सोयाबीन, मूग व कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी रामबाण

श्री. मोहन हरिभाऊ जाधव,
मु.पो. खडका, ता. घनसावंगी, जि. जालना - ४३१२०९.
मो. ९०४९७१३१४०माझी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी अशोक काटे (मो. ९४६४९२७०७०) यांच्याशी तिर्थपूरि (ता. घनसावंगी) मार्केटला २०१६ च्या खरीप हंगामात भेट झाली. तेव्हा बियाणे खरेदीची लगबग चालू होती. त्यातच त्यांनी आम्हास जर्मिनेटरच्या वापरासंबंधी मार्गदर्शन केले. त्यानुसार आम्ही सोयाबीन व मूग यांच्या लागवडीवेळी जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केली. त्याचे खूपच अप्रतिम रिझल्ट मिळाले. मग आम्ही कपाशीवर फवारणीसाठी संपर्क केला असता त्यांनी कॉटन थ्राईवर व जर्मिनेटरचा पिकास होणारा फायदा समजावून दिला.

नंतर त्यांचे तालुका प्रतिनिधी श्री. गणेश कसाब हे वेळोवेळी आमच्या प्लॉटवर येत होते व मार्गदर्शन करित होते. त्याप्रमाणे जर्मिनेटर व कॉटन थ्राईवरच्या फवारण्या करत होतो. त्यामुळे आमच्या गेल्या वर्षीच्या कपाशीवर लाल्या - ताक्या ह्या प्रकारच्या कुठल्याच रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. म्हणून या हंगामात आम्ही सुरुवातीसूनच याचा वापर करत आहोत.

११ जून २०१७ रोजी २।। एकरमध्ये अजीत १५५ व चैतन्या या जातीचा कापूस लावला आहे. त्याच्या वाढीसाठी जर्मिनेटर ५० मिली/पंप याप्रमाणे घेतले व दुसऱ्या फवारणीपासून पेस्टीसाईट बरोबर कॉटन थ्राईवर ५० मिली/पंप असे घेत आहोत. त्यामुळे शेजारील कपाशीपेक्षा आमच्या कपाशीची वाढ व डेरेदारपणा अधिक असल्यामुळे आम्हाला गावातील व रोडवरून जाणारे वाटसरू उभे राहून विचारणा करतात. तेव्हा आम्ही एकच उत्तर देतो, कपाशीच्या अधिक उत्पन्नासाठी वापरा केवळ 'जर्मिनेटर + कॉटनथ्राईवर' ची जोडी. कारण त्यामुळेच हा प्लॉट निरोगी व बहारदार दिसत आहे.