पंचामृतामुळे एका झाडावर १५० - १७५ टोमॅटो

श्री. पांडुरंग रामचंद्र खुर्दळ,
मु. पो. खतवड, ता. दिंडोरी, जि. नाशिक


मी गेली २ वर्षापासून डॉ. बावसकर सरांची औषधे वापरात आहे. द्राक्षासाठी एप्रिल छाटणीपासून वेळापत्रकाप्रमाणे वापर केला. २० गुंठे एन. एस. २५३५ टोमॅटोची लागवड दि. १७ जुलै २००३ रोजी केली. बिजप्रक्रियेसाठी जर्मिनेटरचा वापर केला. उगवण फारच चांगली झाली. रोपावर जर्मिनेटर व थ्राईवर प्रत्येकी ३ मिली १ लि. पाण्यामध्ये घेऊन फवारणी केली. लागवड झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५० मिली/१५ लि. पाणी अशी फवारणी केली. फुटवा चांगला होऊन झाडांनी वाढ चांगली झाली. वरील प्रमाणातच १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या केल्या. फुलकळी मोठ्या प्रमाणात लागली. तिसऱ्या फवारणीमध्ये थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि./२०० लि. पाणी याप्रमाणात फवारणी केली. झाडांची वाढ अडीच फुटापर्यंत आहे. करपा, व्हायरस, घुबडया या रोगांचा प्रादुर्भाव नाही. या औषधाबरोबर किटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर केला आहे. फळे तोडणीस सुरुवात झाली आहे. झाडावरली प्रत्येक झाडावर १५० ते १७५ फळे असून मार्केटला भाव १२० ते १३० मिळत आहे.