६ एकर डॉलर व PKV - २ चना, निव्वळ नफा २ लाख ७६ हजार रु.

श्री. रमेश रामराव नलावडे,
मु.पो. कृष्णापूर, ता. अमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०७
मो. ९५२७१३१०४०


माझ्याकडे एकूण १० एकर जमीन आहे. त्यातील ६ एकरमध्ये आम्ही रब्बी हंगामात चना हे पीक घेतले होते. त्यामध्ये आम्ही डॉलर व P.K.V.-२ या वाणाची निवड केली. पेरणीपुर्वी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटची बिजप्रक्रिया केली. नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली. या ट्रॅक्टरला टोकण पद्धतीने बी पडण्याची पद्धत होती. यामुळे बियाण्याला इजा होत नाही व त्याचे टोक फुटत नाही. पेरणीच्या वेळी सोबतच २०:२०:० व दाणेदार सिंगल सुपर फॉर्सफेट १ + १ पोते दिले. पेरणीनंतर ६ ते ८ दिवसांनी हरबरा उगवून कोंब वर येऊ लागले. जर्मिनेटरच्या बिजप्रक्रियेमुळे उगवण एकसारखी झाल्यामुळे तासे एकसारखी व एकसमान दिसत होती. बिजप्रक्रियेचा चांगला फरक जाणवला, कारण ज्यांनी जर्मिनेटर वापरले नव्हते त्यांच्या शेतात मला उगवण ६० ते ६५ टक्के एवढी कमी दिसत होती. माझी मात्र उगवण शक्ती ९५ टक्के झाली. मी उगवाणीनंतर १५ दिवसांनी पहिली डवरणी पाळी दिली. त्यानंतर ६ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम व क्रॉंपशाईनर प्रत्येकी पंपास ६० मिली वापरले व त्यानंतर हरबऱ्याची वाढ चांगली व निरोगी होऊन हिरवेगार पीक दिसत होते. पीक फुलाच्या अवस्थेमध्ये असतांना मी खताचा दुसरा डोस सुक्ष्म अन्नद्रव्याची एकरी बॅग याप्रमाणे ६ बॅगा दिल्या व पाणी सोडले. त्यानंतर पिकाला ताण दिला व फुल लागण्यास सुरुवात झाल्यावर पाणी दिले. तिथून १५ दिवसांनी सप्तामृताची फवारणी घेतली. मग पिकाला घाटे येण्यास सुरुवात झाली व नंतर तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन व प्रोफेक्स सुपर या किटकनाशकाची केली. त्यामुळे आळीचा प्रादुर्भाव कमी झाला व घाटे गळ सुद्धा थांबली. घाटे पोसण्यास सुरुवात झाली. मग हरबरा वाळण्यास सोडून दिला व हरबरा काढणीस आला. काढल्यानंतर मार्केटला नेला. मला डॉलरचा भाव ५,६०० रु प्रती क्विंटल व P.K.V. - २ ला भाव ४,२०० रु. प्रती क्विंटल मिळाला. मला पूर्ण ६ एकरामध्ये ६३ क्विंटल एवढे उत्पादन झाले व निव्वळ नफा २,७६,४०० रु. मिळाला. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची उत्पादने व इतर खते वापरली. त्यामुळे मला समाधानकारक उत्पादन मिळाले. या अनुभवातून मी चालू हंगामात कापूस, सोयाबीन, हळद या पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करत असून इतरांना पण सांगत आहे.