गेल्या २० वर्षापासून छत्तीसगड राज्यात सिद्धीविनायक शेवग्याची यशस्वी लागवड आरोग्यास लाभदायक

श्री. विनायक मानापूरे, (B.Sc.Agri.)
सहाय्यक कृषी संचालक, उद्यानविद्या, कृषी विभाग, रायपूर. (छत्तीसगड).
मो.०९२२९१६०१०४



मी १९८१ साली जवाहलाल नेहरू विद्यापीठ जबलपूर (म.प्र.) येथून B.Sc.Agri.झालो आणि १९८२ सालापासून कृषी विभागामध्ये सेवेत कार्यरत आहे. २० वर्षपुवी पुण्यातील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची सहल घेऊन आलो होतो. तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या स्टॉलवर सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यानंतर आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी संशोधन केंद्रास भेट दिली. त्यावेळी सरांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांना व स्टाफला 'सिद्धीविनायक' शेवग्याचे आहारातील महत्त्व व त्याची लागवड, छाटणी, खते, औषधांचा योग्य वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी आमच्या भागातील संत्र्याच्या बागांवरील समस्यांवर देखील सरांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी आम्ही हे 'सिद्धीविनायक' शेवगा बियाणे घेऊन गेलो होतो. आमच्या पांडुर्णा, जि. छिंदवाडा (म.प्र.) येथे शेवग्याला 'मुंगना' म्हणतात. तेथे आम्ही या 'सिद्धीविनायक' शेवग्याची रोपे तयार करून शेतकऱ्यांना वाटली. या शेवग्याच्या शेंगाचा शेतकऱ्यांच्या आहारात वापर झाल्याने त्यांचे आरोग्य सुधारले. तसेच या शेवग्याच्या शेंगा विकून त्यांना पैसे मिळू लागल्याने त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली.

नंतर माझी छत्तीसगडला बदली झाली. तेव्हा २००२ साली आम्ही २५ - ३० शेतकऱ्यांसह अभ्यास दौऱ्यासाठी पुण्याला आलो असता पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या संशोधन केंद्राला भेट दिली. त्यावेळी सरांनी आम्हा सर्वांना 'सिद्धिविनायक' शेवगा, कढीपत्ता, सिताफळ, मल्हार लिंबू या पिकांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर आमच्याकडील संत्रा आणि लिंबाच्या रोपांची वाढ होत नव्हती, ती रोपे खुजी राहिली होती. रोपे गेल्यात जमा होती. तेव्हा त्याबद्दल सरांचे फोनवरून मार्गदर्शन घेतले. सरांच्या मार्गदर्शनानुसार जर्मिनेटरचे रोपांना ड्रेंचिंग केले आणि सप्तामृताच्या २ - ३ फवारण्या केल्या असता ती रोपे यशस्वी होऊन १ लाख ९० हजार झाडे तयार झाली. यावर आश्चर्यचकीत होऊन आमच्या डायरेक्टरने मला विचारले, मानापुरे हे ज्ञान कोठून मिळविले ? तेव्हा मी त्यांना सांगितले, पुण्याचे डॉ.बावसकर सर आहेत. ते खु मोठे शेती शाश्त्रज्ञ आहेत. ही नुसती औषधे नसून ती वनस्पतीचे अमृतच आहेत आणि मी त्याचा वापर केला आहे. त्यामुळे हा चमत्कार घडला.

नंतर माझी बदली बिजापूर (छत्तीसगड) येथे जो महाराष्ट्राच्या लगतच भाग आहे तेथे झाली. तो पुर्ण आदिवासी व नक्षली भाग आहे. तेथे शेतीचा कसलाच विकास नाही. तेथे आम्ही हा 'सिद्धिविनायक' शेवगा रोपे तयार करून लावला. त्या शेंगाचा त्या आदिवासी लोकांच्या आहारात वापर केल्याने त्यांचे कुपोषण कमी झाली. 'सिद्धिविनायक' शेवग्याला ७ - ८ महिन्यात हमखास शेंगा लागून शेंगा हिरव्यागार असून चव व स्वाद अप्रतिम आहे. तसेच आरोग्यवर्धक पोषणमुल्य यामध्ये जास्त आहेत. आम्ही या शेवग्याच्या शेंगाचे लोणचे तयार केले होते, ते आम्ही छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग यांना कलेक्टर साहेबांमार्फत दिले, तर ते त्यांना खुप आवडले. या शेवग्याच्या शेंगाचा आहारात वापर होतो. त्याचबरोबर आम्ही त्याचे लोणचेदेखील बनवतो.

आमच्याकडे महिला गट आहे. त्यांच्यासाठी आम्ही गव्हर्मेंटच्या २।। एकर जमिनीवर भाजीपाला लागवड करत असतो. त्यामध्ये आम्ही या 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड करणार आहे. जवळपास १००० झाडे लावून त्यापासून या महिलांना उत्पादन मिळून त्या भाजीपाल्याचा वापर घरी खाण्यास करतील व बाकी भाजीपाला विक्री करून त्यांचे कुटुंब चालवतील. या शेवग्याचे आरोग्यामुल्य इतके आहे की, शेंगाचा आहारात समाविष्ट झाल्याने कुपोषण कमी होणार आहे. बऱ्याचदा असे होते की, भाजीपाल्याला भाव मिळत नाही, मात्र 'सिद्धीविनायक' शेवग्याला आजही ४० ते ६० रु. किलो भाव मिळत आहे. त्यामुळे या महिलांची आरोग्याबरोबरच आर्थिक परिस्थितीही निश्चितच सुधारेल अशी आम्हाला खात्री आहे.

मा. कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावरील बगीच्यात मी या 'सिद्धीविनायक' शेवग्याची रोपे लावली होती. तर त्याचे उत्पादन पाहून तसेच शेवग्याच्या शेगांचे आरोग्यवर्धन महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी मला आदेश केला की, आपल्या जिल्ह्यात जेवढ्या अंगणवाड्या आहेत त्यांना या 'सिद्धीविनायक' शेवग्याची रोपे तयार करून ५ - ५ रोपे वाटा. म्हणजे त्याच्या उत्पादनातून त्या शेंगाचा लहान मुलांच्या आहारात वापर केला जाऊन त्यांचे कुपोषण थांबेल.

यावर डॉ.बावसकर सरांनी सांगितले की, "या सिद्धीविनायक शेवग्यावरील ३० - ४० वर्षाच्या संशोधनामध्ये आमचा मुळ उद्देश हाच होता की हे असे पीक आहे की, लहान मुले, महिलांचे कुपोषण कमी करण्याची क्षमता या पिकामध्ये आहे आणि सबंध मानवतेचे यातून आरोग्य सुधारेल आणि आता आमच्या संशोधनाचा पुढील टप्पा असा आहे की, विषमुक्त सकस अन्न निर्मिती, म्हणजे यातून मानवाचे आरोग्य सुद्दढ राहील. तो आजारीच पडणार नाही. म्हणजे त्याला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकताच राहणार नाही. "

डॉ.बावसकर सरांनी २०१० मध्ये आयोजीत केलेल्या 'सिद्धीविनायक' शेवगा तिसऱ्या जगातील शेतकऱ्यांचा कल्पवृक्ष' या कार्यशाळेमध्ये मला मार्गदर्शनासाठी निमंत्रीत केले होते. तेव्हा मी त्या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. तेव्हापासून मला अनेक भागातील शेतकऱ्यांचे फोन येतात. "साहेब, हा 'सिद्धीविनायक' शेवगा कधी लावायचा, कसा लावायचा, याची छाटणी कशी करायची?" यावर मी त्यांना मार्गदर्शन करत असतो.

डॉ.बावसकर सरांच्या मार्गदर्शनातून आम्हाला खूप फायदा झाला आहे. मी ज्या - ज्या वेळी पुण्याला येतो त्या - त्या वेळी सरांना भेटून 'सिद्धीविनायक' शेवग्याची १० -१२ पाकिटे बी व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे घेऊन जात असतो.