मला भुईमुगाचे उत्पादन १५ क्विंटल/एकरी, तर शेजारच्यांना ९ क्विंटल/एकरी

श्री. अजय धाबर्डे,
मु.पो. धामणगाव, ता.जि. वर्धा - ४४२००१.
मो. ९६६५१०१११४मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा नियमित वाचक असून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर मागच्या वर्षापासून करत आहे. या वर्षी मी भुईमूग पिकाकरीता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचे ठरविले.

भुईमुगासाठी प्रथम जर्मिनेटर व प्रिझम याची बीजप्रक्रिया केली. नंतर तिफणीच्या सहाय्याने पेरणी केली. पेरणीवेळेस सोबतच कल्पतरू खत एकरी एक बॅग पेरले. ७ ते ८ दिवसांनी भुईमूग बियाण्याचे अंकूर वर येवून दिसू लागले. जर्मिनेटरच्या बिजप्रक्रियेने उगवण एकसारखी झाल्यामुळे माझ्या शेजारी भुईमुगाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची लागवड व माझी लागवड यात चांगलाच फरक दिसत होता. माझ्या भुईमुगाची उगवण ७ - ८ दिवसात झाली व शेजारील शेतकऱ्याच्या भुईमुगाची उगवण १५ दिवसांनी झाली. त्यामुळे मला जर्मिनेटर चा चांगला फायदा झाला.

मी १५ दिवसांनी पहिला फेर डवरणीचा दिला. त्यामुळे तण निघून गेले आणि पिकाला एकप्रकारे हिरवळीचे खत मिळाले. त्यानंतर ६ दिवसांनी प्रथम फवारणी केली. त्यामध्ये जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट- पी हे १५ लिटर पाण्याला प्रत्येकी ४० मिली याप्रमाणे घेऊन याची फवारणी केली. त्यामध्ये प्रोटेक्टंट- पी ही पावडर एक रात्र भिजवून सुती कपड्याने गाळून ते फवारणी करीता वापरले. त्यामुळे भुईमूग पिकाची वाढ चांगली व निरोगी झाली. त्यानंतर एका आठवड्याने अळीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाची फवारणी केली. ३५ ते ४० दिवसांनी डवऱ्याच्या सहाय्याने भुईमुगाला भर दिली. जेणेकरून आऱ्या उघड्या न राहता जमिनीत गाडून शेंगा चांगल्याप्रकारे पोसल्या जातील. भर दिल्यावर ४ ते ६ दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन, प्रिझम आणि राईपनर हे १५ लिटरला ६० मिली याप्रमाणे घेवून दुसरी फवारणी केली, त्यामध्ये सोबत किटकनाशक वापरले. त्यामुळे कीड - रोग नियंत्रणात राहून भरपूर फुट झाल्याचे दिसू लागले. उन्हाळा जास्त तापला तरी पीक चांगल्याप्रकारे तग धरून होते.

सुरुवातीपासूनच तुषार सिंचनाचे पाणी सोडत गेलो. त्यामुळे पुरेपुर पाणी सर्व झाडांना मिळत गेले. पीक फुलावर येईपर्यंत पाणी चांगल्याप्रकारे सोडत गेलो. त्यानंतर शेंगा भरण्यासाठी तिसरी फवारणी केली. त्यामध्ये न्युट्राटो, क्रॉपशाईनर आणि राईपनर प्रत्येकी ७५ मिली प्रति पंपाकरिता वापरले. त्यामुळे शेंगा पोसण्यास मदत झाली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ३ फवारणीतच भुईमूग पीक उत्तम आले. सुरुवातीला होणारी मर पुन्हा उद्भवली नाही. पाने पिवळी पडली नाही. त्यामुळे पीक निरोगी दिसू लागले.

दरवर्षी मर रोगामुळे १० ते १५% झाडे दगावत होती तसेच बुरशीचा प्रादुर्भाव दिसायचा. झाडे पिवळी पडत असत. त्यामुळे झाडाची वाढ होत नव्हती व शेंगाची चांगली भरण होत नव्हती, पण यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे या सर्व गोष्टी अजिबात जाणवल्या नाही.

मी जेव्हा भुईमूग काढायला सुरूवात केली त्यावेळी प्रत्येक झाडाला ३५ ते ४० शेंगांचा लाग दिसत होता. मला एकरी १५ क्विंटल उत्पादन मिळाले व माझ्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याला पारंपारिक पद्धतीने जवळपास ९ क्विंटल एकरी उत्पादन मिळाले.