टोमॅटोसाठी मार्गदर्शन व फुटव्यासाठी पंचामृत

श्री. दशरथ मारुती महागरे,
मु.पो. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा


८ गुंठ्यामध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. जमीन काळसर, चिवट आहे. सुरुवातीला गहू दीड महिन्यांनी रानाची नांगरट करून रान तयार केले. टोमॅटोची लागवड करून २ महिने झाले आहेत. टोमॅटोला महाधन ८० किलो, सम्राट १०० किलो वापराले आहे. हा डोस (रासायनिक खतांचा) जादा झाल्यामुळे की दुसरा काय प्रकार आहे कि त्यामुळे झाडाचा फुटवा होत नाही आणि फुलेही कमी लागत आहेत. त्यासाठी योग्य सल्ला व औषधे घेण्यासाठी आलो आहे.

मागे २ वर्षापुर्वी टोमॅटोला आपली पंचामृत औषधे वापरली होती. तेव्हा चांगला फायदा झाला होता. त्यामुळे या टोमॅटोला फुटीसाठी व फुले लागण्यासाठी पंचामृत नेत आहे. गेल्यावर्षी टोमॅटोला बाजार कमी होते. त्यामुळे ही औषधे वापरली नव्हती. आता टोमॅटोचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत पंचामृताच्या फवारण्या या प्लॉटला करणार आहे.