शेजाऱ्याने तणनाशक मारल्याने माझी जळालेली कपाशी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने सुधारून बहारदार झाली

श्री. हनुमान सुदामराव उगले, मु.पो. हिरवा (गो.), ता. परळी(वै.), जि. बीड. मो. ७९७२०२९१९९


माझ्याकडे एकूण ८ एकर जमीन आहे. त्यापैकी ३ एकरमध्ये दि. १०, ११ व १२ जून २०१७ रोजी. बोअरवेलच्या मदतीने ठिबकवर कापूस लागवड केली. सुरूवातीला मी कसल्याही प्रकारचा नत्र. स्फुरद, पालाश खताचा वापर न करता फक्त एकरी ७५ किलो कल्पतरू. सेंद्रिय खत रेगटीसोबत पेरले. कापसाची उगवण क्षमता चांगली झाली व सुरुवातीच्या काळामध्ये वाढ ही चांगली झाली.

त्यानंतर पीक १ महिन्याचे झाले असता माझ्या शेजारील बाजुस असलेल्या उसामध्ये तणनाशक (२,४ - डी) मारण्यात आले व बहुतेक त्याचा दुष्परिणाम माझ्या कापसावर झाला. पाने गुंडाळून पुर्ण लांबली. झाडाच्या शेंड्यावर पानांचा गुच्छ तयार झाला. पाने सुकून वाढ पुर्णपणे थांबली. अशा अवस्थेमध्ये काय करावे काही सुचेना ? मग डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या पुणे ऑफिसवर फोन लावला व त्यांनी मला बीड जिल्हा कंपनी प्रतिनिधी श्री. सतिश बुरंगे यांचा मोबाईल नंबर (८३०८८५१३८८) दिला. त्यांना फोन केल्यापासून एका तासात ते माझ्या प्लॉटवर हिवरा (गो) येथे भेट देण्यास आले व त्यांनी प्लॉटची पहाणी करून ते मला सिरसाळा मार्केट येथील नारायणबाबा अॅग्रो एजन्सी येथे घेऊन गेले. तेथून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सप्तामृत व सोबतच कॅल्सीअम नायट्रेड ८० ग्रॅम, चुन्याची निवळी यांच्या ३ फवारण्या केल्या.

मी पुर्णपणे निराश झालो होतो. खचलो होतो. शेजारी - पाजारी माझ्या प्लॉटवर येऊन आता कपाशी 'कव्हर' होत नाही म्हणून हसत होते. परंतु मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर असलेला विश्वास व श्री. बुरंगे साहेबांनी केलेली मदत यामुळे माझा प्लॉट केवळ १२ ते १५ दिवसात पुर्ववत झाला. त्यामुळे माझे होणारे एकरी १२ क्विंटल प्रमाणे ३ एकराचे ३६ क्विंटल आणि त्याचे ५ हजार रु. प्रमाणे १ लाख ८६ हजार रु. म्हणजे खर्च व मेहनत वगळता अंदाजे माझे किमान १ लाख रु. आर्थिक नुकसान झाले असते ते वाचले. त्यामुळे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी व त्यांच्या प्रतिनिधींचे आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो.