हरित क्रांतीचे प्रणेते - प्रा.डॉ.एम.एस.स्वामिनाथन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गेल्या अनेक वर्षापासून कृषि व ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये बहुमोल कार्य करीत असलेले डॉ. एम. एस. स्वामिनाथन व त्यांच्या एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या कार्याविषयी 'कृषी विज्ञान' वाचकांना परिचय व्हावा या हेतूने १७ वर्षापुर्वी नुतन सहस्त्रकाचे निमित्त साधून त्यांना मुलाखतीसंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी याकरिता २ ते ६ ऑक्टोबर २००० दरम्यान चेन्नईला मुलाखतीकरिता येण्यास आमंत्रित केले होते.

मी ३ तारखेला संध्याकाळी चेन्नईला पोहोचून दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी डॉ. बावसकर टेक्नॉलॉजी संदर्भात आवर्जुन चर्चा केली. या भेटीनंतर मी विविध विभागांना भेट देऊन माहिती घेतली. तेथील काम करणारे शाश्त्राज्ञ व सहकारी ऑकेस्ट्राप्रमाणे एका सुरात तन्मयतेने काम करताना आढळून आले. या दौऱ्यामध्ये मी त्यांची कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रदीर्घ मुलाखत घेतली. ही प्रश्नोत्तरवजा मुलाखत खास 'कृषी विज्ञान' च्या वाचकांसाठी देत आहोत.

सर, आपण वयाची ७५ वर्षे पुर्ण केलीत. ७५ व्या वाढदिवसानिमित्त आपले अभिष्ठचिंतन, आपण स्वतंत्र भारताच्या प्रगतीशील घडामोडींचे साक्षीदार आहात.

* डॉ. बावसकर : इंग्रजांच्या राजवटीमध्ये आपल्या शेतीचे काय स्थान होते ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : इंग्रजांच्या राजवटीमध्ये कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर फक्त एक टक्का होता. त्यांनी तृणधान्य, भाजीपाला पिकाकडे दुर्लक्ष करून फक्त चहाच्या मळ्यांकडे लक्ष केंद्रित केले होते. कायदा व सुव्यवस्थेचा अभाव होता.

* डॉ. बावसकर : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यामध्ये कोणता बदल झाला ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये सिंचन व्यवस्था नवहती. फक्त जिरायती पिके. पारंपरिक शेतीमध्ये कापूस, कडधान्ये व तेलबिया पिके घेतली जात होती.

* डॉ. बावसकर : या काळामध्ये सरकारने शेतीला पुरेसे संरक्षण व प्राधान्य दिले होते काय ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : या कालावधीमध्ये १०५ लक्ष कुटुंबातील शेतकरी स्वतंत्रपणे जमीन कसुन शेतीमालाचे उत्पादन घेत होते व या उत्पादनावर ७०० लक्ष लोकसंख्या अवलंबुन होती. तरीही शेतीप्रधान देश असतानाही सरकारने याचा गांभीर्याने सुरुवातीस विचार केला नाही.

* डॉ. बावसकर : शेतीस औधोगिक दर्जा देण्यासंदर्भातील उपाय सुचावावेत ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : सरकारने या बाबत विचार केला नाही. या संदर्भात खालील प्रमाणे विश्लेषण करून सुधारणा करता येतील.

उपलबध साधनांची जोपासना, संवर्धन : जमिनीचे ओर्गय सुधारणारे तंत्रज्ञान, पाणीसाठी व्यवस्थापन, सौर ऊर्जा निर्मिती, एकात्मिक व्यवस्थापन यामध्ये अजून सुधारणा करता येतील.
सुधारित तंत्रज्ञान: कमी पाणी व उपलब्ध साधनांचा वापर करून संद्रिय शेती व पडीक जमिनीच्या विकासाचे प्रकल्प अनेक भागांमध्ये उभारता येतील.

आधुनिक तंत्रज्ञान : आपण सुचविल्याप्रमाणे उच्च मुल्ये (Value Added) असणाऱ्या पिकांची लागवड करून, त्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया पदार्थ तयार करण्याचे कारखाने, कुटीरोद्योग उभारल्यास अशा प्रक्रिया उधोगातून तरुण, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक व सामाजिक विकास साधता येईल.

* डॉ. बावसकर : भारतामध्ये लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे दिवसेंदिवस धान्याचा तुटवडा भासत आहे. यावर काय उपाययोजना करता येतील ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : खराब व पडीक जमिनीमध्ये पिकांची लागवड, पारंपरिक शेतीमध्ये बदल व अधिक, दर्जेदार उत्पादन देणारे आधुनिक कृषी तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.

* डॉ. बावसकर : सद्यपरिस्थितीमध्ये रासायनिक खतांचा वापर कितपत योग्य आहे?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : शाश्वत, सेंद्रिय शेतीमध्ये तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक, मुलद्रव्ये, सेंद्रिय खते, कंपोस्ट हे महत्त्वाचे घटक आहेत. रासायनिक खतांचा समतोल वापर होणे आवश्यक आहे. अतिरिक्त वापराने जमिनी कालांतराने कायमच्या बाद होतात.

* डॉ. बावसकर : हवामान खात्यामार्फत दिले जाणारे पिकांचे नियोजन चुकीचे ठरत आहे. यावर उपाय सुचवावा.

प्रा. डॉ. स्वामिनाथन : योग्य मान्सुन पीक व्यवस्थापन योजना शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. हवामानाचा अंदाज देतेवेळी पिकांने नियोजनही दिता आले पाहिजे. एकूण पर्जन्यमान तसेच खराब हवामानाचा अंदाज सुरुवातीसच शेतकऱ्यांना दिल्यास पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय शेतकऱ्यांना करता येइली.

* डॉ. बावसकर : तेलबिया व कडधान्ये पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : (Water Shade Management) घेतली पाहिजेत. सोयाबीनच्या विविध उपयोगामुळे ह्या पिकास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

* डॉ. बावसकर : भारतामध्ये सेंद्रिय शेतीचे काय स्थान आहे ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : सेंद्रिय शेतीस भरपूर वाव आहे. उदा. आसामसारख्या भागामध्ये भातशेती मोठ्या प्रमाणात होते, परंतु अतिपावसमळे दिलेली खते वाया जातात. तसेच खते देणेही अवधड होते, दिलेले घटक वाहून जातात. अशा परिस्थितीमध्ये सेंद्रिय शेती उपयुक्त ठरते.

* डॉ. बावसकर : सद्यपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाबाबत काय करता येईल ?

विविध पिकांसाठी व कृषी उद्योगासाठी देण्यात येणाऱ्या कर्जाचे व्याज ४ ते ६% पर्यंत खाली आणता येईल का?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : पुरेसे व वेळेवर शेतकऱ्यांना कर्ज पुरविता आहे पाहिजे . पीक विमा योजना पुर्णतः राबविणे आवश्यक आहे. काढणीनंतरच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देण्यात यावे व अनेक लोकांनी आधुनिक तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणत उत्पादन करणे महत्त्वाचे असून अशा शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून हे उत्पादन गरीब लोकांनाही परवडेल अशा दरातच उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.

* डॉ. बावसकर : दर्जेदार भाजीपाला पिके, फळे, फुले लागवडी संदर्भात आपला दृष्टिकोन काय आहे ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : अधिक उत्पादन व दर्जा असणाऱ्या पिकांची लागवड करताना पीक, लागवडीचा हेतू व अर्थशास्त्र ध्यानात घेतले पाहिजे. अशा पिकांच्या लागवडीकरिता योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे अशा पिकांचे रोगप्रतिबंधक सत्य बियाण्याचा शेतकऱ्यांना पुरवठा करणे आवश्यक आहे. उदा. वेलदोडा (Cardaman) पिकामध्ये 'कट्टे' (Katte Disease) रोग फार नुकसानकारक आहे. अॅझेरडिक्टीन (Azardictin)सारख्या उपयुक्त घटक असणाऱ्या कडुनिंबाची लागवड मोठ्या प्रमाणत करावी.

* डॉ. बावसकर : उती संवर्धन व पॉलिहाऊस तंत्रज्ञान भारतीय शेतीसाठी उपयुक्त आहे काय ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : आयुर्वेदिक वनस्पतीसारखी उच्चं मुल्ये (Value Added) असणाऱ्या पिकांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. परंतु ऊस किंवा केळी सारख्या पिकांसाठी याचे अर्थशास्त्र जमविता आले पाहिजे.

* डॉ. बावसकर : शेतकऱ्याने स्वतःचे स्वतंत्र मार्केट उभे करण्याविषयी आपले मत काय ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : चांगली योजना आहे. अशा योजना राबविल्यानंतर पुर्णत्वास नेणे आवश्यक आहे. हाताळणी, वाहतूक व असा उत्पादित माल ग्रहकापर्यंत योग्य वेळेत पोहोचविता आला पाहिजे. या करिता सुसंवाद असणे आवश्यक आहे.

* डॉ. बावसकर : जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर किरकोळ विकीचे स्टोल्स शेतकऱयांच्या मुलांना देण्यात यावे, असे आम्ही सुचविले आहे. यावर आपले मत काय आहे?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : चांगली कल्पना आहे. मी कृषी सहकार व ग्रामीण विकास खात्याचा सचिव असताना ग्रामीण गोडाऊन स्कीम (Rural Godown Scheme) १९७९ मध्ये सुचविली होती. ती योग्य पद्धतीने पुढे नेता आली नाही.

* डॉ. बावसकर : सर्व उच्च मुल्य असणारी शेती उत्पादने, प्रक्रिया उद्योगातील सुधारणेस वाव आहे काय ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : प्रत्येक पिकामध्ये उच्च मुल्ये आहेत. कच्च्या मालाची निर्यात करण्याऐवजी अशा कच्च्या मालावर प्रक्रिया करून, असे प्रक्रिया पदार्थ निर्यात करावेत. दुध- दुभत्या जनावरांना चाऱ्यामध्ये मळी मिसळून दिल्यास दुधाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळू शकते.

* डॉ. बावसकर : भारतीय शेती उत्पादनांच्या निर्यातीचा भविष्यकाळाचा दृष्टिकोन काय आहे ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : सध्या शेतीमालाच्या निर्यातीमध्ये खुपच कमतरता आहे. कारण औद्योगिक उत्पादनाच्या निर्यातीच्या तुलनेत शेती उत्पादनास कमी सबसिडी दिली जाते. परकीय देशामध्ये Infrastructure (सर्व सुविधा) चांगले आहे. हवाई वाहतुकीच्या भाड्यामध्येही शेती उत्पादनास आपल्या देशात कमी सबसिडी दिली जाते.

* डॉ. बावसकर : पर्यायी व्यवस्थापन न करता साखर कारखान्यांना परवानगी देणे कितपत योग्य आहे? भारतीय शेतीत ऊस हे पीक खरोखरच फयदेशीर आहे काय ?

* प्रा. डॉ. स्वामिनाथन : पाण्याचा कमी वापर, पाण्याच योग्य वापर, कार्यक्षमतेचे प्रयोग महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटकसारख्या राज्यात राबविणे आवश्यक आहे. ऊसासारखी C4 पिके सुर्यप्रकाशाचा चांगला वापर करतात.

* डॉ. बावसकर : शीतगृह, शीतकक्षच्या बाबतीत आपले मत काय ?

प्रा. डॉ. स्वामिनाथन : अधिक महत्त्वाचे आहे. बटाटा उत्पादनामध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सत्य बटाट्याचे बियाणे शेतकऱ्यांना पुरविता आले पाहिजे. क्लोरो - फ्युरो - कार्बन टेक्नॉलॉजीमुळे ओझोन थरावर परिणाम होऊन Ultra violet rays सौरऊर्जेमार्फत सरळ (Direct) येतात.

डॉ. स्वामिनाथन यांनी या मुलाखतीसाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर यांच्यानंतर आशिया खंडातील तिसरी महान व्यक्ती बनल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले.

ह्या नंतर डॉ. स्वामिनाथन सरांनी "तुमचे तंत्रज्ञान भारतामध्ये कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण करेल" असा गौरवोद्गारपर आशीर्वाद दिला. डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन राष्ट्र उभारणीसाठी हे तंत्रज्ञान तरुण पिढीस मार्गदर्शक ठरून याचा प्रसार कृषी विज्ञान मंडळे. कृषी ग्रंथालये प्रत्येक १० किमी. परिसरामध्ये उभारण्याचे कार्य आम्ही चालवित आहे.

याच चर्चेदरम्यान सेंद्रिय शेती व आयुर्वेदिक वनस्पतींचा उल्लेख निघाला असता यु. पी. कॅडर मधून राजीनामा दिलेल्या व सध्या त्यांच्या फाउंडेशन अंतर्गत चेन्नईतील खेड्यामध्ये 'जैवतंत्रयज्ञानाच्या' वृद्धीचे कार्य करीत असलेल्या महिला आय.एस.एस. अधिकारी श्रीमती लक्ष्मी बोहरा यांचा परिचय करून दिला. या दोघांनीही या विषयामध्ये रुची दाखवून शेवटी डॉ. स्वामिनाथन यांनी 'आपले तंत्रज्ञान (डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी) फळबाग क्षेत्रामध्ये क्रांती घडवेल.' असे गौरवोद्गार काढले.

डॉ. स्वामिनाथन सर हे गेल्या ३० वर्षापासून (आता ४५ वर्षापासून) ते आमचे मार्गदर्शक आहेत. ते आशिया खंडातील महान व्यक्तिमत्व असून शाश्त्रज्ञ या नात्याने त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांचे कार्य आशिया खंडातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी बहुमोल आहे. सध्या त्यांचे पाँडेचरी मधील कार्य तिसऱ्या जगातील लोकांना वरदान ठरणारे आहे.

या त्यांच्या सामाजिक व ग्रामीण विकास कार्यासाठी 'नवीन सहस्त्रकातील नवीन वर्षामध्ये आपण नोबेल पुरस्काराचे मानकरी व्हाल.' अशी प्रार्थना करून मुलाखत संपविली.