'जर्मिनेटर' वापरतो. जर्मिनेटरचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत. जर्मिनेटरमुळे वातावरण प्रतिकूल असले तरी बी लवकर ६ व्या - ७ व्या दिवशी उगवून येते. शिवाय उगवणशक्ती वाढ झाल्याने ९० ते ९५% सशक्त रोपे मिळतात. पांढऱ्या मुळीचा जारवा. वाढून रोपांची वाढ चांगली होते. मर होत नाही. बी टोकल्यापासून १ महिन्यातच रोपे विक्री चालू होते. इतर औषधांच्या तुलनेत आम्हाला जर्मिनेटरचे रिझल्ट अतिशय प्रभावी असल्याचे जाणवले. त्यामुळे आम्ही रोपे घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील जर्मिनेटर व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्यास सांगतो.

आम्ही जुलै २०१५ च्या पहिल्या आठवड्यात इंद्रा ढोबळीची ५ एकर मध्ये लागवड केली आहे. बेड ३ फुट रुंदीचे असून बेडवर रुंदीच्या दोन्ही बाजूला अर्धा - अर्धा फुट जागा सोडून २ ओळी लावल्या आहेत. ओळीतील रोपांचे अंतर १ फुट आहे. अशा प्रकारे २' x १' अशी लागवड आहे. बेडमध्ये बेसल डोस एकरी निंबोळीपेंड ४ बॅगा, पोटॅश २ बॅगा, १८:४६ च्या २ बॅगा, युरीया २० किलो, सुक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो याप्रमाणात दिला आहे.

या ढोबळी मिरचीची रोपे तयार करताना आमच्या नर्सरीत जर्मिनेटर वापरल्याने रोपे सशक्त, निरोगी मिळाली होतीच, शिवाय लागवड करतानाही रोपे जर्मिनेटर १०० मिली + १० लि. पाणी या प्रमाणातील द्रावणात बुडवून लावल्याने मर अजिबात झाली नाही. पांढऱ्या मुळीचा जारवा वाढल्याने वाढही जोमाने सुरू झाली. या मिरचीवर जर्मिनेटरच्या १ महिन्यामध्ये २ फवारण्या आणि किटकनाशक व बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या आहेत. सध्या (३ ऑगस्ट २०१५) झाडे पुर्णपणे निरोगी असून फुटवा चांगला आहे. पाने हिरवीगार रुंद असल्याने प्लॉट टवट्वीत दिसत आहे. आता यापुढीलही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या फवारण्या घेणार आहे.