२५ गुंठे टोमॅटोचे २५ हजार

श्री. भाऊसाहेब रघुनाथ थिटमे,
मु.पो. सावरगाव तळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर


उत्सव ३ पाकिटे बी जर्मिनेटर न वापरता टाकले. रोपे सव्वा महिन्यात तयार झाली. २० गुंठ्यामध्ये जून २००४ ला लावली. जमीन मध्यम स्वरूपाची आहे. सरी ३।। फुटाची काढून १। फुटावर रोपाची लागण केली. रोपे जर्मिनेटर औषधाच्या द्रावणात भिजवून लावली. रोपांची लगेच तग धरला. फूट नेहमीपेक्षा लवकर सुरू झाली. वाद होण्यासाठी नेहमी १५ दिवस लागतात. पण जर्मिनेटरमध्ये रोपे भिजवून लावल्याने ८ ते १० दिवसात फुट चालू झाली. नंतर पीक २५ दिवसाचे असताना पंचामृताची पहिली फवारणी केली. झाडांची वाढ आणि फुटावा निघण्यास मदत झाली. रोगप्रतिकार शक्ती वाढली. नंतर १५ - २० दिवसांचे अंतराने पुन्हा २ फवारण्या पंचामृत औषधाच्या केल्या. पीक सुरुवातीपासूनच निरोगी राहिल्याने वाढ पुर्ण झाली आणि फुलकळी भरपूर लागली. माळ नेहमीपेक्षा १० - १५ द्विस अगोदर चालू झाला. २० गुंठ्यात एकूण ११०० - १२०० जाळी माल निघाला. माल संगमनेर मार्केटला विकला. जाळीला ६० ते २५० रु. पर्यंत भाव मिळाला. जाळीमध्ये २० - २५ किलो माल बसतो. तरी साधारण २५,००० रु. २० गुंठ्यामध्ये झाले. टोमॅटोसाठी १ लिटर पंचामृताचा डोस नेला होता. त्यातील शिल्लक औषध कांद्याला वापरले.