डाळींबाच्या निर्जीव मोडणाऱ्या काड्या दुरुस्त होऊन बाहार यशस्वी, ४।। लाख रू. उत्पन्न केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे

श्री. नामदेव यशवंत पापत, मु.पो. पिंपरी दुमाला, ता. शिरूर, जि.पुणे. मो.९८६०९६४९२३

मी इंपोर्ट - एक्स्पोर्ट (विदेश व्यापार) ऑफिसमध्ये (पुण्यामध्ये) सरकारी नोकरी करून २०१० मध्ये सेवानिवृत्त झालो. त्यानंतर गावी ६ एकर जमीन आहे ती विकसित करण्याचे ठरविले. पहिले आम्ही ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग अशी पिके घेत होतो, मात्र नोकरी करून जाऊन - येऊन ही शेती कसेबसे घरच्या पुरते उत्पादन देत. व्यापारी उत्पन्न काही मिळत नसल्याने आर्थिक उत्पन्न मिळत नसे.

मग सेवा निवृत्तीनंतर शेतीकडे लक्ष केंद्रित केले. हळूहळू सुधारणा होत गेल्यावर जून २०१५ मध्ये आम्ही भगवा डाळींबाची निघोज ता. पारनेर, जि. अहमदनगर, येथून १००० रोपे आणली. त्याची लागवड १५' x १३' खड्डे घेऊन केली.

लागवडीनंतर आम्हाला डाळींबातील अनुभव नसल्याने अनेक सल्लागारांचे सल्ले घेत होतो. अशातच आम्हाला एका स्थानिक कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांची खते, औषधे वापरायला सांगितली, मात्र त्याचाही काही परिणाम आमहाला जाणवला नाही. सल्लागारांच्या मार्गदर्शनानुसार सांगेल ते वापरात होतो. फवारण्या,स्लरी असे अनेक प्रयोग करत होतो. मात्र झाडांमध्ये काही सुधारणा जाणवत नव्हती. अशातच काही झाडांची मर झाली. झाडांची शाखीय वाढ होत नव्हती. खोडे, फांद्या बारीक होत्या. त्यामुळे झाडांचा विस्तार पाहिजे तसा नव्हता. लागवडीपासून नुसता खर्चच होत होता, म्हणून १८ ते २० महिन्याचा बाग झाल्याने मिळेल तेवढे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने बहार धरण्याचे ठरविले. मी पुण्याहून येऊन - जाऊन शेती पाहत असल्याने प्लॉटवर शेत मजुराची एक जोडी शेती कामासाठी नेमली. या बागेचा पहिला बहार जानेवारी २०१७ मध्ये धरला. पानगळी करिता इथ्रेल फवारले. मात्र येथे आमच्याकडून इथ्रेलच्या अतिरिक्त (जादा) वापराने झाडे पानगळीनंतर फुटेनात. काडी निर्जीव होऊन कटकन मोडत होती. त्यामुळे काय करावे हे समजेना. नंतर आमच्या मुलाचे मित्र श्री. रविंद्र सुरळकर हे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमध्ये आहेत. मग त्यांच्या मार्गदर्शनाने डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले.

मग आम्ही कल्पतरू सेंद्रिय खताच्या २० गोण्या आणि सप्तामृत औषधे ५ - ५ लि. घेऊन गेलो. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार फवारण्या व आळवणी करू लागलो. बाग चांगल्या प्रकारे फुटली व बागेत सुधारणा होत असल्याचे जाणवू लागले. मग डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे डाळींब तज्ञ अरगडे साहेब (मो. ९९२२३४५५९४) यांच्या मार्गदर्शनानुसार नियमित वापर चालू ठेवला. सुरुवातीला नेलेली सप्तामृत ५ - ५ लि. औषधे संपल्यानंतर पुन्हा ५ - ५ लि. औषधे नेली. त्याच्या वापरामुळे फळधारणा चांगली झाली. जी उत्पादनक्षम ६०० ते ७०० झाडे होती, त्याच झाडांचा बहार धरला होता. बाकी झाडे खुजी राहिल्याने त्याचा बहार घेतला नाही. बहार धरलेल्या झाडांवर ५० पासून ७० पर्यंत फळे होती. फळे पोषणासाठी राईपनर, न्युट्राटोनच्या वरून नियमित फवारण्या व ०:५२:३४, ०:०:५० यांचा ड्रिपमधून वापर करत होतो. त्यामुळे फळांचा आकार वाढून ४०० - ४५० ग्रॅमची फळे मिळाली. फळांना आकर्षक कलर देखील येऊ लागत.

९ टन मालाचे ४।। लाख, अजून ३।। ते ४ टन माल मिळेल

ह्या फळांची काढणी ऑगस्ट २०१७ च्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू केली. तर लाला भडक कलरची आकर्षक फळे मिळत होती. मात्र यावर्षी या काळात डाळींबाचे भाव ढासळले असल्याने २० रु. पासून ३० ते जास्तीत जास्त ४० रु./किलो भाव पुणे मार्केटला असल्याने राहाता (अहमदनगर) कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना फळे दाखविली. त्यांनी ती फळे फोडून पहिली तर फळ वरून जसे लालभडक होते तसेच आतूनदेखील आकर्षक लालभडक दाण्याचे निघत आणि दाण्यांना गोडी होती. तेव्हा राहता मार्केटला इतरांची फळे या आकाराची होती. मात्र त्याला आपल्या फळांसारखी चमक, कलर नव्हता. त्यामुळे तेथे आम्हाला ४० रु. पासून ६० रु. किलो भाव मिळाला. कृषी उत्पन्नन बाजार समिती राहाता येथे श्री. सतीशकुमार अॅण्ड कंपनी यांच्याकडे माल विक्रीस पाठवित होतो. पहिल्या ३ तोड्याचा एकूण ७ टन ५०० किलो माल विकून काल (२४/७/२०१७) रोजी ७२ क्रेट (१।। टन) माल पाठविला. असा आतापर्यंत ९ टन माल विकला. सरासरी ५० रु. भावाने ४।। लाख रु. झाले आहेत. अजून बागेत मागे ३।। ते ४ टन माल निघेल एवढी लहान फळे आहेत. त्यांचा कलर हिरवट आहे. तेव्हा आज पुणे ऑफिसला डॉ. बावसकर सरांना भेटून या फळांचे पोषण होण्यासाठी व कलर येण्यासाठी मार्गदशर्न व तंत्रज्ञान घेण्यास आलो आहे. यानुसार आता थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोनच्या फवारण्या घेणार आहे.

या प्लॉटचा हा पहिलाच बहार असून त्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा जवळपास ८०% वापर करून गरजेपुरताच किटकनाशक, बुरशीनाशक व विद्राव्य खताचा वापर केला. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर एकूण ८० हजार ते १ ते १। लाख रु. खर्च आला. अक्षरश: बहार धरण्यापुर्वी बाग काढून टाकण्याच्या अवस्थेत होती, मात्र डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे व त्यांच्या प्रतिनिधींच्या योग्य मार्गदर्शनामुळे या बागेपासून मी आतापर्यंत ४।। लाख रु. उत्पन्न घेऊ शकलो व मला खात्री आहे की अजून बाकी मालाचे १ ते १।। लाख रु सहज होतील. त्यामध्ये बहार धरल्यापासूनचा माझा पुर्ण खर्च निघून जाईल व ४।। लाख रु. निव्वळ नफा राहील. झाडे लहान असून देखील हे विक्रमी उत्पादन असल्याने गावातील लोक आम्हाला विचारू लागले तुम्ही काय वापरले ?

गावातील काही शेतकऱ्यांचा माल आपल्या फळांएवढा होता. मात्र त्यावर काळे डाग होते आणि ते फळ फोडले की आतून जवळपास ५० ते ६०% दाणे काळे पडलेले दिसत. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आणि आता ते देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्यास सुरुवात करत आहेत.

४० रु. भाव असताना गाळ्यावर डाळींब फोडून दर्जेदार, गोड लालभडक मालास खाल्यावर दलालाने ६० रु./ किलो भाव दिला

आम्हाला मार्केटमध्ये असा अनुभव आला की, व्यापारी आमच्या मालाला सर्वसाधारणच भाव देत होता. तेव्हा त्यांना आम्ही फळाच्या दर्जाबद्दल माहिती सांगून वाढीव भावाची मागणी केली तर तो व्यापारी म्हणाला या हंगामात सध्या बरीच फळे डागामुळे आतून काली पडली आहेत फळांना गोडी कमी आहे. तेव्हा फळ जरी मोठे असले तरी आम्ही देत असलेला (४० रु./ किलो) भाव योग्य आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले, कोणतेही फळ फोडा फळातील दाण्याचा रंग लालभडकच मिळणार व गोडीही अतिशय चांगली आहे. तेव्हा व्यापाऱ्याने एका क्रेटमधील फळ फोडले तर आतील दाणे लालभडक पाहून मग ते त्यांनी खाऊन बघीतले तर चवही अप्रतिम असल्याने गाळ्यावरील इतर व्यापाऱ्यांना देखील ते खाण्यास देऊन ६० रु. किलोचा भाव दिला. त्यानंतर २ - ३ वेळा आमचा माल गेल्यावर गेला की, सकाळी ९ वाजेपर्यंत सर्व माल विकला जात असे. बाकीच्यांचा त्यानांतर ११ वाजेपर्यंत माल विकला जात असे.

आता आम्हाला शेतीतील शाश्वत तंत्रज्ञान मिळाले असल्याने आमचा आत्मविश्वास वाढला असून अजून ३०० भगवा डाळींबाची नवीन लागवड डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने करणार आहे व यापुढे ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीनेच बहार घेणार आहे.

Related New Articles
more...