२। एकर हळद, खर्च १ लाख १४ हजार, उत्पन्न ४ लाख व ४० क्विंटल बेणे

श्री. चंद्रकांत राजाभाऊ राऊत, मु.पो. कलगाव, ता. महागाव, जि. यवतमाळ- ४४५२०५.
मो. ७५८८५९१८५५


माझ्याकडे एकूण २२ एकर शेती आहे. जमीन काळी - भारी कसदार आहे. बोअरवेल बागायती आहे. मागच्या वर्षी कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या स्टॉलवर सप्तामृतची माहिती घेऊन 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली. आपल्या मासिकातील शेतकऱ्यांचे अनुभव वाचून त्यांच्याशी संपर्क साधला असता समाधानकारक प्रतिक्रिया मिळाल्या. मग आम्ही हे तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले.

जून २०१५ मध्ये २२०० रु./क्विंटल दराने २० - २२ क्विंटल बेणे आणले होते. २- २। एकर लागवडीसाठी हळदीच्या या बेण्याला प्रथम जर्मिनेटर व क्लोरोपायरीफॉसची बेणेप्रक्रिया केली. त्यामुळे उगवण १००% झाली. तसेच सोयाबीन व कापूस या पिकाला माहिती पत्रकाप्रमाणे पहिली फवारणी केली. प्रथम मी हळदीला शेणखत दिले होते व उगवल्यानंतर १५ दिवसांनी कल्पतरू २ पोते + झिंक ५ किलो + १०:२६:२६ खताचे १ पोते दिले. तिथून मी पहिल्या ८ दिवसांनी जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉपशाईनर + न्युट्राटोन + प्रोटेक्टंट प्रती १ लि. प्रमाणे ड्रीपद्वारे सोडले व त्यानंतर दुसरे खत ३० दिवसांनी १० किलो सुक्ष्म अन्नद्रव्य ड्रीपद्वारे सोडले. ५ दिवसांनी पहिली सप्तामृताची फवारणी केली व माझी हळद दुसऱ्या शेजाऱ्यांच्या व गावातील सर्व हळदीपेक्षा हिरवी व निरोगी दिसू लागली. त्यामुळे इतर किटकनाशकाचा खर्च वाचून पीक ८० दिवस चांगल्याप्रकारे जोपासले त्यानंतर पुढे मी आणखी एक सप्तामृताची फवारणी केली. त्यामुळे खराब वातावरण असतानाही रोगावर पुर्णपणे नियंत्रण मिळवता आले. या शिवाय हळकुंड मोठी, लांब झाली. एका झाडास २ ते ३ किलो एवढे हळदीचे गड्डे लागले होते. या हळदीचा प्लॉट सुरुवातीपासूनच जोमदार व रोगमुक्त होता. ३ फेब्रुवारी २०१६ या काळात काढणी केली. माझी हळद बेडवर असल्यामुळे मी ड्रीपद्वारे औषधे व सुक्ष्म अन्नद्रव्य दिली होती. म्हणून मला चालू वर्षात ४६ क्विंटल पॉलीश केलेल्या हळदीचे उत्पादन झाले . ८,७७५ रु. एवढा बाजार भाव मिळाला. या हळदीला मला ४४,००० रु. बेण्याचे व इतर खर्च ७०,००० रु. असा १ लाख १४ हजार रु. खर्च आला व चालू बाजार भावानुसार मला ४ लाख रु. मिळाले, शिवाय लागवडीसाठी ४० क्विंटल बेणे मिळाले. त्याची यावर्षी जून २०१६ मध्ये ४ एकरमध्ये लागवड केली आहे.

गेल्यावर्षी सोयाबीन व कापूस या पिकावर मी जर्मिनेटर व सप्तामृत वारपल्यामुळे मला सोयाबीन एकरी ११ क्विंटल व कापूस एकरी १८ क्विंटल झाला. बाजारभाव पण चांगला मिळाला. त्यामुळे चालू हंगामात कापूस व सोयाबीनला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सप्तामृत व कल्पतरू खते वापरून इतरांना पण सांगत आहे. चालू वर्षी ५ - ६ एकर कापूस आणि २।। एकर सोयाबीन असून ही पिके निरोगी व चांगल्या प्रतीची येतील अशी मला आशा आहे.